Read in
गुरूवार 22 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 22 एप्रिल चंद्ररास कर्क 08:14 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:14 पर्यंत व नंतर मघा.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–फुलझाडांच्या नर्सरीच्या व्यवसायात एकदम चांगली प्राप्ती होईल. मानसिक बळाच्या जोरावर महिलाना आजपर्यंत अवघड वाटणारे कामही सोपे वाटेल. पाठ, पाठीचा कणा दुखणार्यांनी दुर्लक्ष न करता योग्य तो वेळीच इलाज करावा.
वृषभ :–भाड्याने जागा घेत असाल तरीही नवीन करार करतानाच्या अटी पुन: पुन: वाचून बघा. वृद्धाश्रमातील कार्यक्रमासाठी तुम्हाला तेथे भेट देण्याची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना प्रक्षोभक विषयावरील विचारामुळे वादंगास तोंड द्यावे लागेल.
मिथुन. :–अचानक विचार न करता इतरांच्या मताशी सहमत होत असाल तर तसे करू नका. सद्सद्विवेकबुद्धीने विचार करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपल्या व्यवहारातील पारदर्शकता पाळावी. स्वार्थी लोकांच्या शब्दात फसू नका.
कर्क :–आजचा दिवस आनंदाचा उत्साहाचा राहणार आहे. पुरूष मंडळीनी अचानक कोणत्याच कर्ज प्रकरणात हात घालू नये. तरूण मुलीनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी व्यक्त होताना विचार करावा.
सिंह :–अविचाराने केलेल्या खरेदीमुळे नुकसान होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करा. मुले व तरूणांच्या चुकांमुळे वाहन चालवताना दंड भरावा लागेल. सरकारी कामात अडचण निर्माण करू नका.
कन्या :–कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांनी बिघडणार नाही याचा विचार करा. भावनेच्या भरात आर्थिक नुकसान करून घ्याल. मनातील विचारांना जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त केल्यास परिस्थितीतून मार्ग निघेल.
तूळ :–समोरच्या माणसांची नीट पारख केल्याशिवाय कोणताच व्यवहार करू नका. कोर्ट कचेरीच्या कामात घाई न करता मुद्धाम लांबच्या तारखा घेतल्यास मध्यम मार्ग निघेल. महिलांना असुक्षततेची भावना त्रासदायक ठरेल.
वृश्र्चिक :–कोणतेही धाडस करताना अती घाई करू नका.तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला अचानक लाभ होणार आहे. व्यावसायिकांना आपल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्याकरता सोशल मिडीयाचा वापर करावा लागेल.
धनु :– शांतपणे केलेल्या विचाराला योग्य वळण मिळेल. महिलांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी मध्यस्थाची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी आपले म्हणणे थेट न बोलता गोड पद्धतीने सांगावे. लहान मुलांच्या हातून महत्वाची वस्तू हरवण्याचा धोका आहे.
मकर :–तिर्थ क्षेत्रावरून आलेल्या संत महात्म्याच्या दर्शनाचा लाभ होईल. तरूणांना नाकातील हाड वाढल्याचा जूना त्रास पुन्हा डोके वर काढेल. श्री गजाननाच्या कृपेने आजारी व हाँस्पिटल मधे असलेल्यांना उतार पडू लागेल.
कुंभ :–बिना परवाना गाडी चालविल्याबद्दल दंड भरावा लागेल. सरकारी क्षेत्रातील अधिकार्यांबरोबर वाद घालणे महागात पडेल. वयस्कर मंडळीना झोप न लागण्याचा त्रास होऊन ब्लडप्रेशर वाढेल. लहान मुलांच्या पायाला दुखापत होण्याचा धोका आहे.
मीन :–विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे जाणवेल. शिक्षक प्रोफेसर मंडळीना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. महिलांना अपचनाचा व डोकेदुखीचा त्रास जाणवेल. गर्भवती महिलांना आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळेल.
| शुभं-भवतु ||