daily horoscope

शनिवार 10 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 10 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 10 एप्रिल आज चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 06:45 पर्यंत व नंतर उत्तराभाद्रपदा वरील
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
आज शुक्र मेष राशीत 06:28 ला प्रवेश करत आहे.

आजचा दिवस अशुभ असल्याने महत्वाची कामे करू नका.

मेष :–आज मुलांची कामे जबाबदारीने तुम्हाला एकट्यालाच करावी लागणार आहेत मनोरंजनासाठी वेळ काढता येणार
नाही. मात्र तुमच्या आवडीच्या छंदावर वेळ खर्च करता येईल. लहान मोठ्या निर्णयात मोठ्यांची मदत लागेल.

वृषभ :–तुम्हाला आज दुसर्यांवर मदतीसाठी अवलंबून रहावे लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी नवीन कामाला सुरूवात
आज करू नका. व्यावसायिकांनी आपल्या मालाच्या मोठ्या उठावासाठी कांही युक्त्या योजणे आवश्यक राहील.

मिथुन :–आज तुमचे मन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विषयामधे गुंतून राहील. कामात मन लागणार नाही.
व्यावसायिकांना मात्र फक्त पैशाचे व्यवहार सुचतील.राजकीय क्षेत्रातील मंडळीना बुद्धीचातुर्याने अनेक मार्ग सुचतील.
वडीलांची प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना आज तुमच्याकडून घडणार आहेत.

कर्क :–धार्मिक गोष्टी बाबतच्या ज्ञानी मान्यवरांचा सन्मान होणारे प्रसंग येतील.न्यायालयीन कामकाजात आलेले
अडथळे दूर करण्याचे मार्ग वकिलांना सुचतील. सेवाभावी काम करणार्या सेवकांना समाजाकडून आर्थिक बक्षिसी मिळेल.

सिंह :–(नोकरीच्या ठिकाणी आलेल्या मानसिक ताणतणावामुळे इतरांसमोर ज्या बाबी उघड करावयाच्या नाहीत त्याच
नेमक्या उघड केल्या जातील तरी काळजी घ्यावी लागे.) गुप्तता पाळा. नको तिथे अती बुद्धीची हुशारी दाखवल्याने
मानहानीचा प्रसंग येईल. महत्वाच्या वस्तूला सांभाळा, बाथरूम, शौचालय , गटार यामध्ये पडण्याचा धोका आहे.

कन्या:–निवडणूकीतील राजकीय स्पर्धकांना तुम्ही तुमच्या बोलण्यातील कौशल्याने गप्प कराल. विवाहाच्या बाबतीत
अतिशय कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोडीदाराची भेट होईल. द्वितीय संततीबरोबरील व्यवसायातील व्यवहार मानसिक त्रास
देतील.

तूळ :–जनसमुदायासमोर किंवा वरिष्ठांसमोर तुम्ही तुमचा युक्तीवाद अतिशय कौशल्याने सादर कराल. पतीपत्नीच्या
वादविवादात दोघेही आज तुल्यबल राहतील तरी आज कुटुंबात शांतता ठेवा. तरूणांनी पचनसंस्थेवर ताण पडणारे पदार्थ
खाऊ नयेत.

वृश्र्चिक :–शब्दकोडी तसेच बुद्धीचा कस लावून द्यावयाच्या स्पर्धेत तुम्ही अग्रेसर व्हाल. शिक्षक, प्राध्यापक यांना लाँक
डाऊनच्या कालावधीत केलेल्या कामाची पोचपावती मिळेल. मंत्रविद्येचे शास्त्र शिकवणार्या गुरूजींना आपल्या
शिष्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

धनु :– बोबडे बोलणार्या लहान मुलांवर शब्दसंस्काराचा चांगला उपयोग झाल्याचे जाणवेल. शिक्षक व प्रोफेसर मंडळीना
बुद्धीच्या जोरावर जग जिंकल्याचा आनंद मिळेल. आईच्या लिव्हरचे दुखणे आटोक्यात येत असल्याचे जाणवेल.

मकर :–समुपदेशनाच्या क्षेत्रातील मंडळींचा मोठा सन्मान होईल. सरकारी योजनांतून तुंम्हाला एखादे काम मिळणार
असल्याची आशा निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने उच्चशिक्षणाविषयी निर्णय घ्या अन्यथा
अडचणी निर्माण होतील.

कुंभ :– व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थितीत अचानक चढ उतार जाणवेल. महत्वाच्या वस्तूंची खरेदी करताना
व्यावहारिक विचाराने करा. वयस्कर मंडळींच्या तोंडाची अन्नाची चव कमी होईल. लहान हाँटेलवाल्यांना खानावळीच्या
जागेची स्वच्छता काटेकोरपणे पाळावी लागेल.

मीन :–आज तुमच्या स्वभावातील हजरजबाबीपणा व परखडपणा उसळून येईल.उत्पादन क्षेत्रातील कामात शिस्त
पाळल्याने चांगली प्रगती होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जाताना आज प्रथम पूर्वदिशेला चार पाउले
चालून मग मार्गस्थ व्हा.

 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “शनिवार 10 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *