Read in
रविवार 28 मार्च ते शनिवार 03 एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 11 अमावास्या अहोरात्र, चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 08:56 पर्यंत व नंतर रेवती.
12
सोमवार चंद्ररास मीन 11:28 पर्यंत व नंतर मेष व चंद्रनक्षत्र रेवती 11:28 पर्यंत व नंतर अश्र्विनी. मंगळवार 13 चंद्ररास
मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 14:19 पर्यंत व नंतर भरणी. बुधवार 14 चंद्ररास मेष 24:10 पर्यंत व नंतर वृषभ.
चंद्रनक्षत्र भरणी 17:22 पर्यंत व नंतर कृतिका. गुरूवार 15 चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 20:32 पर्यंत व
नंतर रोहिणी. 16.शुक्रवार वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 23:340 पर्यंत व नंतर मृग. शनिवार 17 चंद्ररास वृषभ
13:09 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 26:32 पर्यंत व नंतर आर्द्रा.
रविवारी दर्श अमावास्या असून सोमवारची अमावास्या सकाळी 08:00.पर्यंत आहे. मंगळवारी चैत्र प्रतिपदेला दिवस
गुढीपाडवा आहे. बुधवारी डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. गुरूवारी गौरीतृतीया, श्रीराम दोलोत्सव. शुक्रवार विनायक
चतुर्थी. शनिवार श्री विष्णूचा दोलोत्सव.
या कालावधीतील चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते श्री हनुमान जयंतीपर्यंतची
करावयाच्या धार्मिक कामाची माहिती वेगळ्या लेखात देत आहे.
मेष :–सोमवारचा गुढीपाडवा हा तुमच्याच राशीतील अश्र्विनी नक्षत्रावर असल्याने तुम्ही करत असलेल्या
कार्यात विजयश्री खेचून आणणार आहे याची खात्री बाळगा. व्यापार व्यवसायात करावयाची उलाढाल
मनासारखी करता येणार आहे. या वर्षात मनातील इच्छा पूर्ण करता येणार आहेत त्यामुळे या वर्षाच्या
नियोजनात तुच्या इच्छा अपेक्षाना महत्व द्या. पगारातील खर्चाची रक्कम इतरांना मदतीचा हात देण्यासाठी
खर्च होईल. नोकरीतील अडचणी दूर करण्याकरीता शुक्रवारी श्री गणेशाला दवणा वहावा. नवीन वर्षाच्या या
पहिल्या सप्ताहातच एखादा पराक्रम करण्याची तीव्र इच्छा होईल. दळणवळण क्षेत्रातील व्यावसायिकांनी
बाजारातील नवा कल बघून योजना आखाव्यात. तसेच मुंगी होऊन साखर खाण्याचा प्रयत्न करावा. एकंदरीत
कष्ट करण्याच्या प्रवृत्तीत वाढ होईल.
वृषभ :–मनामधील मोठमोठे विचार कार्यान्वित करण्यासाठी रविवार, सोमवारच्या अमावास्ये पासूनच नवीन
उद्योगाच्या चर्चा, नियोजन सुरू होईल. या वर्षी कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला महत्व द्यावयाचे आहे याविषयी
तज्ञांच्या मताने विचार करून निर्णय घ्या. गुढी पाडाव्याच्या दिवशी श्री कुलस्वामीला निरोगी आयुष्यासाठी
सहकुटुंबाने प्रार्थना करावी. जून्या घराच्या व्यवहारातून चांगला धनलाभ होण्याचे संकेत आहे. ज्या क्षेत्रात काम
करत आहात त्यातील वृद्धीसाठी वडील भावंडाची मदत घेतल्यास काम योग्य दिशेने होईल.
ज्यांना शक्य असेल त्यांनी सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करावी.या सप्ताहात खर्च वारेमाप होणार
असल्याने विचार करू खरेदी करावी. कुटुंबातील कांही वादाचे जे प्रसंग आहेत ते सध्या पूर्णत : बाजूला ठेवल्यास
कामाची सुरूवात चांगली होईल.
मिथुन :–आर्थिक बाबतीतील नवीन आडाखे अचूक निघण्यासाठी विचार करूनच व्यवहार करा. प्रसिद्धी व
जाहिरात क्षेत्रातील सर्व मंडळींना या सप्ताहात नव्याने करार करण्यास हरकत नाही. लाभातील रवी , बुध व शुक्र
“ छप्पर फाडके ” म्हणजे काय याचा अनुभव देणार आहेत. श्री महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या उद्योगातील
मागील येणे जे बाकी आहे ते मिळण्याचे संकेत मिळतील. ज्या अधिकार पदाची सूत्रे तुम्हाला स्विकारायची
आहेत त्या पदाला तुम्हीच कसे योग्य आहात याची चर्चा सहकार्यांमधे होईल. श्री गणेशाच्या आशिर्वादाने प्रकृती
बाबतच्या अडचणी तर दूर होतीलच पण वयस्कर मंडळीना प्रकृती सुधारत असल्याचे जाणवेल.
कर्क :–11, 12 ची अमावास्या तुमच्या भाग्याविषयीचे संकेत देईल. ज्या मंडळींचे मोठे व्यवसाय आहेत त्यांना
तर हा गुढीपाडवा खूपच लाभदायक आहे. लहान घरगुती उद्योग करणार्यांना नवीन आँर्डर्स मिळतील. खाण्याच्या
पदार्थ्यांच्या उद्योगातून तुमचे चांगले भांडवल उभे राहील. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही चळवळीत
भाग घेऊ नका. श्री दत्तगुरूंच्या कृपेने व वडीलांच्या मदतीने अवघड कामेही सोपी होतील. या सप्ताहात फक्त
न्यायालयाच्या कामकाजात जराही हस्तक्षेप करू नका. वकिलांना त्याच्या पद्धतीने काम करण्याची संधी द्या.
उच्चशिक्षणाच्या बाबतीत पूर्ण विचारानेच नियोजन करा. परदेशी जाणे व तेथे राहणे तुम्हाला फारसे लाभदायक
राहणार नाही.
सिंह :–हा गुढीपाडवा तुमच्या भाग्यस्थानात होत असल्याने हे पूर्ण वर्षभर तुमच्याकडे धार्मिक कार्याची रेलचेल
राहील. गुरूवर्य, वडिल यांच्या मार्गदर्शनाने कुळाचार व पूजा अर्चा यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. पूर्व
पुण्याईमुळे तुमच्या हातातून गेलेले घर किंवा शेतजमीन पुन: तुम्हाला परत मिळण्याचे निर्णय होतील. प्रत्येक
अडचणीच्या वेळी परमेश्वरी शक्ती तुमच्याबरोबर असल्याचे तुम्हाला जाणवेल. आजवर इतरांसाठी केलेल्या
मदतीचे आशिर्वाद कामाला येतील. धर्मग्रंथांचे वाचन करणार्याना समाज हिताच्या दृष्टीने उपदेश व
समुपदेशन करता येईल. उद्योग व त्यातील कर्तव्याला प्रथम महत्व दिल्यासहोणारी उन्नत्ती अचंबित करणारी
ठरेल. कोणत्याही कामासाठी लाचलुचपत, भ्रष्टाचाराचा वापर करू नका व केल्यास भयानक अडचणीत याल.
कन्या :–नोकरीतील कामाच्या नवीन पद्धतीमुळे होणारी कामे वरीष्ठांकडून गौरविली जातील. मिडियाचा
वापर करताना सामाजिक भान ठेवून काम करावे लागेल. वार्ताहर, संपादक, पत्रकार यांनी कोणाच्या दबावाखाली
काम केल्यास तुमच्या कामाची दिशाच बदलून जाईल. श्री गजाननाच्या कृपेने प्रथम संततीच्या आजारावर
योग्य उपचार करणार्या डाँक्टरांची माहिती होईल. लहान सहान कारणावरून वयस्कर मंडळीना ब्लडप्रेशर वाढत
असल्याचे जाणवेल. विवाहेच्छूना वयात जास्त अंतर असलेल्या जोडीदाराचे स्थळ पसंत पडेल. महिलांना
अचानक ओटीपोट, गुप्तइंद्रिये यांचा त्रास सुरू होईल. सँरोगसीच्या गर्भवती स्त्रीयांनी युरीन इन्फेक्शन होऊ नये
याची काळजी घ्यावी. श्री दत्तमहाराजांच्या कृपेने लहान मुलांचे आजार बळावणार नाहीत.
तूळ :–सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना धर्मगुरूंकडून व गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल व गेले वर्षभर
अडलेले काम मार्गी होण्याची चिन्हे दिसतील. श्री गुरूकृपेने तीर्थ क्षेत्राबरोबरच संपर्क साधला जाईल व सद्गुरू
ची सेवा करण्याची संधी मिळेल. हा गुढीपाडवा तुम्हाला तुमच्या व्यवसायातील अडचणी, कर्जे दूर करणारा आहे.
व्यवसाय, घरगुती लहान उद्योग यातील वृद्धी टिकून राहण्यासाठी श्री विष्णूची उपासना करावी. संशोधन
क्षेत्रातील काम करणार्या तरूण वर्गास नवीन प्रेरणेने काम करण्याची उत्तम संधी मिळेल. श्री विष्णूच्या
उपासकांना संत पुरूषांचे मार्गदर्शन मिळेल. द्वितीय संततीच्या शिक्षणाबाबत आता काळजी करावी लागणार
नाही.
वृश्र्चिक :–हा गुढीपाडवा तुमच्या नोकरीच्या स्थानात असल्याने तेथील अडचणी आता आपोआपच कमी होऊ
लागतील. नोकरीतील प्रमोशनच्या विषयासाठी कोणताही वशिला लावू नये किंवा आर्थिक देवघेवही करू नये. श्री
गजाननाच्या कृपेने सर्वकाही तुमच्या मनासारखे होणार आहे. पारंपरिक ज्योतिषशास्त्र शिकणार्यानी
मंगळवारी पाडाव्या दिवशी श्री गणेशाचे पूजन, प्रार्थना करून अभ्यासाला सुरूवात करावी. श्री गणेशाच्या व श्री
सरस्वतीच्या रितसर पूजन विधी गुरूजींकडून समजून घ्यावा. व्यवसायातील व लहान घरगुती उद्योगातील
वृद्धीसाठी थोडीशी केलेली मेहनतही लाभ देईल. शिक्षकांनी व्यक्तीगत शिकवण्याकडे जास्त लक्ष द्यावे.
शाळकरी मुलांनी कोणतीही भिती न बाळगता पालकांबरोबर सुसंवाद करावा.
धनु :–मंगळवारचा गुढीपाडवा तुमच्या जिवाभावाच्या, प्रेमाच्या स्थानात आहे. त्यामुळे या वर्षाची सुरूवातच
एकदम आनंदात व उत्साहात जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्यांमुळे जीवनात आनंद निर्माण होईल.
अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांनी श्री गणेशाच्या कृपेने अपेक्षापूर्ती होण्यासाठी प्रार्थना करावी. 16
तारखेच्या विनायक चतुर्थीला श्री गजाननाला दवणा वाहून लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. प्रत्येक विनायक चतुर्थी
ला नामस्मरण करावे. गुढीपाडवा संततीस्थानातच असल्याने संतती प्राप्तीची खात्री बाळगून श्री गणेशाची
सेवा व उपासना करावी. या वर्षात गुंतवणूकही दम मारून करता येणार आहे. बर्याच कालावधीपासून
असलेल्या प्रकृतीच्या कुरबुरी कमी होऊ लागणार आहेत.
मकर :–सुख स्थानात होणारा गुढीपाडवा सर्व सुख घेऊन येणार आहे. ज्यांचे बर्याच कालावधीपासून काहीना
काही आजारपण सुरू आहे त्यांचे आजारपण हळूहळू कमी होऊ लागणार आहे. ज्या पतीपत्नीचा भागिदारीत
व्यवसाय आहे त्यांना तर सुखात न्हाऊन निघता येणार आहे. शेती वाडी जमीन जुमला गायी म्हशी असलेल्यांना
आपल्या घरी स्वर्ग आल्याचे जाणवेल. घरदार, बागबगीचे असलेल्यांना आकाश ठेंगणे होईल इतकी सुखाची
रेलचेल होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी वाटणार्या गोष्टी आता कमी होऊ लागतील. प्रत्यक्ष
आईचा सहवास लाभेल व कुटुंबात आनंदीआनंद राहणार आहे. विवाहेच्छूचे विवाह श्री गजाननाच्या कृपेने
मनासारखे होणार आहेत. तरी श्री गणेशाची उपासना करा व त्याचे नामस्मरण करा.
कुंभ :–गुढीपाडवा तुमच्या पराक्रम स्थानात आल्याने तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहणार आहे. श्री गणेशाच्या
कृपेने, तुम्ही मनात आणावे व ती गोष्ट तुमच्या प्रयत्नाने सफल व्हावी हाच संकेत हा गुढीपाडवा देत आहे.
विद्यार्थ्यांचे परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे पण ते शिक्षणासाठी नाही तर नोकरी निमित्ताने. ज्यांचे
व्हिसा लवकर मिळत नाहीत त्यांनी आता प्रयत्न करायला हरकत आही. काही गोष्टी कायमस्वरूपी न मिळता
त्याबाबतचे करार करावे लागतील. रेल्वे, पोस्ट, टेलिफोन या क्षेत्रात असलेल्यांना आपल्या कामात अतिशय
पारदर्शकता ठेवावी लागेल. तसेच ज्यांचे प्रमोशन रखडले आहे त्यांना चांगली संधी आहे. जाहिरात क्षेत्रात
असलेले वार्ताहर, संपादक यांना मिळणारी प्रसिद्धी अमाप असेल.
मीन :–तुमची इच्छाशक्ती इतकी तीव्र असेल की तुमच्या मनातील इच्छा श्री महालक्ष्मी पूर्ण करणार आहे.
तुमचे आरोग्य व प्रतिकारशक्ती याविषयी तुम्हाला विचारच करायला नको. हा गुढीपाडवा तुमच्या धनस्थानात
आल्याने धनलाभाचे प्रसंग मोजताच येणार नाही. ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांनी आपल्या व्यवसायात आवश्यक
तो बदल केल्यास जनमानसात तुमचा ठसा उमटेल. आजवर तुमच्यापासून दूर गेलेले नातेवाईकांच्या बरोबर
मनोमिलन होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करताना तुमचा
आनंद गगनात मावणार नाही. तसेच जोडीदाराच्या, मुलांच्या मागण्या व अपेक्षा पूर्ण करताना कृतकृत्य
झाल्याचे जाणवेल. सामाजिक कार्यासाठी तुमच्या हातून दानधर्म होणार आहे.
||शुभं-भवतु ||