Read in
शनिवार 01 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 01 मे चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 10:15 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.आज
महाराष्ट्र दिन आहे व चंदलादेवीचा उत्सव आहे.
सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.
मेष :–आज तुमच्या हातात जे काम आहे ते तुम्हाला पूर्वपुण्याईनेच मिळाले आहे हे लक्षात घेऊन त्या कामाला न्याय द्या.
न्यायालयीन बाबतीत विशेष लक्ष घालून काम करावे लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार
नाही.
वृषभ :–महिलांना आज स्वत:साठी स्वत:च्या आवडीची खरेदी करता येणार आहे. समाजातील गरजूंना तुमच्याकडून
आज आर्थिक मदत दिली जाईल. आजच्या सकाळपासून तुमच्यावर नोकरीतील येणारी जबाबदारी काटेकोरपणे सांभाळावी
लागणार आहे.
मिथुन :–आज व्यवसायातील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही व भागीदार यांमधे चर्चा होईल. मंत्रशास्त्राचा अभ्यास
करणार्यांना मान्यवर गुरूंकडून ज्ञान मिळेल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तरूणांना विशेष काम करण्याची संधी मिळेल.
कर्क :–नोकरदार वर्गास बदलीच्या जागी किंवा कंपनीच्या नव्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश मिळतील. पतीपत्नीमधे
अचानक मतभेदांमुळे वादग्रस्त विषयावर चर्चा होईल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कामात घाईगडबड करू नये.
सिंह :–बौद्धीक हुषारीने व चतुरपणे कामातील गुंतागुंत दूर करण्याचा प्रयत्न कराल. ज्येष्ठांच्या मदतीने धार्मिक कार्याचे
आयोजन कराल. आज दुपारनंतर घरामधील वातावरण अतिशय आनंदाचे व प्रसन्न राहील.
कन्या :– जवळच्या मित्राची अचानक पैशाची गरज भागवावी लागेल. वकिलांना आपल्या कामातील गुंतागुंत सोडवताना
प्रत्येक वेळी नवीन गोष्टी लक्षात येतील. नोकरदार मंडळीनी समंजसपणे विचार केल्यास सद्धपरिस्थितीतून मार्ग
निघेल.
तूळ :–मानसिक ताण तणावामुळे अस्वस्थता जाणवेल. महिलांनी मनातील गोष्टी जवळच्या नात्यातील व्यक्तीस
सांगितल्यास मनाला हलकेपणा येईल. लहानशा का होईना प्रवासाचे धाडस करू नये. कोणताही निर्णय घेताना शांतपणाने
घ्यावा.
वृश्र्चिक :–पायांचे लांबलेल्या आँपरेशनचे जुने दुखणे डोके वर काढेल. श्री गजाननाच्या कृपेने सध्या आँपरेशन करावे
लागणार नाही. नवीन नोकरीच्या शोधात असणार्यांना पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून बोलावणे येईल.
धनु :–मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार असल्याची सुचकता मिळेल. महिलांना अध्यात्मिक गुरूकडून उपदेश
मिळेल. घरातील कामाच्या व्यापात महिलांना स्वत:कडे पहायलाही वेळ मिळणार नाही. बँकींग क्षेत्रातील कर्मचार्यांना
अचानक कामाबाबत उत्साह वाटणार नाही.
मकर :–ओबिस लोकांनी कोणत्याही प्रकारे प्रकृतीची हेळसांड करू नये. हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांना अजून २ ते ३
दिवस तरी डिसचार्ज मिळणार नाही. बर्याच दिवसापासून सापडत नसलेली वस्तू घरातील चोर कप्प्यात सापडेल.
कुंभ :–सरकारी नोकरदारांनी इतरांच्या अधिकारांत हस्तक्षेप करू नये. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने स्वत:चे काम स्वत:च
करण्याचा निर्णय घेण्यात येईल. मुलीच्या विवाहाबाबतच्या फायनल होत आलेल्या बाबतीत अचानक नकारघंटा येईल.
मीन :–दोन दिवसापूर्वी घेतलेल्या निर्णयामधील बदल लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात आता
कोणतीही अडचण येणार नाही. प्रथम संततीच्या बाबतीतील आजारावर आराम पडू लागेल.
| शुभं-भवतु ||