Read in
चैत्र शुक्लप्रतिपदा गुढीपाडवा
माझ्या मित्रमैत्रिणींनो सप्रेम नमस्कार
आज गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त. अतिशय शुभ, कोणतेही
कार्य करण्यास मुहूर्त, वेळ पाहण्याची गरजच नाही असा हा गुढी पाडव्याचा दिवस.
आपणही आपल्या दारासमोर गुढी उभी करूया, विजयाची गुढी उभी करूया.. कोणत्या
विजयाची ? आता आपल्याला कोणत युद्ध जिंकायचय ? आजच्या दिवशी ज्याप्रमाणे
प्रभु रामचंद्र वनवासातून परत आले त्याचप्रमाणे आपणही या कोरोनाच्या वनवासातून
बाहेर पडण्याची आज शपथ घेऊया.
आता आपल युद्ध कोणा एका देशाशी नाही की व्यक्तीशी नाही. तर हे युद्ध आहे कोविद
19 बरोबर. हे युद्ध जिंकणही फारस अवघड नाहीय पण त्यासाठी जिद्द हवी आहे,
संयम हवा आहे. हे युद्ध आहे बिन हत्याराच, बिन शस्त्राच युद्ध.
चला तर मग आपण सगळे या कोरोना विरूद्ध युद्ध पुकारूया आणि त्याला फक्त
आपल्या देशातूनच नाही तर जगातून नाहीसा करूया. त्यासाठी आवश्यक आहे फक्त
आणि फक्त संयम, निष्ठा व स्वयंशिस्त.
शासनाने आखून दिलेले नियम पाळले की तो गलीतगात्र होईलच. पण त्यासाठी आपण
शासनाचे नियमही काटेकोरपणे पाळुया.
मास्क घातल्या शिवाय अजिबात बाहेर जायचे नाही.
चालताना, बोलताना सोशल डिस्टनसिंग पाळायचे आहे.
आवश्यक असेल त्यावेळी सँनिटायझरचा वापर करावा.
प्रत्येकांनी एकमेकांमधे – दुकानदार व गिर्हाईक यामधे 6 फुटाचे अंतर पाळावे.
अत्यावश्यक गरज नसेल तर प्रवास करूच नये.
गरज नसेल तर घराच्या बाहेरच पडू नये.
आँफिसमधे किंवा इतर खाण्याच्या ठिकाणी दोन टेबलामधे किमान दोन मीटरचे अंतर
ठेवूनच बसावे
वरील नियमांचे काटेकोर पालन करून आपण आपल भविष्य घडवुया. सुरक्षित राहुया.
गेले वर्षभर चाललेले तुमचे माझे हितसंबंध दृढ करूया, व सुरक्षित राहून एकमेकांची
साथ देवुया.
अशी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रतिज्ञा करूया.
|| निरोगी भारत चिरायु होवो ||
अनुराधा कोगेकर
13 एप्रिल 2021
डोंबिवली.