Read in
रविवार 25 एप्रिल 2021 ते शनिवार 01 मे 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 02.मे चंद्ररास धनु 14:45 पर्यंत मकर व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 08:58 व नंतर उत्तराषाढा.
सोमवार 03 मे चंद्ररास
मकर दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 08:21 पर्यंत व नंतर श्रवण 08:25 पर्यंत. मंगळवार 04 मे चंद्ररास मकर 20:42
पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 08 :25 पर्यंत व नंतर धनिष्ठा. बुधवार 05 मे चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र
धनिष्ठा 09 :10 पर्यंत व नंतर शततारका. गुरूवार 06 मे चंद्ररास कुंभ 29:54 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र शततारका
10:31 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. शुक्रवार 07 मे चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 12:15 पर्यंत व नंतर
उत्तरा भाद्रपदा. शनिवार 08 मे चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 14:46 पर्यंत व नंतर रेवती. वरील
प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या राशी नक्षत्रांचा विचार करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :–या सप्ताहात घडणारी गोष्ट जशी तुम्ही कल्पनेत साकारली होती त्याचप्रमाणे घडत असल्याचा अनुभव येईल.
उच्चशिक्षण घेत असलेल्यांना आपला अभ्यास अंतिम ध्येयाकडे जात असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा
सल्ला घ्यावा लागेल. एकाधिकार व्यवसायातील अडचणींवर मात करून यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल. कुटुंबातील
ज्येष्ठ मंडळींच्या नात्यातील संघर्ष तुमच्या पुढाकाराने संपुष्टात येउन दिलजमाई होईल. हा सप्ताहात 05 तारीख सोडून
इतर कोणताही दिवस मोठ्या खरेदीसाठी अजिबात लाभदायक असणार नाही. कोणतेही करार करू नका.
वृषभ :–हातातील ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात त्यातील तुमची जबाबदारी योग्य प्रकारे पार पडत नसल्यास विशेष
लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही संकटाने खचून न जाता त्यातून बाहेर पडण्याकरीता काय करायला पाहिजे याचा अभ्यास
करा. नोकरीतील बदलाच्या विचारात असाल तर या सप्ताहातील प्रयत्नांना चांगले यश येईल. राजकीय क्षेत्रातील
मंडळीनी आपल्या विरोधकांबरोबर अभ्यासपूर्ण असल्याशिवाय चर्चा करू नयेत. परगावी असलेल्या वडीलांच्या प्रकृतीची
विचारपूस करावी. दलाल, कमिशन एजंट यांना या सप्ताहात चांगला आर्थिक लाभ होईल.
मिथुन :– विवाहेच्छूंनी आपल्या अपेक्षांना थोडा आवर घातल्यास आलेल्या स्थळांचा विचार करणे सोपे जाईल. कलाकार
मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी नवीन मार्ग सापडेल. महिलांना गर्भाशयाचा कांही त्रास असल्यास दुर्लक्ष करू नये.
वयस्कर व्यक्तींचा पाईल्सचा व बद्धकोष्ठतेचा त्रास वाढेल. सेवाभावी काम करणार्या सेवकांचे समाजाकडून कौतुक केले
जाईल व त्यांची प्रतिष्ठा वाढेल. स्वयंपाकघरातील धारदार, टोकदार वस्तूंपासून तुम्ही स्वत: सांभाळून रहा व लहान मुलांची
पण काळजी घ्या. शैक्षणिक संस्थेमधे काम करणार्या शिक्षकांना नवीन वर्षासाठीच्या नियोजनाची कामाची जबाबदारी
स्विकारावी लागेल.
कर्क :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत वरिष्ठ खूष होऊन अँडिशनल चार्ज दिला जाईल. सरकारी
अडलेल्या कामाकडे लक्ष दिल्यास कांही प्रमाणात का होईना काम मार्गी लागेल. सरकारी कार्यालयात आपले म्हणणे
थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील वृद्धी वाढवण्यासाठी डिजीटल मार्केटचा उपयोग केल्यास चांगला
प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या पँनलमधे तुम्हाला सामावून घेतले जाईल.
घरगुती उद्धोगातील आर्थिक विकासाचा आलेख चढता राहील.
सिंह :–या सप्ताहाच्या सुरूवातीलाच तुमच्या आत्मविश्वासात चांगलीच वाढ झाल्याचे जाणवेल. लेखन कलेचे ज्ञान
असलेल्यांनी विविध विषयावरील लेखन कौशल्याचे आँन लाईन वर्ग घेतल्यास चांगला प्रतिसाद मिळेल. कँटरींगच्या
क्षेत्रातील महिलांना अचानक नवीन कामाच्या आँर्डर्स मिळतील. कामे जोरात सुरू होतील. कुटुंबातील वातावरण मौजमजेचे
व आनंदी राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. वयस्कर मंडळीनी मला कांहीही
होत नाही असे न म्हणता प्रत्येक त्रासाची व प्रकृती बदलाची माहीती मुलांना द्यावी.
कन्या :–अचानक नोकरीविषयी अनास्था निर्माण होईल पण ही परिस्थिती फक्त ह्या सप्ताहभरच राहील. न्यायालयीन
कामकाजाबाबतचा तुमच्याकडून झालेला चालढकलपणा वरिष्ठांच्या निदर्शनास येईल. सामाजिक स्तरावर फ्रंट लाईनवर
काम करणार्यांनी मानसिक शांती जपण्याचा प्रयत्न करावा. श्री गुरूकृपेने पुढे घडणार्या बर्याच गोष्टींची अंतर्मनाकडून
सूचना मिळेल तरी त्याचा अर्थ समजून घ्यावा. महिलांना ओटीपोट दुखण्याचा त्रास होईल व गर्भाशयाच्या बाबतीत
डाँक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल दुर्लक्ष करू नये.
तूळ :–व्यवसायिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नामुळे मनासारखे स्थैर्य येत असल्याचे जाणवेल. नवीन झालेला
परिचयामुळे आरोग्यातील गैरसमजूती दूर होतील. कौटुंबिक वातावरण साध्या सहज बोलण्याचा वेगळाच अर्थ निघून
बिघडेल तरी बोलताना विचार करावा. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला नफा होईल पण या सप्ताहात फारशी गुंतवणूक
करण्याचा विचार करू नका. झोपेच्या बाबतीत मात्र हा सप्ताह फारच त्रासदायक ठरणार आहे. बर्याच दिवसापासून
रेंगाळलेले घराचे रजिस्ट्रेशन चे काम या आठवड्यात पूर्ण कराल.
वृश्र्चिक :–या सप्ताहात तुमची महत्वाची कामे टेलिफोनवरून सहजगत्या होणार आहेत तरी त्या कामाना प्राधान्य द्या.
मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वस्तू घरापर्यंत चालून येईल व पत्नीच्या तीव्र इच्छाशक्तीचा अनुभव
येईल. मिडीया मध्ये काम करणार्यांकडून प्रक्षोभक बातम्यांचा प्रसार केल्याबद्धल जाब विचारला जाईल. गायक व वादक
कलाकारांना चांगली संधी मिळणार आहे तरी त्याचा फायदा घ्या. कोणतेही आर्थिक व्यवहार या चार दिवसात गुरूवार
पर्यंत रोखीने करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वयस्कर मंडळीना मनासारखा आनंद मिळेल.
धनु :–तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे हिताचे ठरेल. नोकरीच्या ठिकाणी निर्माण होणार्या वादाच्या मुद्याना
अवास्तव महत्व देऊन गुंता वाढवू नका. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर हा सप्ताह जबरदस्त खर्चाचा
जाणार आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. डाव्या डोळ्याला अचानक तुमच्याच
चुकीने दुखापत होईल. महिलांनी गुडघ्याच्या त्रासावर इलाज करावा. तसेच ज्यांना मणकादुखीचा त्रास आहे अशांनीही
विशेष काळजी घ्यावी. उसने नेलेले पैसे सप्ताहाच्या शेवटपर्यंत तुम्हाला परत मिळतील. अध्यात्मिक क्षेत्रातील श्री
गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल.
मकर :–हा सप्ताह तुम्हाला कांहीसा स्फोटक विचारांचा जाईल. मनातील प्रत्येक विचार बोललेच पाहिजेत असे नाही. कांही
विचार मनातच ठेवा. व्यवसायात वसुलीच्या कामात अरेरावी पणा करू नका त्याचा तुम्हालाच त्रास होईल. पुरूष मंडळीनी
या सप्ताहात पूर्णपणे मवाळ धोरण स्विकारावे. पोलीस कर्मचार्यांनी सुद्धा दांडुक्याचा वापर प्रमाणातच करावा. वयस्कर
मंडळीना कमी झोपेचा तर तरूणांना अती झोपेचा त्रास होईल. आजारी व हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांना हाँस्पिटल
म्हणजे तुरूंगासारखे वाटेल व मानसिक त्रास होईल. वडिलांकडील नात्याबरोबरील संपर्क काही प्रमाणात समाधान देणारा
ठरेल.
कुंभ :–सरकारी परवान्यासाठी प्रयत्न करत असाल तर तूर्तास थांबावे हेच चांगले. लवकर मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारे
ओळखी लावू नका. राजकीय मंडळीनी एखादा कठीण निर्णय घेताना प्रथम कायदेशीर बाबींचा पूर्ण अभ्यास करूनच
घ्यावा. जनता प्रक्षोभ होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न
सोडवा. मित्रमंडळाचे सल्ले तुम्हाला मिसगाईड करणार आहेत. नेता मंडळीना त्याच्या स्वभावातील नेतृत्व गुणाचा त्रास
होईल व नुकसानही होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांने चालण्यापेक्षा पालकांच्या विचाराला महत्व देऊन निर्णय
घेतल्यास नुकसान होणार नाही.
मीन :– महत्वाची हरवलेली कागदपत्रे श्री दत्त कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील व जीव भांड्यात पडेल. महिलांना
आजारपणाच्या त्रासातून मुक्तता मिळेल व ठणठणीत बरे वाटेल. व्यावसायिक क्षेत्रातील नव्याने केलेली गुंतवणूक
अतिशय लाभदायक ठरल्याचे दिसेल. सार्वजनीक क्षेत्रातील कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. बँकींग,
इंजिनीअरींग या क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागणार आहे. आपली नोकरी सुरक्षित
नसल्याची भावना मनाला त्रासदायक ठरेल.
||शुभं-भवतु ||