Read in
शुक्रवार 07 मे 2021 चे दैनिक राशीभविष
07 मे आज चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 12:25 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– तुम्ही ज्या कामासाठी मित्रांची मदत मागण्याच्या विचारात आहात त्याच मित्रांकडून अचानक मदत मिळेल.
व्यवसायात आत गप्पा बसा तुमच्या एखाद्या कृतीनेही मोठी घडामोड घडेल.
वृषभ :– तुमच्या अध्यात्मिक गुरूंच्या आशिर्वादाने तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात वसुली होईल.
घरगुती लहान उद्योगातूनही चांगली आवक होईल. कुटुंबात वादाचे प्रसंग येथील.
मिथुन :–बोलताना शब्द जपून बोलावे लागतील. गैरसमजाचे वारे निर्माण होतील. मित्रमंडळीमधे एखादी पैज लावली
असेल तर मित्रांकडून लुटले जाल. प्रेमाच्या व्यवहारात मैत्रिणीचा लहरीपणा वाढेल.
कर्क :–आज तुमच्या आरोग्यात झोपेचा अंमल जास्त राहील. ताप येण्याचा, आजारी पडण्याचा संभव आहे.
मित्रपरिवाराबरोबर कितीही गोड बोललात तरीही त्याचा अर्थ वाकडाच निघेल.
सिंह :–व्यवसायातून चांगला धनलाभ होईल. नोकरीत कामाच्या ठिकाणी आज अधिकारपदाचा चांगला वापर करता येईल.
सौंदर्यप्रसाधनाच्या व्यवसायात अचानक चांगली वसुली होईल व मोठ्या आँर्डर्स मिळतील.
कन्या :–बँकेकडे कर्ज प्रकरण करत असाल तर आज कोणतीही हालचाल करू नका. कुटुंबातील वडील मंडळींकडून जाब
विचारला जाईल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
तूळ :–तुमच्या हातून आज एखादी काचेची वस्तू, किंवा फ्रेम हातातून पडून फुटेल तरी सांभाळा. श्री दत्तगुरूंच्या कृपेने
तुमच्या मुलाच्या मनासारखे त्याचे अपेक्षित काम होईल. कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल.
वृश्र्चिक :–आईच्या आशिर्वादाने जमिनीचे, घराचे वादात अडकलेले काम मार्गी लावण्यासाठी कायदेशीर मार्ग सापडेल.
आरोग्याच्या बाबतीत आज कुरबूर राहील. नोकरीतही आजचा दिवस कष्टकारक जाईल.
धनु :–नोकरीत वरिष्ठांनी दिलेला शब्द त्यांच्याकडून पाळला जाणार नाही. आज नोकरीत, कुटुंबात सगळीकडेच वाद
घालण्याच्या वृत्तीत वाढ होईल. शेजारच्यांकडून आवश्यक ती मदत मिळेल.
मकर :–सर्व ठिकाणी वागताना आज तुमचा अती व्यावहारिकपणा दिसून येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना लवकरच गोड
बातमी देण्याची संधी मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ :–आध्यात्मिक गुरूंच्या मदतीने पूर्वी ठरलेल्या तुमच्या विचारात बदल होईल. प्रवासाचा बेत रद्ध करा प्रवासात
तुमचे नियोजन पूर्णपणे कोलमडेल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक शाब्दिक वाद होईल.
मीन :–आज घडणार्या गोष्टीबाबतचे तुमचे सूचक स्वप्न खरे ठरेल. तरी पडताळून पहा. प्रेमाच्या प्रकरणात विवाह ठरला
असल्यास आज नकारात्मक विचारांची मनात गर्दी होईल.
as ||शुभं–भवतु ||