Read in
मंगळवार 27 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 26 एप्रिल चंद्ररास कन्या 12:32 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 23:06 पर्यंत व नंतर स्वाती..
आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज श्री हनुमान जयंती आहे. श्री हनुमानाचे पहाटे पूजन करावे व नैवेद्य द्यावा.
सूर्य मेष राशीत असताना चैत्र पौर्णिमेपासून. वैशाख पौर्णिमेपर्यंत हे स्नान करावयाचे आहे. वैशाख स्नानास आरंभ
करताना श्री विष्णु स्मरण महत्वाचे आहे. हे स्नान नदी, महानदी, तीर्थक्षेत्र, अशा ठिकाणी करावे असे शास्त्रात आहे. पण
सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात हे शक्य नसल्याने स्नान करताना हेच विष्णु तीर्थ आहे असा उच्चार करावा.
कारण सर्वत्र तीर्थाची देवता विष्णुच आहे. म्हणून वैशाख पौर्णिमेपर्यंत सूर्योदयापूर्वी वैशाख स्नान करावे. हे वैशाख स्नान
पुण्यफल देणारे तर आहेच पण त्याचबरोबर आरोग्यदायी पण आहे. याच्यामागे आपल्या ऋषिमुनींनी काही वैज्ञानिक
विचार नक्कीच केला असणार. तसेच या वैशख पौर्णिमेपर्यंत आळस झटकून एकभुक्त, नक्त राहील तो पण आरोग्य
सुधारेल. चला आपण हे व्रत पाळून या कोरोनाच्या काळात आरोग्यप्राप्ती मिळवुया.
ज्यांना हे स्नान करणे शक्य नाही किंवा शक्ती नसेल त्यांनी किमान त्रयोदशी, चतुर्दशी व पौर्णिमा या तीन दिवशी तरी
यथाविधी नियमाने पहाटे स्नान करावे व श्री विष्णु चे स्मरण करावे.
मेष:–तुमच्या बोलण्यातील कौशल्याची जाण असणार्या कडून तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून
बोलावणे येईल. नोकरीतील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कामासाठी तुमची केलेली निवड सार्थ ठरेल.
वृषभ :–महिलांना नोकरीच्या कामात आज चांगलीच बाजी मारता येणार आहे. एकत्र कुटुंबातील महत्वाच्या कामाची
जबाबदारी तुमच्यावर दिली जाईल. आजच्या सकाळपासून कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहणार आहे.
मिथुन :–विद्यार्थ्यांनी आपले अवघड जाणारे विषय पालकांना स्पष्टपणे सांगावेत. परदेशी रहात असलेल्यांची
आईवडीलांकडे ओढ राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे.
कर्क :–आज कौटुंबिक साथ चांगली मिळाल्यामुळे कोणतेही अवघड काम करण्चा उत्साह राहील. आर्थिक गणिताच्या
बाबतीत काटेकोर राहिल्याने मनासारखी बचत करता आल्याचा आनंद मिळेल.
सिंह :–आज प्रत्येक कामात दगदग जास्त व काम कमी होत असल्याचे जाणवेल. संततीच्या आरोग्याची आधीच काळजी
घेतल्यास नंतरची धावपळ वाचेल. लहान मुलांच्या हाताला कात्री, सुरी सारख्या वस्तुपासून लागण्याचा धोका आहे.
कन्या :–कुटुंबात मुलाच्या विवाहाच्या बाबतीत सकारात्मक वाटाघाटी होतील. तरी पतीपत्नीनी एकवाक्यता ठेवणे
महत्वाचे ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.
तूळ :–राजकीय व व्यावसायिक विरोधकांपासून सावध रहावे लागेल. विरोधकांचा छुपा त्रास संभवतो. जावई बुवांची
सासुबाईंबरोबरील चर्चा फलद्रूप होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवून ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
वृश्र्चिक :–जूने पायाचे व माकडहाडाचे दुखणे त्रासदायक होईल. महिलांनी गुडघ्याच्या त्रासावर ईलाज करण्याची वेळ
आलेली आहे अंगावर काढू नये. तरूणांना व्यायामाचे महत्व पटेल.
धनु :–ज्येष्ठ महिलांना मासिक धर्माचा किंवा मेनोपाँजचा त्रास होऊ लागेल. तरूण मुलामुलीना मायग्रेनचा त्रास कमी
होत असल्याचे जाणवेल. कलाकारांना गायन, कीर्तनातील आवड वाढून ते शिकावेसे वाटेल
मकर :– बँकेच्या व्यवहारातील स्वत:ची कामे स्वत:च करावीत. व्यवसायातील व्यवहारात चेक देण्याघेण्यात गडबड
होणार नाही याची दक्षता घ्या. चेकवरील सहीचाही गोंधळ होण्याची शक्यता आहे.
कुंभ :–कुटुंबातील लहान मुलामुलींच्या पडण्याधडपडणंयामुळे दवाखान्यात अँडमिट करण्याचा प्रसंग येईल. अती
महत्वाच्या कामाव्यतिरीक्त प्रवासाचा व्याप करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत विचारात
घेतल्यास नवीनच मार्ग सापडेल.
मीन :–सर्दी, ताप किंवा तत्सम आजाराचा त्रास होणार आहे. वडिलांसाटी त्यांच्या आवडत्या वस्तूची खरेदी कराल. आर्थिक
बाबतीत नियोजनाचे महत्व पटेल. मुलांच्या इच्छा अपेक्षा आनंदाने पूर्ण कराल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai