Read in
शुक्रवार 09 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 09 एप्रिल आज चंद्ररास कुंभ 24:16 फर्यंत. व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा अहोरात्र.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– सध्या घेत असलेल्या शिक्षणात तुम्हाला चांगले यश मिळणार असल्याचे संकेत मिळतील.प्रवास करण्याचा विचारही करू नका. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून अतिशय सावध राहण्याची गरज आहे संधीचा फायदा घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करतील.
वृषभ :–कोणत्याही प्रकारचे काम करत असलात तरी त्यातून तुम्हाला व्यवसायवृद्धीच्या कल्पना सुचतील व दिशाही सापडतील. महिलांच्या घरगुती उद्धोगाची पसार्यात वाढ होईल. बँकेच्या कोणत्याही व्यवहारात इतरांची मदत घेऊ नका.
मिथुन :–पित्तप्रकृतीच्या मंडळीना अचानक त्रास होऊ लागेल. विद्यार्थी वर्गाने आजपर्यंत आपण केलेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील अभ्यासाची दिशा ठरवावी. नोकरीतील कायदेशीर बाबींची जबाबदारी आजपासून तुमच्यावर सोपवण्यात येईल.
कर्क :–आज आर्थिक नुकसानीचा दिवस असल्याने नव्याने कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी करण्याचा प्रयत्न कराल.
सिंह :– चार माणसात किंवा आँफीसच्या ठिकाणीस्वत:चा मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. लहान मुले आपला हट्टीपणाचा अतिरेक करतील. व्यवसायातील उधारी वसूल करण्यासाठी आज फोन केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.
कन्या :–नोकरीतील अडचणी, तुमच्यावर आलेले संकट यावर पूर्ण संयमाने विचार करा. ताबडतोप दिलेल्या उत्तरामुळे नुकसान होईल. कुटुंबात निर्माण होणारा ताणतणाव हा अती रागामुळे होईल. तरूणांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो.
तूळ :–सरकारी कोणतेही काम रखडले असल्यास त्यात तुम्ही स्वत: लक्ष घालावे. कामाचा व्याप वाढल्यामुळे अशक्तपणा येईल तरी महिलांनी कामाचाही अतिरेक करू नये. व्यवसायातील पतप्रतिष्ठेत वाढ होत असल्याचे जाणवेल.
वृश्र्चिक :– नव्याने गुंतवणूक करावयाची असल्यास तज्ञांच्या सल्ल्याने विचार करायला हरकत नाही.व्यावसायिकांनी योग्य नियोजन केल्या व्यवसायातील वृद्धी समाधानकारक राहील. नोकरीत आपले काम वेळेवर करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.
धनु :– आर्थिक मंदीच्या कचाट्यात सापडलेल्याना नवीन पर्याय उपलब्ध होतील. नोकरीतील एका जबाबदारीतून मुक्त होण्यापूर्वीच नवीन दुसरी जबाबदारी अंगावर येऊन पडेल. महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी.
मकर :–मित्राच्या रखडलेल्या कामाला पुर्वपदावर आणण्यासाठी त्याला मदत करावी लागणार आहे. प्रवासासाठी तुम्हाला आजचा दिवस त्रासदायक असल्याने प्रवास करू नये. महत्च्याच्या कामाकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
कुंभ :–कुटुंबातील आजारी माणसाबाबत काळजी दूर करणारी बातमी कळेल. कोणतेही निर्णय अंदाजाने न घेता त्याच्या वस्तुस्थितीचा विचार करा. भावनेच्या भरात आर्थिक नुकसान करून घ्याल. मनातील द्विधा मनस्थितीवर मात करता येणार नाही. आज शांत रहा.
मीन :– कुटुंबातील नात्यात अचानक दुरावा होण्याचे संकेत मिळतील. पतीपत्नीमधील वादाचे रूप कमी होऊन सामंजस्य वाढेल. रखडलेल्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी मित्रांची किंवा सहकार्यांची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी उन्हाचा त्रास होईल.
| शुभं-भवतु ||