Read in
शुक्रवार. 30 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 30.एप्रिल आज चंद्ररास वृश्र्चिक 12:07.पर्यंत व नंतर धनु.
चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12:07 पर्यंत व नंतर मूळ.वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :–श्री दत्तगुरूंच्या कृपेने मनातील इच्छा फलद्रूप होण्यास मदत मिळणार आहे. ज्यांचे आराध्य दैवत श्री दत्त महाराज
आहेत त्यांनी त्यांच्या कोणत्याही रूपातील उपासना करावी. 15.सप्टेंबर 2021 पर्यंत श्री दत्तगुरूंचा आशिर्वाद मिळणार
असल्याने तुम्हाला ज्या योजना आखावयाच्या आहेत त्यांचा विचार करा.
वृषभ :–पाण्याच्या शुद्धतेची काळजी घ्या. शैक्षणिक संस्थेमधे काम करणार्या शिक्षक तसेच इतर कर्मचार्यांनी
नोकरीविषयी कोणतीही भिती बाळगू नये. नोकरीतील कांही तत्वे पटणार नाहीत पण आपण मौन बाळगावे हे चांगले.
मिथुन. :–सध्या तुमचे चाललेले काम तुमच्या भाग्योदयासाठी पूरक असल्याने कामावरील निष्ठा ढळू देऊ नका.
कामातील प्रामाणिकपणा जपा. आज तुम्हाला श्री दत्तमहाराजांच्या कृपेचा अनुभव येईल.
कर्क :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत वरिष्ठ खूष असतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी
आत्मविश्वासपूर्ण मुलाखतीला सामोरे जा. तुमचे काम होणार आहे याची खात्री बाळगा. नोकरीत होणारा बदल हा
लाभदायक असेल.
सिंह :–व्यवसायातील भागभांडवल व मार्केटमधील गुंतवणूक याचा हिशोब घालत बसलात मानसिक गोंधळ उडेल
संततीच्या व तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीच्या सल्ल्याने निर्णय घ्या. लांबचे प्रवास आज करू नका.
कन्या :–"असेल हरी तर देईल खाटल्यावरी ‘ या विचाराने सर्वच बाबतीत स्वत:हून नुकसान करून घ्याल. मनाची उर्जा
वाढवून झटपट कामाला लागा. ज्या नवीन क्षेत्रात कामाला सुरूवात करणार आहात त्याच्या तज्ञांची आज भेट घडेल.
तूळ :–महत्वाचा पत्रव्यवहार किंवा लायसन्स च्या परवानगीचा अर्ज करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खुप
लाभदायक आहे. इस्टेट एजंट किवा तुमचे स्वत:चे जमिनीचे, घराचे व्यवहार असल्यास ते लाभदायक होतील.
वृश्र्चिक :–आईच्या इच्छेखातर गावी घर बांधत असाल तर आर्थिक सोय आपोआप होणार आहे. नोकरीत किंवा बँकेकडून
कर्जमंजुरी होणार आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाशिवाय इतर गोष्टीत गेल्याने नुकसान होण्याचे संकेत मिळतील.
धनु :–तुम्हाला आवडणार्या गोष्टी मिळण्याचा आजचा दिवस आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा कंटाळा
आल्याने आजचा जेवणाचा बेत बाहेरून आणला जाईल. तरूणांना त्यांच्या मनाविरुद्ध असलेले मत स्विकारावे लागेल.
मकर :–तुमच्या खिशाला आज न परवडणारा व ते सुद्धा दुसर्यांसाठी खर्च करावा लागेल. आईचे विचार आज मोलाचे
वाटतील. मैत्रीच्या व्यवहारातून नव्याने सुरू झालेल्या व्यवसायात काम सुरू होत असल्याचे जाणवेल. कामासाठी योग्य
त्या माणसांची निवड करताना तज्ञांचे सहकार्य घ्यावे.
कुंभ :–आजच्या तुमच्या उत्साहाला कोणीही विरोध करू शकणार नाही व आडकाठीही आणणार नाही. नोकरीचे सुख काय
असते याचा अनुभव येईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या ठिकाणांची माहिती मिळेल.
मीन :–नोकरीतील वरिष्ठांकडून तुमच्या अडचणींचा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. व्यवसायातील
अडचणींवर तज्ञांकडून उपाय सापडेल. कुटुंबात आईवडीलांच्या आनंदासाठी एखादा समारंभ साजरा करण्याचे नियोजन
कराल.
| शुभं-भवतु ||