daily horoscope

सोमवार 05 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 05 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 05 एप्रिल चंद्ररास धनु  08:01  पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 26:04  पर्यंत व नंतर श्रवण.

वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍यांना अचानक मोठ्या प्रोजेक्टमधे सामावून घेतले जाईल. कलाकार मंडळींना आपल्या कलेतील नवनवीन प्रयोगाविषयी तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. तुमचे धाडस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.विचाराना प्रयत्नांची जोड दिल्यास आछ्चर्यकारक अनुभव येईल.

 

वृषभ :–सततच्या कामामुळे दमणूक होऊन मानसिक थकवाही येईल. मानसिक शांतीसाठी  आवडत्या गोष्टी करा. कोणतेही काम करताना मानसिक ताण येणार नाही याची दखल घ्या. मित्रमंडळींबरोबर केलेली चर्चा फलद्रूप होईल.

 

मिथुन :–मनाविरुद्ध असलेले निर्णय तुम्हाला मानसिक त्रास देतील. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची दिशा चुकत  नसल्याची खात्री करावी. व्यसनापासून  दूर राहण्यासाठी निछ्चय केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल.. ज्येष्ठ मंडळीनी अती परिश्रम करणे टाळा.

 

कर्क :– नोकरीच्या ठिकाणी शाब्दिक चकमकी होतील. उत्पादन क्षेत्रातील कामगार मंडळीना एकाच वेळी अनेक कामे सुरू करता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर चर्चा करताना वेगळ्या दिश्या मिळणार आहेत. नैसर्गिक साधनांचा विचार करा.

 

सिंह :–मनातील विचारांना व्यक्त करा. कोणत्याही  विषयावर थेट बोलणे आज तुम्हाला टाळावे लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या परिक्षेविषयीची चिंता सतावेल. कुटुंबातील आनंद द्विगुणित करणार्‍या घटना घडतील. स्वतः वाहन चालवून प्रवास करू नका.

 

कन्या :–आईवडीलांनी संततीला वस्तुस्थितीची जाणिव द्यावी. महिलांना आज आत्मपरीक्षण करायला लागणार आहे.कुटुंबातील लहानसहान गोष्टीवरून भावंडामधे मतभेद निर्माण होतील तरी बोलण्यावर संयम ठेवावे महत्वाचे आहे.

 

तूळ :–तुमच्या व्यवसायातील अडचणींचा इतर लोक किंवा प्रतिस्पर्धी फायदा घेणार नाहीत याची दखल घ्या. बँकेची कामे घाई गडबडीत केल्यामुळे गोंधळ होईल. नोकरीतील आँडीटर अकाउंट्स सेक्शनमधील मंडळीनी  व्यवहारातील पारदर्शकता तपासावी.

 

वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. महिलांनी आपली कामे इतरांवर सोपवल्याने कामे बिघडणार आहेत. व्यवसायातील बँकेच्या कर्जाबाबत चिंता निर्माण होणार्या घटना घडतील.

 

धनु :– आज सकाळपासूनच कुटुंबात आनंदाचे वारे वाहू लागेल. सरकारी क्षेत्रातील महिलांना अचानक कामाच्या संदर्भात एखादी नोटीस मिळेल. लहान भावाच्या मुलांना आजारपण येण्याची चिन्हे आहेत. तरी काळजी घ्यावी.

 

मकर :–नवीन खरेदी करण्याच्या विचारात मर्यादेपेक्षा जास्त खर्च कराल. घर ते नोकरीचे ठिकाण एवढाही प्रवास नकोसा होईल. मानदुखी व पाठदुखीने त्रस्त झालेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचारही घ्यावेत.

 

कुंभ :–दवाखान्यातून डिसचार्ज मिळणार्‍या पेशंट्सना ठरलेल्या दिवशी डिसचार्ज मिळणार नाही. राजकीय मंडळीनी सध्या कोणताही विषयी विरोधी वक्तव्ये करू नयेत. ज्येष्ठांनी आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.

 

मीन :–महिलांना सासू सासर्‍यांच्या प्रकृतीबाबत फारच जागरूक रहावे. मुलीच्या विवाहाबाबतची प्रश्र्न कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीने सोडवाल. आज कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करू नका. नोकरीत कामाचा ताण आणि बदलीचे वारे मानसिक ताण वाढवेल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “सोमवार 05 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *