daily horoscope

बुधवार 28 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 28 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 28 एप्रिल चंद्ररास तूळ 11:56 पर्यंत व नंतर वृश्चिक.

चंद्रनक्षत्र विशाखा 17:13 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.

मेष :–प्रिय व्यक्तीचा किंवा व्यक्तीकडून गैरसमज होणार्‍या गोष्टी घडतील. वक्तृत्वकलेमधे माहिर असलेल्यांनी आँन
लाईन शिबिरे घेतल्यास खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आपले म्हणणे पटवण्यासाठी बुद्धीच्या जोरावर वाद घालू नका.

वृषभ :–तुम्ही योजलेल्या कामात सहकार्य न मिळाल्यामुळे कामात खोळंबा निर्माण होईल. भागिदाराच्या व्यवसायात
अचानक चांगली वसुली होईल व मोठ्या प्रमाणात आँर्डर्स मिळतील.

मिथुन :–जाहिरातीच्या माध्यमातून व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. सामाजिक विषयावरील व्याख्यानात किंवा
चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. महत्वाच्या कामात काहीही गती निर्माण होणार नाही.

कर्क :–चैन, मौजमजेवर आज खर्च होईल. नोकरीतील लहान सहान कारणावरून मतभेद उफाळून येतील. नोकरदार
मंडळीनी समंजसपणे विचार करूनच निर्णय घ्यावेत.

सिंह :–कुटुंबात व्यावहारिक गुंतागुंत वाढवणारे प्रश्र्न निर्माण होतील. नोकरीतील महिलांबरोबर पुरूष वर्ग कमीपणा ने
वागतील. तरूणांना आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल.

कन्या :–तरूणांना असलेली जूनी व्याधी पुन्हा सुरू झाल्याचे जाणवेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळण्यासाठी
इतरांचे मत महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज मित्रमंडळीत नाराजी राहील.

तूळ :–व्यवसायातील संशयात्मक आर्थिक व्यवहारातून चिंता निर्माण होईल. मुलाच्या विवाहाबाबतची प्रश्र्न अजूनही
अनुत्तरीतच राहतील. कलाकारांना सामाजिक पातळीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.

वृश्र्चिक :–कौटुंबिक मतभेदाचे मूळ आर्थिक व्यवहार हेच असणार आहे तरी त्यावरच उपाय शोधा. बुद्धिचातुर्यामुळे
घरविक्री व खरेदीबाबतचा निर्णय सहजपणे घेता येईल व तो अचूक निघेल.

धनु :–वृद्धाश्रमासाठी तुम्ही देणार असलेली मदत कारणी लागणार असल्याचे जाणवेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण
राहील व एखाद्या समारंभाचे आयोजन होईल. सरकारी कामातून फायदाचा विचार करू नका.

मकर :–राजकीय शत्रूपासून सावध रहावे व पुरावा नसलेल्या बाबींवर भाष्य करू नये. कायदेशीर बाबी निर्माण होतील.
कलाक्षेत्रात चांगले यश मिळून मानसन्मान मिळेल. लहान मुलांचा हुरूप व उत्साह वाढल्याचे जाणवेल.

कुंभ :–संततीची अभ्यासातील सातत्य व प्रगती पाहून मनाला समाधान वाटेल. तरूणांनी प्रकृतीच्या तक्रारी वर विचार
करावा. उत्तम असल्याचा आव आणू नये. घरगुती उद्धोगातून आर्थिक प्राप्ती चांगली होईल.

मीन :–दैनंदिन व्यवहारात अचानक अडचणी येउन कलह होईल. वयस्कर मंडळीनी जून्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. अति
दगदग व श्रमामुळे जेवणावर परिणाम होईल. भावंडाच्या वैवाहिक जीवनातील अडचणींची काळजी वाढेल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “बुधवार 28 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *