Read in
रविवार 25 एप्रिल 2021 ते शनिवार 01 मे 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 25 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 25:24 पर्यंत व नंतर त्चित्रा.
सोमवार 26 चंद्ररास कन्या
12:32 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 23:06 पर्यंत व नंतर स्वाती. मंगळवार 27 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र
स्वाती 20:08 पर्यंत वनंतर विशाखा. बुधवार 28 चंद्ररास तूळ 11:56 पर्यंत व नंतर वृश्चिक, चंद्रनक्षत्र विशाखा 17:13
पर्यंत व नंतर अनुराधा. गुरूवार 29 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 14 :29 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
शुक्रवार 30 चंद्ररास वृश्र्चिक 12:07 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12:07 पर्यंत व नंतर मूळ. शनिवार 01 मे
चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 10:15 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
वरील राशीचा व नक्षत्रांचा विचार करून रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
25 रविवार महावीर जयंती., महादेवाला दवणा वाहणे.
26 सोमवार सर्व देवांना दवणा वाहणे. श्री हनुमान जयंतीचा उपवास.
27 मंगळवार श्री हनुमान जयंती. वैशाख स्नानारंभ. छत्रपति शिवाजी महाराज पुण्यतिथी.
30 शुक्रवार संकष्ट चतुर्थी. मुंबई चंद्रोदय 22:40.
01 मे शनिवार महाराष्ट दिन, श्री चंद्रला देवीचा उत्सव.
मेष :–व्यवसाय उद्धोगातील तसेच घरगुती व्यवसायातील वृद्धीसाठी मोठ्या संस्थांबरोबर संपर्क साधल्यास या
सप्ताहात तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. कोणत्याही कारणाने “ नको करायला “ हा विचार झटकून टाका.
जाहिरातीच्या क्षेत्रात विनाकारण मोठ्या कामाचे खर्च काढू नका.सोशल मिडीया चा चांगला उपयोग करून घेऊ शकाल.
वैवाहिक जीवनातील न पटणार्या गोष्टींबाबत अती तणाव निर्माण केल्यास करून मानसिक त्रास करून घ्याल.
मनातील वैयक्तिक विचारांना इतरांसमोर बाहेर येऊ देऊ नका. मित्रमंडळीमधे एखादी पैज लावली असेल तर नक्की
तुम्हीच जिंकणार आहात. तरूणांना पचनसंस्थेच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. आर्थिक नियोजनाच्या अचूक अंदाजामुळे
हा सप्ताह कुटुंबातही शांततेचा जाईल.
वृषभ :–शाळकरी मुलांच्या परिक्षा रद्ध झाल्याने त्यांना त्यांच्या छंदाला व कलेला वेळ देता येणार आहे. पालकांनी मुलांना
मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य व कला छंद जोपासण्याचे स्वातंत्र्य द्यावे. वयस्कर व तज्ञ मंडळीनी आपली मते
व्यक्त करताना डायरेक्ट विषयाला हात न घालता सुन मुलाच्या माध्यमातून नातव़डा़पर्यंत पोचतील याची दक्षता घ्यावी.
वडिलांच्या नोकरीत अचानक अडचणी निर्माण होण्याचा धोका आहे. ओबिस मंडळीनी बारीक होण्याच्या नावाखाली
कुपोषित राहूनये. तसेच व्यायामाचाही अतिरेक करू नये. प्रेमविवाहाच्या बाबतीत विनाकारण तुम्हीच खुसपट काढू
नका.महिलांच्या मांड्या, पाय दुखीचा भरपूर त्रास होणार आहे. तरूणांना आपल्या आवडी निवडी जपण्याचे स्वातंत्र्य
मिळेल.
मिथुन :–आजपर्यंत यथा यथाच अभ्यास करणारे विद्यार्थी अचानक समजूतदारपणे वागू लागतील. नवीन वर्षाचा
अभ्यास, नवीन वर्षाचा क्लास यामधील उत्साह द्विगुणित होईल. नोकरीच्या कामात नवीन योजनाबाबतचे तुमचे अंदाज
बरोबर ठरतील व त्यांना वरिष्ठांकडून आवश्यक ती मंजूरी मिळेल. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबत यू ट्युबच्या
माध्यामातून एखादा कार्यक्रम करता येणार आहे. गायक मुलामुलींना आपल्या कलेचे जाहीर प्रदर्शन करता येईल व
लोकांकडून भरभरून दादही मिळेल. कोणतेही संकट सांगून येत नाही तरी लहानश्या संकटाला मोठे करून स्वत:चे हसे
करून घेऊ नका.
कर्क :–या सप्ताहात तुम्हाला चांगला आराम मिळणार आहे. कोणत्याही लहानश्या कारणानेही तुमचा आनंद द्विगुणित
करणार्या घटना घडतील. पुढील वर्षाच्या अभ्यासाचा आराखडा करून देण्यास मामाजींचे आगमन होईल. व कुटुंबात
आनंदी आनंद होईल आईच्या मैत्रिणींच्या घोळक्यात तुमच्या बुद्धीचे व कलेचे ही कौतुक होईल. तुमच्यासाठी हा सप्ताह
कौतुकाचा ठरणार आहे. पतीपत्नीमधील वादाचे मुद्धे मामाजींच्या हस्तक्षेपाने विरघळून जातील. न्यायालयीन
कामकाजातील अडचणी सोडवण्यासाठी वकिलांची मदत न घेता कारभार करू नका. नोकरीतील तुम्ही करत असलेल्या
कार्यात तुमच्या कर्तृत्वाने अपेक्षित बदल घडत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी लहानशा प्रवास करावा
लागेल.
सिंह :–नोकरी व्यवसायातून होणारा लाभ आश्र्चर्यकारक राहील. घरगुती उद्धोगातील भांडवलाची आपोआप सोय होईल
किंवा तुम्ही बँकेकडे मागितलेले कर्ज सहजपणे मंजूर होईल. संततीच्या प्रगतीच्या दिशेने होणारी वाटचाल समाधानकारक
राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय काळजीपूर्वक वागावे. गेल्या आठदिवसापासूनची परिस्थिती आता बदलू
लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल व कामातून वेगळाच अनुभव येईल. तरूणांनी त्यांची विचार
करण्याची पद्धत बदलल्यास व्यवहारात अनेक प्रकारे सोपेपणा येईल. अवघड वाटणारी कामेही सोपी वाटू लागतील.
कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या वाढदिवसानिमित्त एखादा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
कन्या :–मनातील भिती वाटणार्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका. भित्यापोटी ब्रह्मराक्षस असतो हे लक्षात घ्या.
कोणत्याही परिस्थितीत विवाहाच्या बाबतीत बेफिकीर राहू नका सर्व माहिती घेतल्यावरच पुढे जा. नोकरीत इतरांबरोबर
जुळवून घेतल्यास काम सोपे होईल. जूना व्याधींचा, कफ विकाराचा त्रास संभवतो तरी जराही अपथ्य करू नका. कुटुंबातील
ज्येष्ठांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केल्याने जे नुकसान होईल त्याचा मनस्ताप मोठा असेल. कुटुंबातील मुलींच्या विचारांना
समजून घेऊन त्यावर विचार करा. भावनेच्या भरात आर्थिक व्यवहार केल्याने खर्चाला आवर घालता येणार नाही. अवघड
वाटलेल्या समस्यां चर्चेने सोडवता येणार आहेत.
तूळ :–व्यावसायिकांनी स्वतंत्रपणे विचार करावा इतरांच्या दडपणामुळे कांही कराल तर नुकसान संभवते. घरगुती
जबाबदार्या तणावपूर्वक राहतील तरी इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. घरगुती उद्धोगातून अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती
होईल. सरकारी नोकरदारांना अतिशय क्लिष्ट अशा कामाची जबाबदारी दिली जाईल. पूर्ण अभ्यासाने वरिष्ठांच्या
सल्ल्यानेच काम करा. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महिलांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू
होईल. तसेच अंगदुखीचाही त्रास जाणवेल. जून्या वस्तूच्या व्यवहाराचा प्रश्र्न मार्गी लागेल.
वृश्र्चिक :–विवाहित तरूणांना या सप्ताहात एकमेकास वेळ देता येणार आहे. वैचारिक चर्चेऐवजी पति-पत्नी एखादी गिफ्ट
देऊन प्रेम व आदर व्यक्त करतील. नव्याने गुंतवणूक करणार्यांनी तज्ञांच्या सल्ल्याने करावी. या सप्ताहात नोकरदार
मंडळी स्वत:ला कामात झोकून देतील. इतरांच्या मदतीची जराही अपेक्षा न करता कामे पूर्ण करण्याचा ध्यास घेतील.
महिलांना माहेरील नात्याची चौकशी करणे गरजेचे आहे. मामाकडील आजारपण मानसिक क्लेश वाढवेल. जून्या घराच्या
भाडेकरूंबरोबर तात्विक मतभेद होतील. महिलांना अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल.
धनु :–हा सप्ताह तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीची भेट करू देणारा ठरेल. विशेषतः महिलांना माहेरील नात्याकडील
मंडळींची भेट होईल. मार्केटींग व सेल्स विभागात काम करणार्यांना अचानक मोठ्या प्रमाणात काम होत असल्याचे
जाणवेल. तरूण पुरूष वर्गाने होता होईल तेवढे शांत राहण्याचे ठरवल्यास कोणाबरोबरही संबंध बिघडणार नाहीत व
कामातही सहकार्यांची मदत मिळेल. गर्भवती महिलांच्या प्रकृतीच्या तक्रारीवर ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्यावा
बेफिकीरी नको. 10 वर्षाच्या आतील मुलामुलींना द्रवपदार्थाचे सेवन करण्याकडे, पाणी, नारळपाणी पिण्याकडे विशेष लक्ष
द्या. युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो.
मकर :–नोकरदार मंडळीना आपली तत्परता व कामातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. लेखकांना सामाजिक
विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवले जाईल तर शिक्षकांचा त्यातील सहभाग महत्वाचा राहील. टेक्निकल क्षेत्रात काम
करणार्यांना अनेक ठिकाणाहून मागणी येईल. कँलिग्राफी, चित्रकार, रांगोळी काढणारे यांना सोशल मिडियातून फार
मोठा रिसपाँन्स मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल व एकमेकांच्या संबंधातून ज्ञानी
व्यक्तीबरोबर भेट होईल. लहान भावंडांबरोबर च्या व्यवसायातील जबाबदारी उत्तम रितीने फार पडत असल्याने व्यवसाय
वृद्धी चांगली होईल.
कुंभ :–वयस्कर मंडळीना साथीच्या रोगाचा त्रास संभवतो तरी प्रिकाँशनरी काळजी घेणे महत्वाचे आहे. गाड्या दुरूस्तीच्या
गँरेजमधे काम करणार्यांना एखादी मोठी दुखापत होईल तरी काळजी घ्या. विजेवर चालणार्या वस्तू काळजीपूर्वक
हाताळा.आज नव्याने कोणतेही महत्वाचे काम करताना घाई करू नका. लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊन ताप येईल.
तसेच वयस्कर मंडळीना उन्हात गेल्यास चक्कर येण्याचा धोका आहे. मधुमेही महिलांनी शुगर चेक केल्यास वेळीच
परिस्थिती आटोक्यात आणता येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर असलेल्या जबाबदार्या वेळेवर फार पाडाव्या
अन्यथा आपल्या पदाकडे बोट दाखवले जाईल.
मीन :–एकदा घेतलेल्या निर्णयात पुन: पुन: बदल करावा लागेल. संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार्या , पी. . एच. डी.
करणार्यांना आपल्या कंसेप्टस योग्य असल्याचा अनुभन आल्याने खूप आनंद होईल. परदेशी राहणार्या तरूणांनी
आपल्या आईवडीलांबरोबर मनमोकळेपणाने चर्चा करावी. व्यसनापासून दूर राहण्यासाठी निछ्चय केल्यास तुम्हाला
प्रकृतीची भिती राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना अचानक कामातील ताण वाढल्याचे जाणवेल.जवळच्या
नातेवाईकांच्या अपेक्षांना तुमच्याकडून दाद न दिल्याने वाद निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी व शांत
राखण्याचा प्रयत्न करा.
||शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai