Read in
सोमवार 26 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 26 एप्रिल चंद्ररास कन्या 12:32 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 23:06 पर्यंत व नंतर स्वाती..
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मंगळवारी श्री हनुमान जयंती आहे तरी त्याचा उपवास आज करावयाचा आहे. आज कुळधर्म कुळाचार करून सर्व देवांना
दवणा वहावा.
मेष :–उष्णतेचे त्रास होउ नये म्हणून काळजी घ्यावी. तुमच्या अंतर्मनातील दुसर्यांबद्धलचे विचार व्यक्त करताना शब्द
जपून वापरावे लागतील. महिलांना मासिक धर्माचा किंवा मेनोपाँजचा त्रास संभवतो.
वृषभ :–संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मंत्रशास्त्राचा अभ्यास करणार्यांनी आपला अभ्यास अतिशय
शांतपणे सुरू ठेवावा त्याचा स्वत: वापर करून अनुभव घ्यावा पण बाजार करू नये. वयस्कर मंडळीनी मेडीटेशनच्या
अभ्यासाचा अतीरेक करू नये.
मिथुन :–घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घ्या. दुध दुभत्या जनावरांना एखादा आजारपणाचा त्रास
होईल त्यांच्या जखमा तपासाव्यात. आज गुंतवणूक , किंवा पैसे जास्त मिळण्याच्या मोहापायी आर्थिक व्यवहार करू नये.
कर्क :–बर्याच दिवसापासून तुम्ही तुमची जी आवश्यक माहिती पाठवलेली नाही ती आज आत्ता लगेच पाठवा. संधी पुन्हा
पुन्हा येत नाही. नोकरीत बदलीच्या ठिकाणी व अडिशनल जबाबदारीवर काम करावे लागणार आहे.
सिंह :–उत्साहाच्या भरात न झेपणारे काम अंगावर घ्याल. व्यवसायाबाबतच्या मनातील योजना जवळच्या मित्रमंडळींच्या
मदतीने प्रत्यक्षात साकारता येणार आहेत पण त्यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. कोणत्याही अत्यावश्यक
कारणाशिवाय प्रवास करू नका.
कन्या :–नवीन आतात आलेले काम पुन्हा एकदा विचार करूनच स्विकारा, नंतर त्याबाबतच्या शंका काढत बसू नका.
घरातील ज्येष्ठ मंडळीतील आर्थिक चर्चेत तुम्ही सहभाग घेउ नका. संततीच्या अभ्यासातील प्रगतीबाबत स्वत: प्रयत्न
करण्याची गरज आहे.
तूळ :–मला काहीही होत नाही या बेफिकीरी मुळे आजारपण अंगावर ओढवून घ्याल. सरकारी कामातील दिरंगाई बद्धल
काय करावे हे तज्ञांना विचारून करा. व्यवसायातील आर्थिक गणिते आनंद देतील.
वृश्र्चिक :–आपण कळत नकळत इतरांबरोबर जे वागत आहात त्याचा मानसिक त्रास सुरू होईल. वागण्यात पारदर्शकता
ठेवा. राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास होणार आहे तरीही शांत राहण्याचा प्रयत्न करावा.
धनु :–वाडवडिलांच्या कृपेने मोठ्या संकटातून वाचाल तरी संकट अंगावर ओढवून घेऊ नका. इतरांची जबाबदारी
स्विकारताना प्रथम स्वत:ची क्षमता आहे का ते तपासा. आज तुम्हाला श्री दत्तमहाराजांच्या कृपेचा अनुभव येईल.
मकर :–पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून व्यवसायात कमी पडणारी मदत मिळेल किंवा त्यांच्या व्यवसायात सामावून
घेण्याचा प्रस्ताव येईल. लहानशा गुंतवणूकीतून घरगुती उद्धोगातून चांगली आर्थिक प्राप्ती होत असल्याचे जाणवेल.
कुंभ :–आजच्या सकाळी सकाळीच आनंदाची बातमी कळेल. वैवाहिक जोडीदार व व्यवसायातील भागिदार दोघांकडूनही
अपेक्षित मदतीचा हात मिळेल. तरूणांनी आत्मविश्वासाने कामाला सुरूवात केल्यास चांगला टप्पा गाठाल.
मीन :–व्यवसाय सोडून नोकरी करू कि नोकरी सोडून व्यवसाय करू अशी द्विधा मनस्थिती होईल. पूर्वी केलेल्या
गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल तरी त्याचा वापर कसा करायचा हे मात्र स्वत:च्या एकट्याच्या निर्णयाने ठरवू नका.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai