Read in
सोमवार 12 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 12 एप्रिल चंद्ररास मीन 11:28 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 11:28 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
आजचा सूर्योदय 06:26 ला होत असून अमावास्या सकाळी 08:00 पर्यंत आहे. त्यामुळे आज सोमवती अमावास्या आहे.
मेष:–आज सकाळपासून होणारा खर्च औषधांसाठी करावा लागेल तर दुपारनंतर मात्र स्वत:च्या चैनीसाठी, आवडीसाठी खर्च कराल. तुमच्यावर जबाबदारी असलेली कामे दुसर्यांकडून करून घेण्याकडे कल राहील. आजारी व्यक्तींच्या प्रतिकारशक्तीत वाढ झालेली कळून येईल व आजाराचे प्रमाण कमी होईल.
वृषभ :– कुटुंबातील महत्वाच्या कामात सुना व जावई बुवांची चांगली मदत मिळेल. महिलांना स्वत:च्या मनासारख्या गोष्टी करता येतील. वडिलांकडील नात्याकरीता मोठा आर्थिक खर्च करावा लागेल. नोकरीतील दैनंदिन काम पूर्णपणे स्वत:च्या जबाबदारीवर करावे लागेल.
मिथुन :–परगावी किंवा कांही कारणाने दूर गेलेले पति-पत्नी समझदारीने एकत्र येतील. विद्यार्थ्यांनी इतरांची बरोबरी करत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करणे महत्वाचे ठरेल. सत्कर्माच्या योगे होणारा लाभ कसा असतो याचा अनुभव होईल.
कर्क :–मानसिक अशांतीमुळे केलेल्या कामात चुका निघतील. मधुमेही दैनंदिन कामाबरोबर व्यायामाचे नियोजन करतील.व्यवसायातील भागिदाराकडून हाती घेत असलेल्या मोठ्या प्रोजेक्टमधे मदत मिळेल. कर्जाच्या भाजगडीत पडू नका.
सिंह :–तुमचा तुमच्या स्वत:वरच्या विश्र्वासास तडा जाऊन परमेश्वरी संकेत मान्य करावे लागतील. पूर्वनियोजित कामाचा आढावा पूर्णपणे बदलावा लागेल. गुंतवणूक करताना सरकारी क्षेत्रात केल्यास चांगला लाभ होईल.
कन्या :–डाँक्टर मंडळींकडे येणारे पेशंट्सची एकाच प्रकारची माळ लागेल. संसर्गजन्य रोगापासून वयस्वर मंडळीनी सावध रहावे. पुरूषांना अचानक शक्ती कमी होत असल्याचे जाणवून उत्साह कमी वाटेल. आज विश्रांतीची गरज निर्माण होईल.
तूळ :–आज तुम्हाला तुमच्या हाताखाली असलेल्यांबरोबर काम करताना वेगळाच उत्साह जाणवेल. नवीन व्यवसायाच्या उद्घाटनाचे लांबणीवर पडल्याचे मनाला लावून घेऊ नका कारण महिन्याच्या अखेरीस हे काम होणार आहे. नवीन नोकरीतील वातावरण आनंददायक राहील.
वृश्र्चिक :–वयस्कर मंडळींच्या हातापायाला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढेल तरी ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. महिलांना जास्तीचे धान्य भरावयाचे असल्यास आज न भरता उद्या कींवा मंगळवारच्या दुपारनंतर भरावे.
धनु :–कोणत्याही प्रलोभनापासून किंवा व्यसनापासून दूर रहावे. आईच्या सुखासाठी तिच्या आवडीची खरेदी कराल. नोकरीत येणार्या कामाच्या टार्गेट पूर्तीसाठी कामाचे योग्य नियोजन करा. कोणत्याही विषयावर चर्चा करताना तुम्हीच अग्रेसर रहाल.
मकर :–मनाशी बाळगलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. अति काम करण्याचा परिणाम शरिरावर व मनावरही होईल. आज तुम्हाला मिळणार्या आदरास तुम्हीच कसे योग्य आहात हे सहकार्यांकडून गौरवले जाईल.
कुंभ :–तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने अफवांवर विश्र्वास ठेवल्याने इतरांचाही गोंधळ होईल. वैवाहिक जीवनात आलेला दुरावा तुमच्या पुढाकाराने कमी होईल. आज बोलण्यात मार्दवपणा ठेवल्यास इतरांचे सहकार्य मिळेल.
मीन :–संततीबरोबरील असलेले मतभेद चर्चेने दूर करता येणार आहेत याची खात्री बाळगा. मित्रमैत्रिणींच्या प्रेमसंबंधात एखादे प्रेमाचे नाते निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची दिशा बदलल्यास सर्वच मार्ग सोपे वाटतील.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai