Read in
शुक्रवार. 23 एप्रिल. 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 23 एप्रिल चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 07:41 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज कामदा एकादशी असून श्रीकृष्ण दोलोत्सव आहे. ज्यांचे कुलदैवत श्रीविष्णू , श्री प्रभूरामचंद्रानी तसेच ज्यांची भक्ती पंढरीनाथावर आहे त्यांनी आज त्यां देवताना व भगवान श्रीकृष्णाला दवणा वाहून दोलोत्सव करावा.
मेष :–काव्य वाचन, वक्तृत्व यात विद्यार्थी वर्गाकडून कौतुकास्पद कार्य होईल. आँन लाईन शिकवणार्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे शिक्षकांचा उत्साह वाढेल. प्रेमविवावहातील अडचणीत वाढ होणार आहे.
वृषभ :–पत्नीच्या व्यवसायात पतिराजांकडून सोशल मीडियातील नवीन टेक्निक्स कळतील. तरूणांच्या मनातील अस्वस्थता कमी होऊन उत्साहात वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा गोष्टीना सकारात्मक वळण मिळेल.
मिथुन :–अर्धवट माहितीवरून कोणत्याही नवीन कामाबाबतचा करार करण्याचा निर्णय घेऊ नका. परदेशस्थ व्यक्तींच्या व्हिसाचा प्रश्र्न मार्गी लागण्याची माहिती मिळेल व काळजी संपेल. व्यावहारिक पातळीवर बोलताना अविचाराने बोलू नका.
कर्क :–आज तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत तुम्हाला बदल करावा लागेल. माझेच खरे हा हट्ट सोडून द्या. आज तुम्हाला झोप आवरणार नाही. श्री दत्तगुरूंच्या कृपेने नोकरीत सहज बोलताना सन्मानाचा प्रसंग येईल.
सिंह :–आज व उद्या प्रकृतीचा त्रास संभवतो तरी बेफिकीर राहू नये. फँमिली डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. महिलांना सासरच्या ज्येष्ठ व्यक्तीकडून एखादी मौल्यवान भेट मिळेल. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पुढील वर्षासाठीचे नियोजन आत्ताच केल्यास खात्रीने यश मिळेल.
कन्या :–वैवाहिक जीवनातील वाद इतरांच्या हस्तक्षेपामुळे वाढतील तरी सावध रहावे. गुप्त गोष्टींची वाच्यता केल्याने काम यशस्वी होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका
तूळ :–निवडणूकीबाबतच्या गुप्त गोष्टींची केलेली वाच्यता मानसिक त्रासदायक ठरेल. . आजच्या दैनंदिन कामात वेळ पाळावी लागेल. तुमच्या आजच्या कामावर ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल.
वृश्र्चिक :–राजकीय मंडळीनी भाषणात किंवा मिटींगमधे आज कोणतेही आश्र्वासन देऊ नये. अपेक्षित बाबींची पूर्तता करताना आज फारच फजिती होणार आहे. कोर्टातील कामासाठी स्वत: हजर रहा.
धनु :–स्वत:च्या कर्तृत्वाचा व क्षमतेचा अनुभव येईल. आज फक्त विचारच करत बसलात तर काम कधीच सुरू होणार नाही. आळशी मित्रमंडळींबरोबर केलेली चर्चा फलद्रूप होणार नाही.
मकर :–वडिलांकडील नात्यातील ज्येष्ठ व्यक्तीचा सहवास आनंददायी राहील. सध्या मनात बाळगलेले खरेदीचे विचार सोडून द्यावे लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रम अचानक पुढे ढकलला जाईल.
कुंभ :–आज तुमच्या दैनंदिन कामातही कष्टाचे प्रमाण वाढेल. तुम्ही शिकत असलेल्या विषयातील अडचणी दूर करणार्या गुरूबरोबर भेट होईल. द्वितीय संततीबरोबरील मनातील विचारांची देवाणघेवाण केल्यास तुम्हाला बरे वाटेल.
मीन :–कुटुंबातील आदर्श व्यक्तीमत्वाचा आदर वाटून तुमच्याही विचारात बदल होईल. आपल्या वागण्यातून मित्रपरिवारात चुकीचा समज पसरणार नाही याची दखल घ्यावी लागेल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai