Read in
बुधवार 14 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 14 एप्रिल आज चंद्ररास मेष 24:10 पर्यंत व नंतर वृषभ.
चंद्रनक्षत्र भरणी 17:22 पर्यंत व नंतर कृतिका. आज
शंकरपार्वतीस दवणा वाहण्याचा दिवस आहे. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या
कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आनंदाच्या व सुखाच्या क्षणांचा अनुभव येईल. श्री दत्तसंप्रदायाच्या ऊपासकांना त्यांच्या शक्तीचा अनुभव येईल.
अपत्यप्राप्तीच्या इच्छा फलद्रूप होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर लहानशा प्रवास करावा
लागेल तरी या कोरोनाच्या काळात अतिशय काळजीपूर्वक वागावे लागेल.
वृषभ :–आजचा दिवस कामाच्या दगदगीचा व कष्टाचा जाईल. आज प्रकृतीची ही काळजी घ्यावी लागेल. सुखाची गोष्ट
मिळत असल्याचा आभास निर्माण होईल व मिळता मिळता हातातून निसटून जाईल. कलाकाराचा जम आज त्यांच्या
इच्छेप्रमाणे बसणार नाही.
मिथुन :–वडिलांकडील अतिव प्रेमाची बाजू आज तुमच्या वाटणीला येईल. तुमच्या स्वभावात आज अँक्शनला रिअँक्शन
असा नियम अंमलात येईल. रागावर नियंत्रण ठेवा.. कोणत्याही कारणासाठी प्रवास करू नका. नुकसानीचा दिवस आहे.
कर्क :–लहान मुलांना पशु, किड्यामुंगीच्या चावण्याचा विषारी दंश होईल. सरकारी दवाखान्यातील कर्मचार्यांची चांगली
मदत मिळेल. वडीलांच्या जवळच्या नात्यातील दुख:द घटना कळेल. गोरगरीबांसाठी मदत करावी लागेल.
सिंह :–कोणत्याही तात्विक चर्चा, वादविवाद यामधे तुमचीच बाजू वरचढ राहील तुम्ही तुमचे म्हणणे पटवून द्याल.
अपेक्षित व्यक्तींकडून ऐन वेळी सहकार्य मिळणार नाही तरी तुमच्या जिवावरजे शक्य असेल तेवढीच जबाबदारी स्विकारा.
कन्या :–आज तुमचा शारिरीक कष्टाचा दिवस आहे. बर्याच बाबतीत असहकार्य होणार असल्याने नवीन कामाला आज
सुरूवात करू नका. तुम्हाला तुमची मते पटवून देण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. सहकार्यांवर अवलंबून राहू नका.
तूळ :–अतिविचार करण्याने कोणतीही गोष्ट संपत नाही तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे हे लक्षात घ्या. व्यवसायातील
आर्थिक गणिते मनासारखी साथ देतील. मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याच्या संधी ओळखून त्याचा फायदा घ्या.
वृश्र्चिक :–कमिशन एजंट, मोठमोठ्या व्यवसायातील दळणवळणाच्या संस्था यांनी आपले व्यवहार चोख ठेवल्यास जराही
नुकसान होणार नाही. घरगुती उद्धोगातून अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होईल पण वेळ पाळावी लागेल. खाद्धपदार्थ्रांच्या
व्यवसायातून उत्तम नफा होईल.
धनु :–आज अंगातील आळस झटकून कामाला लागाल तर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची
छाप पडल्याने तुमच्या स्वभावातील सकारात्मक बाजू इतरांच्या नजरेत येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर
असलेल्या जबाबदार्या वेळेवर फार पाडल्याने सर्वत्र कौतुक होईल.
मकर :–मनातील आशा आकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. व्यवसाय व्यापारातील तुमचे अंदाज एकदम अचूक
निघाल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांच्या गुप्त
गोष्टींवर लक्ष ठेवावे लागेल.
कुंभ :–नोकरीतील महत्वाच्या कामात वरीष्ठांचा सल्ला मिळेल व मनावरचे फार मोठे आोझे उतरेल. मुलांच्या
मित्रमैत्रिणीबाबत जागरूक राहून मुलांबरोबर त्याविषयी चर्चा करावी. व्यसनापासून दूर राहण्यासाठी मुलांना पटवून द्यावे
लागेल.
मीन :– दोन दिवसापासून मनात असलेली भिती काढून टाकता येणार आहे. गाण्याच्या मैफलीचे नियोजन कराल. आय
टी. तील नोकर मंडळीना नवीन प्रोजेक्टविषयी च्या ट्रेनिंगमधे सामावून घेतले जाईल. सामान्यांना सोशल मिडीयाचा त्रास
होईल.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai