daily horoscope

मंगळवार 04 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार  04 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार  04  मे चंद्ररास मकर  20:42.पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 08:25  पर्यंत व नंतर धनिष्ठा. 

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज शुक्र 13:25  ला वृषभेत प्रवेश करत आहे. शशुक्राच्या प्रवेशाच्या वेळी बुध वृषभेत 05 अंशावर आहे शुक्र वृषभेच्या पहिला अंशात प्रवेश करत आहे. दोघांमधील अंतर फक्त 05 अंशाचे आहे. शुक्र बुध नैसर्गिक मित्र असल्याने  प्रत्येक राशीला जे लाभ होणार आहेत त्याची माहिती वेगळ्या लेखात देत आहे,  ते वाचून प्रत्येकाने त्यानुसार स्वत:चा लाभ करून घ्यावा. शुक्राचा वृषभ राशीतील कालावधी फक्त 04 मे ते 28 मे पर्यंतच आहे. 

 

मेष :–  आज ज्याच्याकडून पैसे येण्याचे ठरले होते ते आज मिळतील पण एकत्र न मिळता टप्प्याटप्प्याने मिळण्याचे ठरेल. प्रथम संततीच्या आजारपणावर जास्त लक्ष द्यावे लागेल. आज कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागेल.

वृषभ :–उपासनेबाबतच्या तुमच्या मनात असलेल्या शंका विचारण्याची संधी मिळेल. एखाद्या धर्मग्रंथाचा अभ्यास करत असलेल्यांना सद्गुरूकडून आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल. पूजा प्रार्थनेचे उगीच अवडंबर माजवू नका व इतरांना जबरदस्ती करू नका.

मिथुन :–व्यवसायातील अडचणींवर आता शेवटचा उपाय म्हणून स्त्रीधनाचा वापर करावा लागेल. घरातील बाथरूम, टायलेट, वाँश बेसिनच्या आऊटलेटबाबत प्लंबरला बोलवावे लागेल.

कर्क :–बर्‍याच दिवसापासून ज्या डाँक्टरांची अपाँईंटमेंट मिळत नव्हती ती मिळाल्याचे कळवतील. तुमच्या समोरील व्यक्ती त्यांचे छुपे रूप दाखवेल. लहान मुलांच्या झोपण्याच्या जागेची स्वच्छता तपासावी लागेल.

सिंह :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील व्यक्तीकडून मानहानीचा प्रसंग येईल. स्वत:बद्धलच्या  महत्वाच्या गोष्टी इतरांना सांगू नका.  घराचे सँनिटायझेशन करून घ्यावे लागणार आहे.

कन्या :–ज्यांच्याकडे विविध कला आहेत, छंद आहेत त्यांनी आँन लाईन वर्ग घेतल्यास चांगली दाद मिळेल.  उधारीवर दिलेले पैसे परत मिळण्याची आशा कमीच दिसत असल्याने सध्या त्यावर अवलंबून राहू नका.

तूळ :–लहान मुलांना विषारी किडा मुंगी दंश करण्याचा धोका आहे. सार्वजनिक इमारतीमधे राहणार्‍यांना अचानक पुराव्याची कागदपत्रे हजर करण्याचे आदेश निघतील. व्यवसायात नियमात झालेले बदल तुम्हाला जाचक ठरतील तरी त्यावरील उपायासाठी मार्गदर्शन घ्यावे. 

वृश्र्चिक :–रेल्वेमधे व पोस्टामधे नोकरी करणार्‍यांना नियमात राहूनच काम करावे लागेल. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होण्याचे संकेत मिळतील. नोकरीत कामाच्या ठिकाणी झालेला बदल त्रासदायक ठरेल. 

धनु :–व्यवसायात कर्ज काढणे हे कर्ज फेडण्यापेक्षा सोपे आहे याची प्रचिती येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर असलेल्या विश्र्वासाला तडा जाणार नाही याची दखल घ्यावी. पुन्हा नात्यातील वीण घट्ट होत असल्याचे जाणवेल. 

मकर :–कुटुंबात आज अचानक कोरडेपणाने वागत असल्याचे वातावरण अनुभवास येईल. किरकोळ आजार समजून कोणतेच दुखणे अंगावर काढू नका. राजकीय क्षेत्रात महत्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. 

कुंभ :–पतीपत्नीमधील वाद विकोपाला जातील. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा.  हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना व नर्सेसना फारमोठ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. फौजदारी खटल्यात कोणासाठी तरी जामिन रहावे लागेल. 

मीन :–अचानक धनलाभ कसा होतो याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांना आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून अध्यात्मिक मार्गदर्शन  मिळेल. 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “मंगळवार 04 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *