Read in
रविवार 18 एप्रिल 2021 ते रविवार 24 एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 18 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 29:00 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
सोमवार 19 चंद्ररास मिथुन 24:29
पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु अहोरात्र. मंगळवार 20 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुनर्वसु 06:53 पर्यंत व
नंतर पुष्य. बुधवार 21 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 07:59 पर्यंत व नंतर आश्र्लेषा 08:15 पर्यंत. गुरूवार
22 कर्क 08:15 पर्यंत व नंतर सिंह. शुक्रवार 23 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 07:42 पर्यंत व नंतर पूर्वा.
शनिवार 24 चंद्ररास सिंह 11:56 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा 06:23 पर्यंत व नंतर उत्तरा. 28:24 पर्यंत.
18 रविवार श्री कार्तिक स्वामींना दवणा वाहणे. श्री रामानुजाचार्य जयंती.
19 सोमवार सूर्याला दवणा वाहणे.
20 मंगळवार अशोककलिका प्राशन करणे, आई भवानी देवी अवतार दुर्गाष्टमी पूजा.
21 बुधवार श्री रामनवमी उपवास, देवीला दवणा वाहणे. श्री देवी नवरात्र समाप्ति. कोल्हापूर येथे श्री रामरथोत्सव.
22 गुरूवार श्री राम नवरात्र समाप्ति.
23 शुक्रवार कामदा एकादशी, श्री कृष्ण दोलोत्सव.
24 शनिवार श्री विष्णूला दवणा वाहणे , शनि प्रदोष.
मेष :–या सप्ताहाची सुरूवात अतिशय उत्साहवर्धक होणार आहे. बर्याच कालावधीपासून मनामधे असलेल्या संकल्पित
केलेल्या गोष्टीना सुरूवात करता येणार आहे. धाडस व पराक्रम हाच तुमचा मूळ स्वभाव अवघडातील अवघड कामही करून
दाखवेल. इतरांचे विरोध पत्करून अती धाडस करू नका. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा अडचणींचा विचार करून पाऊल
टाका. आई व वडीलांच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य द्याल. संततीच्या इच्छा पूर्ण करताना डोळस विचार करा.
आंधळेपणाने भावनेच्या आहारी जाऊ नका. नाटक, सिनेमाच्या समिक्षकांच्या मताला वाचकांकडून टीकेला सामोरे जावे
लागेल. सप्ताहाच्या शेवटी शनिवारी महिलांना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ :–सप्ताहाची सुरूवात मोठ्या धनलाभाने होणार आहे. महिलांना पतिराजांकडून अनपेक्षितपणे मोठा लाभ होईल.
बहिण भावंडातील एकमेकांवरील प्रेमात माफ करण्याची भावना निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचाराने घेतलेले
निर्णय बदलावेत असे वाटेल पण त्यापूर्वी तज्ञ गुरूजनांचा सल्ला घ्या. आजपर्यंत करत असलेल्या कामाव्यतिरीक्त या
सप्ताहात तुम्हाला तुमच्याच क्षेत्रात वेगळे प्रयोग करण्याच्या दिशा मिळतील. लहान मुलांच्या आरोग्यातील गुंतागुंत वाढू
नये यासाठी स्पेशालिस्टना दाखवून घ्या. वयस्कर मंडळीना मनातील भावनाना उघड करावेसे वाटेल तरी त्यांच्या
मुलाबाळानी त्याच्याबरोबर गप्पा माराव्यात, त्यांना वेळ द्यावा.
मिथुन :–मनासारख्या गोष्टी करता येणारा हा सप्ताह तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार आहे. मनातील विचारांचे
वादळ शांत होईल. फक्त एकच गोष्ट पाळायची आहे की जे तुम्हाला पटणार नाही त्याबाबतचा अतीविरोध दाखवू नका.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारपदावर असलेल्यांना मोठ्या कारवाईतील सहभाग मनस्ताप देईल. राजकीय
पुढाऱ्यांनी स्वत:ऐवजी सध्या इतरांचा विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे म्हणणे हाताखालील मंडळीना पटणार
नाही त्यामुळे त्यांच्याकडून छुपा विरोध होईल. आईच्या प्रकृतीची पूर्ण तपासणी करण्याचे काम लांबणीवर टाकू नका.
कर्क :–या सप्ताहात प्रथम आपण खर्च मोजून मापून करायचा आहे याचे भान ठेवावे लागेल. तरूणांच्या चैनी वृत्तीत तर
वाढ होणारच आहे पण त्याचबरोबर व्यसनाची ओढ लागेल. कुटुंबात पूर्वजांचे श्राद्ध कार्य पार पडेल तुमचा विश्र्वास असो
वा नसो त्यास श्रद्धेने उपस्थित रहा. मोल्यनान वस्तू घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून
अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासकांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळेल. आयुर्वेदिक डाँक्टरांना आपल्या अचूक अभ्यासाचा
प्रत्यय येईल व पेशंट्सना पण उत्तम गुण आल्याचे जाणवेल. आई व मुलीमधे मैत्रिणीच्या नात्याने हितगुज होईल.
सिंह :–मित्रमंडळींच्या मदतीने हातातील मोठा प्रोजेक्ट मार्गी लागत असल्याचे लक्षांत येईल. औषधी क्षेत्रातील
कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागणार नाही. नोकरीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अपत्य
प्राप्तीच्या इच्छुकांना डाँक्टरांच्या नवीन थेरीचा उपयोग होत असल्याचे जाणवेल. मानसिक ताण तणावावर उपचार
करण्यासाठी वयस्कर व तरूण मंडळीना मानसशास्त्राच्या डाँक्टरांकडे जावे लागेल. महिलांनी मनातील गोष्टी जवळच्या
मैत्रिणींला किंवा आईबहिणीला मोकळेपणाने सांगावी. सप्ताहाच्या शेवटी मनाची चलबिचलता वाढेल तरी एकट्याच्या
विचाराने कोणताही निर्णय घेऊ नये.
कन्या :–विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचे त्यांचे त्यानाच समजल्याने त्यांच्या वृत्तीत
बदल होईल तरी पालकांनी त्यांच्या शब्दावर विश्र्वास ठेवावा. नोकरदार वर्गाने आपले काम भले व आपण भले याच
विचाराने चालावे. अधिकारी वर्गाने ही अनावश्यक ठिकाणी आपल्या अधिकाराचा वापर करू नये. कुटुंबातील सर्वानीच
सहविचाराने घेतलेला निर्णय कामातील यश खेचून आणेल व कुटुंबात आनंदी वातावरण राहील. वडिलांच्या पायाचे दुखणे
बरे होऊ लागल्याचे जाणवेल. नोकरीतील पगारा शिवाय मिळणारे इतर लाभ तुम्हाला मंजूर नसल्यास तसे स्पष्टपणे
व्यक्त करावे.
तूळ :–आँन लाईन पुस्तक प्रकाशनाच्या वेबिनार मधील तुमचा सहधाग महत्वाचा राहील. राजकीयदृष्टय़ा लेखकांची
प्रतिमा प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट असा अनुभव येईल. सामुदायिक कामातील तुमची जबाबदारी व तुम्ही केलेले काम
तुमची प्रतिष्ठा वाढवेल. राजकीय पदाधिकार्यानी आपले निर्णय एकांगी न घेता वरीष्ठांचा सहविचाराने व जनतेचा विचार
करूनच घ्यावेत हा सप्ताह राजकीय मंडळीना विचारपूर्वक वागण्याचा, बोलण्याचा सल्ला देत आहे. कुटुंबातील स्कर
मंडळींच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. ज्येष्ठांना फिजीओथेरपीची गरज लागेल.
वृश्र्चिक :– आपण करत असलेल्या प्रत्येक बर्या वाईट कामाचा मोबदला मनुष्याला मिळतच असतो तोच अनुभव
तुम्हाला या सप्ताहात येणार आहे. राजकीय मंडळींच्या व इतरांच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचे विचार बदलू नका.
नोकरीतील कर्मचार्यांनी कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा देऊ नये प्रकरण तुमच्यावरच उलटण्याची भिती
आहे. उद्धोग व्यवसायात तुमच्या कर्तव्याला महत्व देऊन केलेले काम तुम्हाला सन्मान मिळवून देईल. कुटुंबातील
सहविचाराने घेतलेला निर्णय किता महत्वाचा ठरला आहे याची जाणिव होईल. पुजारी, पुरोहित व ज्योतिषी यांनी कडक
सत्य मवाळ शब्दात सांगावे.
धनु :–परदेशी असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मायदेशी येण्याचे प्रयत्न करावेत. वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करत
असलेल्यांनी त्यांना आर्थिक मदत न विचारता करावी.तरूणांनी दुसर्यांच्या आग्रहाखातर व स्वत:च्या मोहापायी
व्यसनापासून दूर रहावे. इतरांना उपदेश करणार्यांनी प्रथम स्वत:मधे बदल न केल्याने इतरांकडून चेष्टेचा विषय होईल. .
हा सप्ताह तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व जपण्यासाठी अतिशय जागरूक राहण्यास सांगत आहे. व्यवसायातील उधारी वसूल
करण्यासाठी तुम्ही वापरलेल्या तंत्राचा कांही एक फायदा होणार नाही तरी त्यावर सल्ला घ्यावा. कडक व अघोरी उपायाने
अडचणीत याल.
मकर :–देवधर्मापासून दूर राहिलेल्यांनी सध्याची गरजूंची गरज ओळखून आर्थिक मदत करावी. शारिरीक त्रास,
आजारपण , असाध्य आजार यांवरील उपाय करताना दानधर्माच्या पुण्याईची जोड मिळवावी लागेल. वैवाहिक जीवनातील
वाद समंजसपणे सोडवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही व गोडवा निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी
आपल्याला अवघड जाणार्या विषयासाठी भरपूर मेहनत घ्यावी व मार्गदर्शनही घ्यावे. सहकार क्षेत्रातील कर्मचारी,
अधिकारी यांनी आर्थिक व्यवहारात सहभाग घेऊ नये व घ्यावा लागल्यास व्यवहारात पारदर्शकता पाळावी.
कुंभ :–जुळ्या भावंडानी आपल्या प्रकृतीविषयी विशेष जागरूक रहावे. मुलांच्या वागण्यावर संशय घेऊन अंदाजाने तुमची
मते बनवू नका. वस्तुस्थिती समजून घ्या व त्यांना मानसिक आधार द्या. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून सावध
राहण्याची गरज आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाचा कंटाळा येईल तरी इतर सदस्यांनी, विशेषत: पतिराजांनी
जबाबदारी सांभाळावी. बँकेच्या बाबतीतील महत्वाची कागदपत्रे आज गरजेच्या वेळी सापडणार नाहीत. साप्ताहिक
कामाचे नियोजन महत्वाचे असल्याने नोकरदारानी त्यांस प्राधान्य द्यावे. मैदानी खेळाडूंना त्यांच्या इच्छेप्रमाणे लाभ
मिळणार नाही.
मीन :–बर्याच दिवसापासून नोकरीमध्ये चाललेल्या संघर्षावर अखेर पडदा पडेल. चूक कोणाची व काय काय घडले या
विषयाच्या खोलात जाऊ नका. उधारी वसूल न झाल्याने उत्पादन क्षेत्रात अचानक आर्थिक चणचण निर्माण होईल.
भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर मात कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अशीच परिस्थिती निर्माण होईल.
पत्नीकडील जवळच्या नातेवाईकांची मदत मिळेल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे मन सुखावून जाईल. वडीलधार्या
माणसांची त्यांच्या आजारपणामुळे सेवा करावी लागेल. सरकारी कागदपत्रांवर सह्या करताना पूर्ण वाचूनच नंतर करा
किंवा मार्गदर्शन घ्या.
||शुभं-भवतु ||