Read in
मंगळवार 20 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 20 एप्रिल आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 06:52 पर्यंत व नंतर पुष्य.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
आज श्री भवानीदेवीचा उत्पत्ति दिवस असून दुर्गाष्टमी आहे.
मेष :–जूने घर नव्याने बांधण्याचे विचार पुन्हा चर्चेत येथील. घरगुती व्यवसायातून रोजच्या पेक्षा आज आर्थिक बाजू भक्कम होईल. गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला आज फक्त औषधी क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक राहील.
वृषभ :–हातात असलेल्या नोकरीतील तुमच्यावर सोपवलेली कामे अतिशय जबाबदारीने फार पाडणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन कराल. आज दुपारनंतर घरामधील वातावरणात मुलांच्या वागण्यामुळे तणाव निर्माण होईल.
मिथुन. :–पतीपत्नीमधील वादविवाद टाळल्यास गैरसमज वाढणार नाहीत. मुलावर संस्कार करण्याकरीता पालकांचा प्रयत्न निष्फळ झाल्याचे जाणवेल. अविवाहितानी विवाहाच्या व्यवहारात आपल्या अपेक्षा स्वच्छपणे सांगाव्यात.
कर्क :–महिलांना आपल्या जून्या छंदाकरीता वेळ देता येणार आहे. स्वप्रयत्नाने नोकरीत केलेल्या नवीन प्रयोगाबद्दल वरिष्ठांकडून कौतुक होईल. तरूणांनी महत्वाच्या कामास उशीर केल्यास हातातील संधी जाण्याचा धोका आहे.
सिंह :–कौटुंबिक सुखाच्या कल्पनाना तडा जाणार्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील धार्मिक कार्यासाठी वर्गणी देण्याचा शब्द पाळाल. मित्र व नातेवाईक यांच्या नेतृत्वाखाली एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचे काम लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळतील.
कन्या :–व्यवसायातील चढ उतार व कर्ज प्रकरण यामुळे मानसिक ताण वाढेल. राजकीय मंडळींकडून समाजोपयोगी काम झाल्यामुळे लोकांकडून कौतुक होईल. तरूणांकडून रहात असलेल्या एरियाचे स्वच्छतेचे काम हाती घेण्याचे ठरेल.
तूळ :–आप्तेष्ठांकडून आनंदाच्या बातम्या येथील. मुलांकडून हरवलेल्या वस्तूंचा पाठपुरावा केल्यास वस्तू सापडतील. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल. आँन लाईन शिकवणीच्या वर्गाचा चांगला परिणाम मुलांवर होत असल्याचे दिसून येईल.
वृश्र्चिक :–वाहन चालवताना पाळावयाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. तरूणांना उच्चप्रतिष्ठीत मंडळींचा सहवास लाभेल व नवीन व्यवसायाची दिशा सापडेल. मैत्रीच्या संबंधातून एकत्र येउन व्यवसायाबाबत च्या नवनव्या कल्पना साकारण्याचे ठरेल.
धनु :–पाण्याच्या ठिकाणच्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तरूणांना नवीन विशेष काम करण्याची संधी चालून येईल. अती खाण्याने पोट बिघडण्याचा प्रसंग त्रासदायक ठरेल.
मकर :–घरगुती रेंगाळलेली कामे मार्गी लावता येणे सहज शक्य होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा जनतेबरोबरचा संवाद कौतुकास्पद राहील. आरोग्याच्या बाबतीत जबाबदारपणे वागण्याचे काटेकोर नियम पाळण्यास इतरांना भाग पाडाल.
कुंभ :–जवळच्या मित्रांच्या व नोकरीतील सहकार्यांच्या मदतीने अप्रत्यक्ष लाभ होतील. महिला आपल्या पूर्वनियोजित कार्यास सुरूवात करण्याचा विचार पक्का करतील. शेजारच्या कुटुंबामुळे मानसिक आधार मिळाल्याचे जाणवेल.
मीन :–अती उत्साहामुळे एखादे काम बिघडण्याचा संभव आहे. बँकेतील कर्मचार्यांनी अनवधानानेही कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खात्री करून घ्यावी. आज कोणतेही महत्वाचे काम दुपारी 12:28 पर्यंत करू नये.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai