Read in
गुरूवार 06 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 07 मे आज चंद्ररास कुंभ 29:54 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका 10:31 पर्यंत व नंतर पूर्वाभाद्रपदा.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–श्री गुरूकृपेचा अनुभव येईल. व्यवसाय, नोकरी घरगुती राहिलेली कामे इ. सर्वच बाबतीत आजचा दिवस सकारात्मक राहील. कामातील उत्साहामुळे कामे फत्ते कराल.
वृषभ :–श्री दत्तगुरूंच्या उपासकांनी आपल्या उपासनेत खंड पाडू नये. यशाचा टप्पा आता तुमच्यापर्यंत आला असल्याची प्रचिती येईल.
मिथुन :–न्यायालयातील कुचमत पडलेल्या कामात प्रगती होणार असल्याचा वकीलांकडून निरोप येईल. सर्व कामे आपणच करण्याचा अट्टाहास करू नका. कामांची वाटणी करून इतरांनाही सामिल करून घ्या.
कर्क :–ओबिस प्रकृतीच्या मंडळीना आरोग्याच्या तक्रारीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. वयस्कर मंडळीना आवश्यक वाटत असेल तर दवाखान्यात ठेवा विलंब करू नका.
सिंह :–नवीन वाहन घेण्याचे स्वप्न तूर्तास पुढे ढकला. नातेवाईकांच्या आरोग्याची चौकशी करा. तरूण वर्गास ही सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे जाणवेल. आईव वडील दोघांचेही विचार आज तुम्हाला पटणार नाहीत.
कन्या :–संततीला पडण्या धडपडण्यामुळे हाडांच्या डाँक्टरांकडे न्यावे लागेल. वयस्कर मंडळीनी आपल्या जवळच्या माणसांबरोबर मनातील भावना व्यक्त करण्यास हरकत नाही.
तूळ :–गायी म्हशी शेळ्या मेंढ्या ज्याच्याकडे आहेत त्यांना जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून आवश्यक ते सहकार्य मिळण्यासाठी प्रथम चर्चा करावी लागेल.
वृश्र्चिक :–पासपोर्ट, व्हिसा यांतील पेडींग कामाच्या प्रतिक्षेत असाल तर सध्या तुमचे काम लवकर होणार नाही. वाहन अतिशय जपून चालवावे व आवश्यक नसेल तर चालूच नये.
धनु :– घसा दुखण्याचा त्रास होऊन व बोलताना त्रास जाणवेल. . ज्यांना धूळीची अँलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. वार्ताहर, बातमी लेखक यांना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल.
मकर :–आज तुम्हाला कांहीच करू नये असे वाटून कामात उत्साह वाटणार नाही. 15 वर्षाच्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आई वडीलांच्या मायेने सुखावून जाल.
कुंभ :–लहान मुलांना कानाच्या दुखण्याचा त्रास होईल. कफ प्रवृत्तीच्या मंडळीनी विशेष काळजी घ्यावी. आजची सकाळ प्रकृतीच्या बाबतीत काहीशी नरम गरम राहील.
मीन :–ज्यांना झोप न येण्याचा त्रास आहे त्यानी झोपेसाठी औषधे घेऊ नयेत. आईवडीलांनी मुलांबरोबर बोलताना रागाचा अतिरेक करू नये समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
||शुभं–भवतु ||
Dhanyawad Tai