Read in
शनिवार 03 एप्रिल चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 03 एप्रिल चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 26 :38 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–व्यवसाय उद्योगात अचानक बदल करण्याचे विचार मनात येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याचे लक्षात येईल तरी त्यानुसार प्रयत्न करावेत. वडिलांच्या वाढदिवसानिमीत्त कुटुंबात उत्सव साजरा होईल.
वृषभ :–आज प्रवास करणार असाल तर वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण होईल. शैक्षणिक साधनांच्या व्यावसायिकांनी स्वत:चे नवीन नियम तयार करू नयेत. ज्येष्ठांनी आपले मत व्यक्त करताना दहा वेळा विचार करावा लागेल.
मिथुन :– बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्यांनी आजच्या आहाराविषयी जागरूक रहावे. मुलांच्या खोटे बालण्यावर पालकांना उपाय करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील महिलाना त्याच्या अधिकारांवर दबाव आणल्याचे जाणवेल. औषध कंपनीच्या शेअर्स मधून चांगला फायदा.
कर्क :–नोकरीतील दुसर्यांवर असलेली जबाबदारी तुमच्यावर सोपविण्याचे ठरेल. लहान मुलांच्या डोळ्याबाबत अतिशय जागरूक रहावे लागेल. मामाकडील ख्याली खुशाली न कळल्याने प्रवास करावा लागेल. वडीलांच्या पेन्शनचे काम या महिन्यापासून सुरू होईल.
सिंह :–प्रेमाच्या व्यवहारात प्रत्येक गोष्टीत नियम लावू नका व वादही घालू नका. महिलांना घरचे काम व आँफीस चे काम सांभाळताना आज दमछाक होणार आहे. व्यावसायिकांना बँकेकडून वाढीव भांडलास मंजुरी मिळत असल्याचे कळेल.
कन्या :–आई आज जास्तच भावूक झाल्याचे जाणवेल. वयस्कर मंडळीनी मनातील भावना व्यक्त करण्यास हरकत नाही. सध्या नवीन गुंतवणूक करू नका व विशेष किमती खरेदी पण करू नका. कुटुंबात प्रेमाचे, सहकार्याचे वातावरण राहील.
तूळ :–विद्यार्थी तसेच तरूण वर्ग एखाद्या गड किल्ल्याच्या मोहिमेवर जाण्याच्या योजना ठरवतील. बहिणीकडून भावाच्या आजवरच्या कष्टाचे कौतुक होईल. व्यवसायात मोठी वसुली करणार्या अधिकार्याला मानसिक त्रास होईल व प्रसंगी दोन चार दणकेही मिळतील.
वृश्र्चिक :–सतत डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा. वकिली क्षेत्रातील मंडळीना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. खाजगी शिकवणी वर्गाचे नवीन वर्ष आत्ताच सुरू केल्यास आत्ता या वर्षासाठी भरभरून दाद मिळेल.
धनु :–वयस्कर मंडळीना अंगदुखी व तापाचा त्रास जाणवेल. तरूणांना मानसिक त्रास व तणाव निर्माण करणार्या घटना घडतील. कुटुंबात कनिष्ठ मुलीच्या मंगलकार्याची चर्चा होईल. सामंजस्य स्थापित करण्यासाठी तुमच्या आवडत्या व्यक्तीची मदत घ्या.
मकर :–प्रकृती अस्वास्थ्यामूळे आज काहीही करावयास नको अशी भावना राहील. नवीन नोकरीच्या शोधात असणार्यांना पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून बोलावणे येईल. कंपनीच्या पतप्रतिष्ठेचा विचार करून निर्णय पक्का करा.
कुंभ :–कामाचा केलेल्या कंटाळा व त्यातील हलगर्जीपणामुळे नोकरीत वरीष्ठांकडून बोलणी खावी लागतील. पूर्वनियोजित कामामधे बदल करावयाचा झाल्यास एकट्याच्या मताने करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन :–विद्यार्थी वर्गाला परिश्रमाशिवाय यश मिळणार नाही हे लक्षात घ्यावे लागेल. आँफिसचे नूतनीकरण करण्याचे विचार वेग घेतील. व्यवसायातील आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरूणांच्या चैनी वृत्तीत वाढ होत असल्याचे जाणवेल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai