Read in
सोमवार दिनांक 19 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 19 एप्रिल आज चंद्ररास मिथुन २४.२९ पर्यन्त नंतर कर्क. दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 06:52 पर्यंत व नंतर पुष्य.
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :- आपल्या मनातील विचारांना कृतीत आणा. आपल्या बुद्धि आणि वाणीच्या जोरावर आपन बाजी मारून न्याल. आपल्या भागीदार व्यक्तीला योग्य तोच सल्ला द्याल. सासरकडील मंडळीना भेट वस्तू द्यावी लागेल. उष्णतेचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ :- सासरकडील व्यक्तींकडून भेटवस्तू मिळेल. जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. विद्यार्थांना अवघड विषय वडीलधारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली सोपा वाटेल. एखादी प्रॉपर्टी विकत घेण्याचा विचार मनात येईल. महिलांना ओटीपोट, कंबर यांचा त्रास संभवतो.
मिथुन :- आजचा दिवस पूर्णपणे उत्साहवर्धक आहे. वडीलधारी मंडळींच्या आजारात सुधारणा दिसेल. जोडीदाराबरोबर छोट्या छोट्या गोष्टीत कुरबुरी होतील. विद्यार्थांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग सापडतील. जुने रोग नव्याने त्रास देतील.
कर्क :- सरकारी नोकरदारांना स्वतः च्या कामाव्यतिरिक्त नवीन जबाबदारी सोपवली जाईल. त्या संधीचे सोने करा. जोडीदाराबरोबर समजुतीने वागावे लागेल. पूर्वी एखाद्या गोष्टीसाठी केलेल्या धडपडीला यश येईल. कोणत्याही कारणासाठी मानसिक संतुलन बिघडू ना देने फायदेशीर ठरेल. श्री गुरू माऊलींची उपासना करा.
सिंह :- सासरच्या वडीलधारी व्यक्तीकडून मना सारखी भेटवस्तू मिळेल. न्यायालयीन कामे हातावेगळी होण्यास सुरवात होईल. व्यवसायातील गुंतवणुकीतून लाभ होईल. कोणताही निर्णय पूर्ण विचारांती घ्या. पाळीव प्राण्यांची विषारी पदार्थ, प्राणी यांच्या पासून काळजी घ्या.
कन्या :- अधिकारी वर्गाने आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नका. कोणतेही महत्त्वाचे निर्णय एकट्याने ना घेता सर्वानुमते घ्या. नाहीतर मनस्ताप होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असेल. पोटरी दुखण्याने हैराण असणार्या व्यक्तींना आज आराम पडेल.
तूळ :- राजकीय क्षेत्रात आपल्या वागण्यामुळे मानसन्मान वाढेल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रवास घडेल. कुटुंबातील वयस्कर मंडळींची काळजी घ्या. श्री दत्त गुरूंची कृपा सदैव तुमच्या वर असेल.
वृश्चिक :- तुम्ही केलेल्या साहसी काष्टाचे फळ तूम्हाला मिळणार आहे. व्यवसायात घ्यायचे निर्णय घरातील मंडळींशी चर्चा करूनच घ्या. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
धनु :- कोणत्याही गोष्टीची सुरवात ही कायम स्वतः पासूनच करा. वडिलांच्या प्रकृतीवर पैसे खर्च होतील. तरी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आधीन होऊ नका. शेतकरी वर्गाने आपल्या प्राण्यांची काळजी घ्या.
मकर :- वडील भावाकडून आर्थिक लाभ होईल. अधिकारी वर्गाला आपल्या कामात पारदर्शकपणा आणावा लागेल. जोडीदाराबरोबर होणारे वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायात कोणताही निर्णय घाई घाईत घेऊ नका नुकसान होईल.
कुंभ :- सूचक स्वप्ने पडतील. त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी गुरू माऊलींची उपासना करा. नोकरीतील बदलाच्या विचारात असाल तर आज्ञाच प्रयत्नशील व्हा. मातृ तुल्य व्यक्तींशी वाद शक्यतो टाळा. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी मनाला लावू. घेऊ नका.
मीन :- बायकोकडून लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी रोगाने आपल्या अधिकारांचा वापर योग्य त्या पद्धतीने करावा. लाचलुचपत घेऊ नका. वाहने चालवताना नियमभंग करू नका. आर्थिक चणचण जाणवेल परंतु सद्गुरु कृपेने यातूनही मार्ग सापडेल.
| शुभं-भवतु ||