Read in
सोमवार 03 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 03 मे आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 08:21 पर्यंत व नंतर श्रवण.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–अचानक राजकारणात होणार्या घडामोडींचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. लहान भावंडाच्या आजारपणाबाबत चिंता निर्माण होईल. भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर मात करता येईल तरी त्यांची मदत घ्या.
वृषभ :–आश्रम, वृद्धाश्रम येथील सेवाभावी कामामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्याच्या प्रतिभा व्यक्त करण्यासाठी वेबिनार मध्ये भाग घेता येईल. वृद्धाश्रमातील कार्यक्रमासाठी तुम्हाला आँन लाईन कार्यक्रमात भाग घेता येणार आहे.
मिथुन. :–वयस्कर मंडळीना, ह्रदयविकाराचा त्रास असलेल्यांना आवश्यक वाटल्यास तातडीने डाँक्टरांकडे जावे लागेल. महिलांनी आपल्या मनातील गोष्टी दुसर्यांवर अती विश्वास ठेवून ओपन करू नयेत.
कर्क :–आज तुम्हाला तुमच्या वकीलांना भेटून कामाबाबत चर्चा केल्यास कामाची चिंता राहणार नाही. शैक्षणिक खात्यातील सरकारी कर्मचार्यांना अचानक कामाबाबत प्रवास करावा लागेल. घरातील पुरूष मंडळीना आज जराही स्वत: साठी वेळ देता येणार नाही.
सिंह :–आजचा दिवस स्पर्धांसाठी खूपच लाभदायक आहे. विजयाची संधी घालवू नका. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजाल. राजकीय वापर केल्यास त्रासदायक ठरेल.
कन्या :–ज्योतिषविद्ध्या व मंत्रविद्ध्येचा अभ्यास करणार्यांना अध्यात्मिक अभ्यासाची जोड द्यावी लागेल. मंदिरातील व इतर शुभ पूजा करणार्या पुजार्याना एकदम भरपूर कामे येतील.
तूळ :–होलसेल धान्य व्यापार्यानी लोकांच्या सोयीसाठी काढलेली युक्ती सर्वानाच चांगली उपयोगी ठरेल. तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल याउलट बोलण्यातील गोडपणा व स्पष्टपणा लाभदायक ठरेल.
वृश्र्चिक :– मोबाईलच्या हेडोफोनचा अती वापर केल्याने कानावर झालेल्या परिणामामुळे कानदुखी व डोकेदुखीचा त्रास आटोक्यात येणार नाही. मधुमेहीनी डाँक्टरांच्या सल्ल्यानेच आपल्या सवयी बदलाव्यात.
धनु :– संस्कार वर्ग चालवणार्यांना लहान मुलांसाठी आँनलाईनच्या मदतीने शिबीर घेता येणार आहे. घरातील आवराआवर करताना जून्या हरवलेल्या मौल्यवान गोष्टी सापडतील. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल.
मकर :–तरूणांनी आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नुसत्या औषधांचा मारा करण्याऐवजी आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा. नोकरीतील तुमच्या सर्व प्रश्र्नांना उत्तरे आहेत हे लक्षात घ्या व नोकरीवर प्रेम करा.
कुंभ :–सध्या घराचे चाललेले बांधकाम थांबवावे लागेल. आईच्या व आत्याच्या तब्बेतीची काळजी निर्माण होणार्या प्रश्र्नांना प्रथम महत्व द्या. पगारातील रक्कम इतरांनाच देण्यासाठी आहे या तुमच्या विचाराचे कौतुक होईल.
मीन:–आजचा दिवस सर्वच क्षेत्रांत यश देणारा आहे. महत्च्याच्या क्षेत्रातील गाठीभेटी आजच उरकून घ्या. नोकरीच्या मुलाखतींना अग्रक्रमाने प्राधान्य द्या. अहंकार आणि मोठेपणामुळे जवळचे मित्र दुखावले जातील
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai