Read in
गुरूवार 08 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 08 एप्रिल आज चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 28:56 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–पैसा ऐंश्र्वर्य यांच्याबाबतीतील उदासिनतेत अचानक वाढ होईल. पितृसुखाचा गोड क्षण अनुभवाल. कुटुंबात नव्याने येणार्या गोड पाहुण्याचे जोरदार स्वागत कराल. नव्याने केलेली गुंतवणूक लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतील.
वृषभ :–व्यवसायाच्या मार्गातून होणारा धनलाभ अचंबित करेल.कालपासूनची चाललेली धावपळ आजही तशीच राहणार आहे. पुरूषांना सासुरवाडीकडील मंडळींच्या प्रकृतीच्या अडचणीसाठी प्रत्यक्ष मदत करावी लागेल. सरकारी क्षेत्रातील महिलांवर कामाची जबाबदारी वाढेल.
मिथुन :–पूजा, प्रार्थना याबाबतचे समज गैरसमजावर ज्येष्ठ तज्ञ व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला मिळेल. न्यायालयीन कामकाजातील माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. मनाने एकांगी विचाराने निर्णय घेऊ नका नुकसान होईल.
कर्क :–पूर्वीच्या व्यवहाराच्या बाबतीतील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना अजूनही मार्ग सापडल्यामुळे मानसिक त्रास होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड जाणार्या विषयासाठी भरपूर मेहनत घ्यावी व मार्गदर्शनही घ्यावे. पोलीस खात्यातील वरीष्ठांनी अँक्शन रिअँक्शन करू नये.
सिंह :–तुमच्या घरातून चोरी झालेल्या वस्तूंचा अचानक सुगावा लागेल. राजकीय क्षेत्रातील घडामोडींवर कोणतेही भाष्य करणे टाळा. नोकरीतील कामाच्या उत्तम नियोजनामुळे कामाचे यश मिळाले आहे हे लक्षांत घ्या. आर्थिक बाबतीत चोख रहा.
कन्या :–निवडणूकीतील सुंदोपसुंदावर कोणतेही विचार व्यक्त करू नका. पाळीव प्राण्याच्या आजारपणावर ईल उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागेल. वयस्कर मंडळीनी सध्याच्या कोरोनाच्या काळात अतिशय काळजी घ्यावी हलगर्जीपणा करू नये.
तूळ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा अनादर करू नये. वस्तूस्थितीचा स्विकार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील.
वृश्र्चिक :– स्थावर मालमत्तेसंबधातील रेंगाळलेला व बिघडलेला प्रश्र्न चर्चेने सोडवता येणार आहे. प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तीकडून वयस्कर महिलेचे नोकरीचे काम होईल. सरकारी क्षेत्रातील गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नका.
धनु :–कुटुंबात जवळच्या नातेवाईकांचे येणे होईल. भूतकाळातील घटनांवर सध्याचा प्रसंग पडताळू नका कोणताही संदर्भ लागणार नाही. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळली तर वयस्कर मंडळीना कोणताही त्रास होणार नाही.
मकर :–महिलां आपल्या सौंदर्याविषयी जास्त जागरूक राहतील. पुरूषांच्या उजव्या पायाचे पूर्वीचे दुखणे पुन: डोके वर काढेल. मनातील इच्छा अपेक्षांची लवकर पूर्तता होणार असल्याचे लक्षांत येईल. विवाहिताना वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची गरज जाणवेल.
कुंभ :–तरूणांच्या व मुलांच्या आयुष्यातील प्रश्र्नांना महत्व देऊन विचार करा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस अतिशय लाभदायक राहील. आज विरोधकांची भिती अजिबात मनात ठेवू नका.नोकरीतील कांही जबाबदार्या तुमच्यावर व्यक्तीवर सोपवण्यात येथील.
मीन :–नोकरीतील कामाचे योग्य नियोजन केल्यास कामात सुसूत्रता येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी कोणत्याही कामात उगाच घाईगडबड करू नये. आय. टी. क्षेत्रातील तरूणांना नवीन नोकरीच्या संधीचा फायदा घेता येणार आहे.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai