Read in
गुरूवार 29 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 29 एप्रिल आज चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 14:29 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर अनाठायी खर्च वाढेल. नोकरीतील व्यवसायातील
कोणत्याही आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेऊ नका. घरातील वयस्कर मंडळीना आज आराम
करण्याची गरज आहे.
वृषभ :–कुटुंबातील अडचणी आज कालच्यापेक्षा कमी होत असल्याचे जाणवेल. दुसर्या कोणाच्याही
व्यवसायात भागिदारी सहभागी होऊ नका. शक्य असल्यास आर्थिक मदत द्या. नोकरीतील कामाचा
वाढलेला व्याप लवकर आवरणार नाही.
मिथुन :–पतप्रतिष्ठेत आज कांही कारणानी वाढ होत असल्याचे जाणवेल. नोकरीतील तुमच्या
अधिकारातील कामात वाढ होईल. राहते घर बदलावयाचे असल्यास सध्या घाई करू नका.
कर्क :–अचानक जून्या मित्रमैत्रिणीबाबत माहिती मिळेल व भेटण्याची ओढ निर्माण होईल. कोर्टाच्या
कामात अडचणी निर्माण होतील तरी वकीलांना सांगून तारीख घ्यावी. प्रवास करावाच लागला तर
नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
सिंह :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल व बलाढ्य शक्तीला
तोंड द्यावे लागेल. विवाहेच्छूंनी कोणतीही घाई करू नका पण कामाकडे दुर्लक्षही करू नका. नोकरीत
कामाचा ताण वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो.
कन्या :–आरोग्याच्या बाबतीत अतिशय काळजी घ्यावी लागेल. एकत्र कुटुंबात महत्वाच्या विषयाच्या
बाबतीत एकवाक्यता होणार नाही. नोकरीत निर्माण झालेल्या समस्येस धाडसाने तोंड द्याल.
तूळ :–उद्धोग व्यवसायातील प्रगती समाधानकारक राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय
जागरूक राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना ा घरातीलच ज्येष्ठ व्यक्तीकडून मोलाचे मार्गदर्शन
मिळेल.
वृश्र्चिक :-आज-नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना अचानक
मानहानीला सामोरे जावे लागेल. संततीचे आजारपण काळजी वाढवेल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना
अचानक प्रचंड कामाचा तणाव येईल.
धनु :–आज नोकरीत कांही गोष्टी मनाविरुद्ध घडणार आहेत. हातात घेतलेली कामे, नवीन प्रोजेक्ट्स
यावर चर्चा केल्याशिवाय कामास सुरूवात करू नका. कुटुंबात तरूणांना आईवडीलांचा रोष ओढवून
घ्यावा लागेल.
मकर :–तरूणांना अचानक पित्तविकाराचा त्रास त्रास होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने विचार
करून निर्णय घेऊ नयेत पालकांचा, वडीलधार्यांचा सल्ला घ्यावा. समिक्षकांना व लेखकांना
वाचकांकडून टिका सहन करावी लागेल.
कुंभ :–सद्ध परिस्थितीतील तुमच्या व्यवसायातील कतृत्वाबद्धल व इतरांना करत असलेल्या
आर्थिक मदतीबद्दल तुमचे सर्वत्र जाहिर कौतुक होईल. कुटुंबातील गैरसमज चर्चेने सोडविण्यास
तुम्हाला स्वत:चा वेळ द्यावा लागेल.
मीन :–उद्धोग धंद्यातील वृद्धीसाठी नवीन योजना आखण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.
मित्रांबरोबर संबंध टिकवण्यासाठी मतभेदाचे रूपांतर वादात करू नये. कुटुंबातील सर्वानीच
सहविचाराने घेतलेला निर्णय महत्वाचा ठरेल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai