daily horoscope

शनिवार 24 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार  24  एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार  24  एप्रिल. आज चंद्ररास सिंह 11:55  पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी  06:21  पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.

वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज शनिप्रदोष आहे. वामन जयंती असून विष्णूला दवणा वाहण्याचा दिवस आहे.

मेष :–नोकरीतील अडचणींचा  विचार नोकरी सोडण्यापर्यंत, बदलण्यापर्यंत करू नका. प्रश्र्न शांतपणे हाताळल्यास वरिष्ठांचा गैरसमज होणार नाही. तसेच सहकारी वर्गाकडून ही चांगली मदत  मिळेल. शक्यतो वादविवाद टाळा.

वृषभ :–व्यापार व्यवसायात अचानक आर्थिक आवक होणार नाही. कुटुंबात धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात येईल. नोकरीतही कष्टकारक व दगदगीची परिस्थिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे.

मिथुन :–व्यापार व्यवसायातील परिस्थिती अचानक आर्थिक बाजू उंचावेल. इस्टेट एजंट, कमिशन चे व्यवसाय असलेल्याना आर्थिक प्राप्ती चांगली होईल. वडीलांच्या विचाराने केलेल्या गोष्टीत चांगले लाभ होतील.

कर्क :–उद्धोग व्यवसायात स्वत:हून नवीन मार्ग वापरावा लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपले अधिकार वापरताना दहा वेळा विचार करावा. वाहन चालवणार्‍यांना अचानक पेनल्टी भरावी लागेल.

सिंह :–नवीन नोकरीतील फंडे, नियम सुरूवातीला जाचक वाटतील  तरी विचारात सकारात्मकता ठेवावी. शाळकरी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाबाबतची यशाची खात्री देता येणार नाही. जमेल तितके पालकांनी मार्गदर्शन करावे.

कन्या :–नोकरीत तुमच्या बाजूने लाभदायक ठरणार्या घटना घडतील. आरोग्याच्या बाबतीत तुमची प्रकृती तोळामासा राहील. लहान भावंडाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

तूळ :-  तुमच्या स्वकर्तृत्वावर विश्र्वास ठेवून व्यावहारिक गोष्टी हाताळल्या तर  व्यवसाय विस्ताराला मदत मिळेल. कुटुंबात श्रीकुलदेवतेच्या नावाने पूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात येईल. व्यवसायाच्या जाहिरातीसाठी सोशल मिडियाची मदत घ्या.

वृश्र्चिक :– न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेले दावे न्यायालयाच्या बाहेर सुटण्याचे निरोप येथील. अहंपणाने ताणून धरू नका. घरातील वयस्कर मंडळीना मनोरंजनाचे एखादे साधन उपलब्ध करून द्यावे लागेल.

धनु :–प्रवास कितीही आवश्यक असला तरी लहान मुलांना नेऊ नका. विद्यार्थ्यांला आर्थिक मदत द्यावी लागेल. औषधांच्या दुकानात काम करणार्या फार्मासिस्टनी प्रिस्क्रीप्शन काळजीपूर्वक वाचून औषधे द्यावीत. 

मकर :–घराचे सौंदर्य वाढवण्याकरिता इंटिरीयर डेकोरेटरची साथ घ्याल.  लहान मुलांच्या पायाला दुखापत होण्याचा धोका आहे. मनाने कितीही कडक असलात तरी परिस्थिती नुसार तुम्हाला मृदु बनावे  लागेल. 

कुंभ :–जीवनाकडे बघण्याचा गंभीर दृष्टीकोन सोडून द्या. अहंकार आणि मोठेपणामुळे जवळचे मित्र दुखावले जातील. प्रेमाच्या व्यवहारात  मवाळपणाने वागल्यास  एकमेकाबद्धल राग निर्माण होणार नाही. 

मीन :–तुमच्या हातून बिघडलेल्या कामासाठी इतरांना जबाबदार धरू नका. लाचलुचपत सारख्या विषयापासून दूर रहा. मानसिक ताण वाढवणारी परिस्थिती टाळणे तुम्हाला  शक्य आहे.  बँकेचे व्यवहार इतरांवर सोपवू नका. 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शनिवार 24 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *