Read in
बुधवार 21 एप्रिल 2021 अशी करा रामरक्षेतील अमृतमंत्रांची साधना !
|| बुधवार 21 एप्रिल 2021 चैत्र शुक्ल नवमी श्री रामनवमी ||
संकटमुक्त होण्याकरीता श्री रामरक्षेतील कोणकोणत्या मंत्रांची उपासना कशी करावी याची माहिती.
बुधवार 21 एप्रिल आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य सकाळी 07:58 पर्यंत व नंतर आश्लेषा. आज चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच पुरूषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस.
आज श्री रामनवमी असल्याने आज प्रत्येक व्यक्तीनी काय करावे याचीच माहिती देत आहे. आपण करणार असलेल्या कार्यास श्री प्रभूरामचंद्रांचा आशिर्वाद मिळण्यासाठी प्रार्थना करूया व विश्र्वकल्याण्यासाठी व स्वत:च्या व सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी वरदान मागुया.
- स्वत:चे व इतरांचे पण ज्यात हित आहे असेच कार्य करा. वडिलांना विष्णूसमान मानून त्यांच्यासाठी आनंद निर्माण करणारी कार्येच करून प्रत्यक्ष आशिर्वाद घेतल्यास आयुष्यातील अडचणी संपून जातील.
- पतीपत्नीमधील दुरावा संपवण्यासाठी रोज रामरक्षेतील बीजमंत्र म्हणण्याचा संकल्प करा. वरील दोन्ही कारणांसाठी पुढील मंत्रांचे किमान एक आवर्तन करावे.
आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदाम् | लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम् ||
**********
- आत्मज्ञान, मोक्षप्राप्तीसाठी , आध्यात्मिक विकास यासाठी श्री विष्णूसहस्रनामाचा संकल्प करून उपासना करावी.
|| ॐ विष्णवे नम: ||
**********
- श्री प्रभूरामचंद्रांच्या कृपेने तुमच्या हालअपेष्टा संपून इच्छापूर्ती होण्यासाठी श्री प्रभूरामचंद्रांच्या पुढील श्र्लोकाचा रोज जप करा.
माता रामो मत्पिता रामचंद्र: | स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: |
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु: | नान्यं जाने नैव जाने न जाने ||
**********
- नोकरी न लागणे , पगार वेळेवर न मिळणे, विवाहात अडचणी येणे या संकटांनी ग्रस्त झालेल्यांनी प्रभूरामचंद्रांना शरण जाऊन पुढील मंत्रीची उपासना करावी.
- नवीन घर , नोकरीतील बदला साठी प्रयत्न करत करूनही काम होत नसेल तर त्यांनी पुढील श्र्लोकाचे रोज पाठ करावेत.
आराम: कल्पवृक्षाणां विराम: सकलापदाम् |
अभिरामस्त्रिलोकानां राम: श्रीमान् स न: प्रभु: ||
**********
- मातेचे आजारपण कमी होऊन मातृसुख मिळण्यासाठी व भौतिक अधिभौतिक सुखाची प्राप्ती होण्यासाठी पुढील मंत्रांची उपासना व पाठ करावेत.
|| श्री राम जय राम जय जय राम ||
***********
- ज्यांच्या वंशवृद्धीमधे अडचणी येत आहेत व संततीची प्राप्ती होत नाही किंवा ज्या महिलांचे वारंवार गर्भपात होतात अशा दांपत्यानी पुढील मंत्रांची उपासना करावी लवकर अपेक्षापूर्तीसाठी याचे पाठ करावेत.
एतां रामबलोपेतां रक्षां य: सुकृती पठेत् |
स चिरायु: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ||
************
- सततचे आजारपण, वैवाहिक जीवनातील अडचणी व संघर्ष सोडवण्यासाठी व नोकरीतील स्थिरतेसाठी पुढील मंत्रांची उपासना करावी.
रामरक्षा पठेत्प्राज्ञ : पापघ्नीं सर्वकामदाम् |
शिरो मे राघव : पातु भालं दशरथात्मज: ||
***********
- व्यवसायातील अडचणींवर मात करून व्यवसाय वृद्धी करण्यासाठी व वैवाहिक अडचणीतून मार्ग निघण्यासाठी संपूर्ण रामरक्षेतील मंत्र रोज एकदा म्हणावेत.
- कोणतेही कारण नसताना दुख: पाठ सोडत नसेल तर, दारिद्र्य दूर होत नसेल, सतत कोणतीतरी संकटे येत असतील तर घरी श्री प्रभूरामचंद्राची प्रतिमा ठेवून त्यांच्या समोर बसून रोज श्री रामरक्षेचे पठण करावे. त्याच्या समोर तेला तुपाचा जो शक्य असेल तो दिवा लावावा. कांहीही शक्य नसेल त्यांनी मानसपूजा करून श्री रामरक्षेचे पाठ करावेत खात्रीने तुमच्या समस्यांचे निवारण होईल. प्रथम पाठ गुरूवारी सुरू करावा. ज्यांना वाचनही शक्य नाही , शरीर साथ देत नाही त्यानी फक्त श्रवण करावा. श्री प्रभू रामचंद्रांची कृपा कशी होईल तुम्हाला कळणारच नाही.
||जय श्री राम. ||
||श्रीराम जय राम जय जय राम||श्रीराम जय राम जय जय राम ||श्रीराम जय राम जय जय राम ||
| शुभं-भवतु ||