daily horoscope

बुधवार 07 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 07 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 07 एप्रिल आज चंद्ररास मकर 14:59  पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27:32  पर्यंत व नंतर शततारका.

वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–तुम्ही सामाजिकदृष्टय़ा ज्या विषयावर काम करत आहात त्याच्यातील प्रगती समाधानकारक असल्याचे लक्षांत येईल. मैदानी खेळाडूनी ज्या खेळात प्राविण्य मिळवले आहे त्याच विषयाशी संबंधित  तुम्हाला नोकरीची संधी चालून येईल.

 

वृषभ :–संशोधन क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारांना  सपोर्टीव्ह काम कराल. सेवाभावी वृत्तीने वागणाऱ्यांना सामाजिक संस्थेत काम करण्याची नोकरी मिळेल. महिलांना  मुलाच्या कर्तृत्वाने मान सन्मान मिळेल.

 

मिथुन :– स्त्रीया आपल्या वैयक्तिक धनाचा वापर सामाजिक कार्यासाठी दान किंवा मदत म्हणून देतील. उच्चशिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍यांनी आता परदेशी जाण्याचा विचार सोडून द्यावा. जून्या मैत्रिणीकडून भेटीखातर देवाचीच मूर्ती भेट म्हणून मिळेल.

 

कर्क :–पुरूषांनी आपल्या भावनाना आवर घालण्याची गरज आहे. भागिदारीच्या व्यवसायातील अडचणींवर चर्चा केल्यास नक्कीच मार्ग सापडेल. निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना कामातील गुप्तता पाळण्यात काटेकोर रहावे लागेल. अचानक आर्थिक खर्च वाढणार आहे.

 

सिंह :– दूरगावी, परगावी असलेल्या मुलांना आपल्या आईवडिलांची कमतरता प्रकर्षाने जाणवेल. पुरूषांना क्राँनिक दुखण्याचा त्रास होईल व  डाँक्टरांचा सल्ला आवश्यक राहील. शासकीय वैद्यकीय अधिकार्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल.

 

कन्या :–ज्योतिष शास्त्रातील तज्ञांना एखाद्या आव्हानाला उत्तर द्यावे  लागेल. व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळवण्याच्या कामातील अडथळा दूर होत असल्याचे जाणवेल. जमिनीच्या  व्यवहाराची  चर्चा करण्यासाठी सुद्धा आजचा दिवस यशकारक राहणार नाही.

 

तूळ :–नवीन वाहन घेण्याचे मनसुबे आखू नका. कोणत्याही परिस्थितीत लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या टाकीजवळ जाऊ देऊ नका. स्थावर जागेची कामे सध्या स्थगित करा. मुलांच्या मनातील विचार जाणून घेण्यासाठी त्यांना बोलते करण्याची गरज आहे.

 

वृश्र्चिक :–हार्टचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये. कुटुंबातील ताण तणावावर आवर न घातल्यास  वाद वाढत जाण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी घरात चालताना पाण्यावरून घसरणार नाही याची काळजी घ्यावी. गुंतवणूक करताना निमसरकारी क्षेत्रात करू नका.

 

धनु :–ज्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना टाळू नका. नोकरीत येणार्‍या अडथळ्यांवर योग्य नियोजनामुळे मात करू शकाल. जोडीदाराच्या रागीट स्वभावासमोर शांत राहिलात तर घरातील वातावरण बिघडणार नाही. वयस्कर महिलांना विश्रांतीची गरज भासेल.

 

मकर :–सरकारी नोकरदारांनी आपल्यावर असलेली जबाबदारी काटेकोरपणे पाळावी. स्वार्थी लोकांच्या शब्दात फसू नका. तरूणांना आजपर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ मिळणार असल्याच्या सूचना मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी सत्संगाची मदत मिळेल.

 

कुंभ :–तरूणांना मानसिक व बौद्धीक  कामामुळे अशक्तपणा वाटेल. व्यवसायासाठी पूर्वी केलेले प्रयत्न फलदायी ठरल्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करता येणार आहे. प्रेमसंबंधात मैत्रिला गृहित धरू नका व मैत्रिची चेष्टा ही करू नका.

 

मीन :–मनाशी बाळगलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून वादावर येऊ नका. कोरोनाच्या नाजूक कालावधीत वयस्कर मंडळीना जपावे लागेल.

 

| शुभं-भवतु ||

 

One thought on “बुधवार 07 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *