Read in
शनिवार 17 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 17 एप्रिल आज चंद्ररास वृषभ 13:09 पर्यंत व नंतर मिथुन.
चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 26:33 पर्यंत व नंतर आर्द्रा. वरील
राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
आज विष्णुदोलोत्सव आहे. श्रीविष्णुला दवणा वहावा.
मेष :– आज मानसिक अस्वास्थ्य वाटत असले तरी आर्थिक लाभ झाल्यामुळे मनाला जरा बरे वाटेल. व्यावसायिक
भागिदारांबरोबरची चर्चा फलद्रूप होण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे. आज कौटुंबिक चर्चा रंगतदार होणार आहेत.
वृषभ :–मानसिक कमकुवतपणा मागे सारल्यास तुमच्यावर दिलेली जबाबदारी तुम्ही व्यवस्थितपणे फार पाडणार आहात.
कर्ज मिळण्याच्या प्रकरणात अचानक कर्जाची गरज निर्माण होणार नाही. तुमच्या विचार करण्याच्या पद्धती समुपदेशनाच्या
पद्धतीकडे वळेल.
मिथुन :–गेल्या सप्ताहापासून च्या रखडलेल्या, बिघडलेल्या कामाचा राग तुमच्याकडून स्वत:वरच निघेल तरी मानसिक शांतता
घालवू नका. व्यवसायातील प्रलंबित येणी तुमच्या ढिलेपणमुळे येणे अवघड राहील तरी विचारात व बोलण्यात स्पष्टता ठेवा.
कर्क :–न्यायालयातील प्रलंबित कामासाठी आज जमले नाही तरी येत्या दोन दिवसात वकिलांबरोबर बोलून व्यवहारात स्पष्टता
आणा. तुमच्या मनात असलेल्या विषयावर तुमच्याकडून सहकार्यांच्या विचारांना चालना द्याल व त्यांच्या शंकांचे निरसन
कराल.
सिंह :–परदेशी जाण्याच्या विचारात असलेल्यांनी सध्या आपल्या विचारात बदल करावा. जी कामे आँन लाईन होणार आहेत ती
कामे जराही वेळ न दवडता सुरू करावीत. आज तुमची लहान मुले तुमच्याबरोबर अती लाडाने जवळ येतील. मोठ्यांबरोबर ही
प्रेमाने वागावे लागेल.
कन्या :–कुटुंबाची काळजी घेता घेता आज महिलांची दमणूक होऊन आजारपण येण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षेत्रातील
अवघड कामातील अडथळा दूर होऊन कामाचा मार्ग सापडेल. निवृत्त होणार्या कर्मचार्यांना सहकार्यांकडून खूप प्रेमाचा संदेश
मिळेल
तूळ :–मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही करत असलेल्या मेहनतीचा उत्तम उपयोग होत असल्याचे जाणवेल. कुटुंबियांच्या अपेक्षा आज
तुम्हाला पूर्ण करता येणार आहेत. तरूण वर्गाने समाधान मिळवण्यासाठी बाहेरील जगाची मदत न घेता कुटुंबातील प्रिय व्यक्तीला
अडचण सांगावी.
वृश्र्चिक :– इंजिनीयर्सना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. डाक्टर्स, नर्सेस, पँरामेडिकल क्षेत्रातील मंडळीना अचानक प्रचंड
कामाचा तणाव येईल. नोकरीत बँकेच्या व्यवहारात काम करत असताना कोणतीही चुक होणार नाही याची दखल घ्या.
धनु :–विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शंकांचे निराकरण झाल्याने अभ्यासाची भिती कमी होईल. पुढील शिक्षणासाठी निर्णय
घेताना तज्ञ शिक्षकांचा सल्ला घ्या. नव्याने नोकरीत रुजू होण्यापूर्वी मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या.
मकर :–तुमच्या पाळीव प्राण्याची चोरी होण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी. महिलांचा जुना आजार डोके वर काढण्याची
दाट शक्यता आहे. कुटुंबात कोणत्याही विषयावर चर्चा करताना बोलण्यावर संयम आवश्यक आहे. आज कोणतेही आर्थिक व्यवहार
करू नयेत.
कुंभ :–सध्या करत असलेला व्यवसाय जरी चांगला चालत नसेल तरी टिकवून ठेवा. पुढे त्यातच प्रगती होणार आहे. सार्वजनिक
जीवनात एकमेकाला मदत करण्याचे उदाहरण तुमच्याकडून इतरांना शिकायला मिळेल. आईच्या प्रकृतीला आता आराम पडू
लागेल.
मीन :–सरकारी कामाचे फार्म भरताना त्यात चुकणार नाही याची दक्षता घ्या. वयस्कर मंडळीनी आज आराम करण्याची गरज
आहे. बँकेतील व्यवहार इतरांना कळू देऊ नका. घरातील नात्यात एकवाक्यता राहण्यासाठी सकारात्मक विचार करा. कुटुंबातील
प्रत्येक व्यक्तीचा उत्साह वाढणार आहे.
| शुभं-भवतु ||