Read in
शुक्रवार 16 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 16 एप्रिल आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 23:40 पर्यंत व नंतर मृग.
आज विनायक चतुर्थी
असल्याने श्री गजाननाला दवणा वाहून लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व
आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–हातातील पैशाला कितीही जपायचा प्रयत्न केलात तरी त्याला अनेक वाटा फुटतील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला
तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत जराही बेफिकीर राहून चालणार नाही. . सध्याच्या कोरोनाच्या काळात अतिशय काळजी
घ्यावी हलगर्जीपणा करू नये.
वृषभ :–नेतृत्व गुण असलेल्यांना आज ढिम्म बसावेसे वाटेल. कसलीही एनर्जी वाटणार नाही. रोजच्याच कामातील आज
कष्टाचे प्रमाण इतके वाढेल की नको ते काम असे होईल. आईवडीलांच्या इच्छेखातर तरूणांना प्रवासाचे बेत रद्ध करावे
लागतील.
मिथुन :–तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघड काम सोपे करून दाखवल्यामुळे सर्व अचंबित होतील. आज तुमच्या मुलांची
नाराजी दूर करण्यासाठी तुम्हाला खर्या खोट्याचा आधार घ्यावा लागेल. शाळकरी मुलांना शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त
शिकवणीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल.
कर्क :–नोकरीत हाताखालील कर्मचारी तुम्हाला अडचणीत आणतील तरी काळजी घ्यावी लागेल. राजकीय मंडळीनी
एखादा कठीण निर्णय घेताना कायदेशीर बाबींचा विचार करावा व सल्लाही घ्यावा. तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी
पडू नये.
सिंह :–खाजगी क्षेत्रातील पदाधिकार्यांना तंत्रज्ञानातील नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील व
त्यातून काहींचे जूने संबंध दृढ होतील. तरूण वर्ग स्वावलंबी होण्यावर जास्तीत जास्त भर देईल. महिला आपली
कार्यक्षमता वाढवून कामे पूर्ण करतील.
कन्या :–आज प्रकृतीस्वास्थ्य एकदम ओके राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द पाळल्याचा आनंद होईल व इतरांकडून
कौतुकही होईल. खाजगी क्षेत्रातील मंडळीनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्यावा. महिलांना सासरकडून व पुरूषांना
सासुरवाडीकडून आश्चर्यजनक लाभ होईल.
तूळ :–कौटुंबिक प्रश्र्न बुद्धी कौशल्याने सोडवाल. नोकरीच्या ठिकाणी तपासणी पथकात तुम्हाला सामावून घेतले जाईल.
सर्वच कार्यात कार्यतत्परता दाखवल्यामुळे वरीष्ठांची मर्जी संपादन कराल व विश्र्वास वाढेल. घरामधील वातावरण
अतिशय आनंदाचे व प्रसन्न राहील.
वृश्र्चिक :–आज सर्वच बाबतीत कामाची खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजनाची आवश्यता आहे.
वयस्कर व आजारी तरूणांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे जाणवेल. कुटुंबात लहान भावंडाकडून आनंदाची
बातमी कळेल.
धनु :–लहानशा उद्योगातील होत असलेली प्रगती मानसिक समाधान देईल. दवाखान्यातील कर्मचार्यांना कर्त्तव्य
केल्याचे समाधान मिळेल. तरूणांनी रागावर नियंत्रण ठेवावे व सहनशीलता बाळगावी. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात
वाढ झाल्याचे जाणवेल.
मकर :–नोकरी व्यवसायातील रेंगाळलेल्या कामाना वेळ दिल्यास नक्कीच कामे हातावेगळी होतील. आळस व कंटाळा
यांना थारा देऊ नका. आप्तांच्या गाठीभेटीतून नवीनच गोष्टी माहित होतील. महिलांना इतरांचे दु:ख पाहून मानसिक त्रास
होईल.
कुंभ :–गेल्या आठवड्यात केलेल्या कामाचा निकाल आज कळेल व मानसिक समाधान मिळेल. आँन लाईन प्रवेशासाठी
केलेल्या अर्जाचे उत्तर मिळेल पण पुढील प्रवेश नक्की करण्यापूर्वी ज्येष्ठ तज्ञांची मदत घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची
काळजी वाढेल.
मीन :–राजकारणातील प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचावर कोणतेही भाष्य न करता गप्प राहिल्यास प्रकरण वाढणार नाही.
कुटुंबात वाढलेले खर्चाचे प्रमाण योग्य कारणांसाठीच असल्याचे लक्षात येईल. महिलांना गृहव्यवस्थापनात चांगले यश
येईल.
| शुभं-भवतु ||