Read in
मंगळवार 06 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 06 एप्रिल आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 26:33 पर्यंत.,नंतर धनिष्ठा.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–विद्यार्थ्यांनी आपण केलेला अभ्यास व मेहनत याची सांगड घालूनच याबाबतचा विचार करावा. व्यवसायात समोर आलेली परिस्थिती आपणच निर्माण केली आहे हे लक्षात घ्या. कोणत्याही कामात, विषयात राजकारण आणू नका.
वृषभ :–वडिलांच्या बाबतीतील हलगर्जीपणा त्रासदायक ठरेल. कामाच्या बाबतीत दोलायमान झाल्याने तुम्ही कोणताच निर्णय घेऊ शकणार नाही. धर्मग्रंथ वाचणार्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याचे जाणवेल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस सन्मान कारक राहील.
मिथुन :–आज कोणत्याही प्रकारचा जुगार नुकसान करणारा ठरेल. कामाच्या बाबतीत नशीबापेक्षा मेहनतीला महत्व दिल्या कामात यश मिळेल. महिलांकडून मानसिक भितीपोटी हातातील कामात चुका होतील व त्यामुळे मनस्ताप होईल.
कर्क :–तुमच्या बोलण्यातील वकीलील भाषा तुम्हालाच अडचणींत आणणार आहे. कोणत्याही संकटातून तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळावर आज बाहेर पडाल पण पुन्हा अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दखल घ्या. खुल्या मनाने इतरांची मदत घ्यावी लागेल.
सिंह :–व्यवसायातील नव्या मार्गांची जरी माहिती मिळाली तरी आज कोणतेही नव्याने विचार करू नका. विवाह मंगळ कार्यालय, सभागृह यासंबंधात पैशाच्या लोभाने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नयेत. ज्येष्ठांनी आपले स्पष्ट मत मांडणे महत्वाचे आहे.
कन्या :–नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुम्हाला आपणहून काहीही करण्याची गरज नाही. नवीन प्रोजेक्टवर काम करताना तुम्हाला स्वत:ला सिद्ध करता येणार आहे. तरूणांना साथीच्या आजाराचा अचानक त्रास होऊ लागेल. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून योजना आखाव्यात.
तूळ :–मुलांच्या व आईवडीलांच्या विचारात अचानक मतभेद निर्माण होऊन खटाखटी होईल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपल्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी. अध्यात्मिक उपासकांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल.
वृश्र्चिक :–शाळा काँलेजमधील प्रवेशाबाबत चर्चा करून घोळ निर्माण कराल. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा व पायाला मुंग्या येण्याचा त्रास येईल. स्वत:च्या व्यवसायाच्या कार्यालयातील बसण्याची जागा बदलून पाहिल्यास नक्कीच फरक पडेल.
धनु :–वारसाहक्कातून धनलाभ, सोनेनाणे याविषयीच्या वाटणी बाबतची चर्चा ज्येष्ठांच्या मदतीने सोडवा. महसूल खात्यातील कर्मचार्यांना गुप्त कारवाया मधे सहभागी करून घेण्यात येणार असल्याची कुणकुण लागेल. लहान मुलांचे अती खाण्याने पोट बिघडेल.
मकर :–मनाची चलबिचलता वाढून मानसिक अस्वस्थता येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर असलेल्या विश्र्वासाला तडा जाणार नाही याची दखल घ्यावी. शेअर्समधील गुंतवणूकीतून चांगला लाभ होणार आहे.
कुंभ :–राजकीय मंडळींना गुप्तशत्रूंचा त्रास होईल. पुरूष मंडळीनी बायकांच्या व्यवहारात दखल दिल्याने गैरसमज निर्माण होतील. घरातील तिजोरीच्या किंवा कपाटाच्या चोरकप्यातून महत्वाच्या गोष्टी गायब होण्याची सूचकता मिळेल.
मीन :–मोठ्या कुटुंबात सुना व जावई यांच्यातील एकोपा वृद्धींगत होईल. वडिल भावंडाच्या प्रथम संततीच्या आजारपणावर जास्त लक्ष द्यावे लागेल. राजकीय मंडळींचा अचानक प्रतिष्ठेबाबतचा प्रश्र्न मानसिक क्लेश देईल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai