Read in
गुरूवार 15.एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 15 एप्रिल आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 20 :32 पर्यत व नंतर रोहिणी.
वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे. आज गौरीतृतीया आहे. गौरी शंकराचा दोलोत्सव, श्री राम दोलोत्सव आहे. (याबाबतच्या माहितीसाठी गुढीपाडव्याचा
लेख वाचावा.)
मेष :–सध्या मार्केट, खरेदी बंद असली तरी तुम्ही आँन लाईन करत असलेल्या खरेदीला जरा ब्रेक लावण्याची गरज आहे.
स्वत:च्या व मुलांच्या आवडीनिवडीबाबत चोखंदळ रहाल. शाळकरी विद्यार्थी अभ्यासाच्या विषयांबरोबरच इतर
विषयातही रस दाखवतील.
वृषभ :–सतत मौन पाळणार्या तुमच्या स्वभावात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रौढानी आपल्या मुला
नातवंडांना सकारात्मक विचार करावयास शिकवावे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यातील हजरजबाबीपणामुळे सहकार्यांची
मने जिंकाल.
मिथुन :–अधिकारपदावर असलेल्या महिलांना आपल्या हक्का पेक्षा कर्तव्य मोठे वाटून त्या प्रथम करण्यास प्राधान्य
देतील. आँन लाईन उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वत:च्या कोशातून बाहेर न आल्यामुळे मानसिक गोंधळात अडकतील.
कर्क :–कोरोनाच्या भितीने सतत स्वत:ला कोंडून घेतल्याने मानसिक संतुलनात बिघाड होईल. घराची स्वच्छता
करण्यातच दिवसाचा जास्त वेळ खर्च होईल तरीही समाधान होणार नाही. कोणत्याही प्रकारच्या वादविवादात आज भाग
घेऊ नका.
सिंह :–कितीही तयारी करून काम सुरू केलेत तरी काम बिघडणार आहे. आज महत्वाच्या कामात किंवा जेथे तुमचा
रिमार्क आवश्यक आहे तेथे फारच जागरूकपणे काम करा. मानसिक आळस व उद्विग्नता यामुळे कामास उत्साह वाटणार
नाही.
कन्या :– व्यवसाय उद्धोगात अचानक कामाचे आँर्डरचे प्रमाण वाढेल. घरगुती व्यवसाय करणार्या महिलांनी आपल्या
क्लायंट बरोबर गोड बोलून त्यांची मने जिंकल्यास व्यवसाय वृद्धी मनासारखी होईल. पुरूषवर्ग स्वत:च्या
आवडीनिवडीबाबत अती चोखंदळपणा करतील.
तूळ :–राजकीय क्षेत्रातील वादग्रस्त मुद्ध्यापासून दूर रहावे. तुमची सामाजिक बांधिलकी इतरांना कल्पवृक्षासारखी मदत
देईल. भावंडांच्या मदतीने हातातील कामे यशस्वीपणे पार पाडाल. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजक केल्यास आर्थिक बाजू
सावरेल.
वृश्र्चिक :–मनातील गैरसमजूत दूर होण्याकरीता कुटुंबातील सदस्यांबरोबर चर्चा करा. संततीकडून अचानक आनंद
देणार्या व प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. आज तुम्हाला घरकाम किंवा आँफिसचे काम करण्याचाही कंटाळा येईल.
धनु :–कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यासाठी तुम्हाला काही युक्त्या योजाव्या लागतील. तरूणांच्या हातून आर्थिक
नुकसानीचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी हा पूर्ण सप्ताहभर प्रकृतीबाबतच जागरूक रहावे. अफवांवर विश्र्वास ठेवून
फसगत करून घ्याल.
मकर :–पतीपत्नीमधे आज फारसे ट्युनिंग जमणार नाही. जून्या पुराण्या विषयांमुळे वाद निर्माण होतील. कुटुंबातील
ज्येष्ठ व्यक्तीकडून योग्य ते मार्गदर्शन मिळेल. महिलांनी मानापमानाच्या प्रसांगाना फार महत्व न दिल्यास कुटुंबातील
वातावरण बिघडणार नाही.
कुंभ :– महिलांना प्रवासाच्या, फिरण्याच्या आवडीला बंधन घालावे लागेल. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत
विचारात घ्यावे लागेल. लहान मुलांच्या मनामधे विनाकारण निर्माण झालेली भिती दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे
लागतील.
मीन :–नोकरीत तुम्ही केलेली भीष्मप्रतिज्ञा पूर्ण होणार असल्याचे चित्र निर्माण होईल पण त्यासाठी सहकार्यांची मदत
आवश्यक राहील. अहंपणाने वागू नका. व्यापार्यानी अती लोभापायी नैतिकता सोडू नये. शैक्षणिक संस्थेतील अधिकार्यांना
शासकीय नियम न पाळल्याबद्धल त्यांच्यावर कारवाई होईल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai