Read in
शुक्रवार 02 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 02 एप्रिल चंद्ररास वृश्र्चिक 27:43 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 27:43 पर्यंत व नंतर मूळ.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–पोलीस खात्यातील व्यक्तीना, अधिकार्यांना तपास यंत्रणेतील महत्वाच्या घटनेचा सुगावा लागेल. गुप्त गोष्टी उकरून काढल्या जातील. महिलांकडून बोलण्याच्या ओघात व्यक्तिगत गोष्टींबाबत चर्चा होईल.
वृषभ :– पुरूषांना प्रकृतीविषयी चिंता निर्माण करणार्या घटना घडतील. वयस्कर मंडळींचे पायाचे दुखणे वाढेल. कुटुंबात चुकीचे झालेल्या कामाचे खापर तुमच्यावर फुटेल. कोणत्याही कामातील घाई कामाचे नुकसान करेलच शिवाय मानहानी ही होईल.
मिथुन :–वडीलधार्या माणसांकडून तुम्हाला अतिशय महत्वाच्या कामात ओळख मिळेल व काम सोपे होईल. तरूणांना नाकातील हाड वाढल्याचा त्रास होईल. पुरूष मंडळीनी अचानक कोणत्याच कामात दुर्लक्ष करू नये. प्रवासात जात असाल तर गाडीचे चेकअप करून घ्या अन्यथा प्रवास खंडीत होईल.
कर्क :– मानसशास्त्राच्या अभ्यासकांना आज अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणाला सामोरे जावे लागेल. कर्तव्याचे पालन करताना होणार्या कष्टांची पर्वा वाटणार नाही. कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीला पडण्या धडपडण्यापासून जपावे लागेल.
सिंह :–पतीच्या हौसेसाठी पत्नीकडून मोठी खरेदी होईल. तरूण महिलांचे पाय व पोट दुखण्याचा त्रास होईल. काल पासूनची ठरलेली गोष्ट बोलायला आजपण वेळ मिळणार नाही. टेक्निकलच्या तरूणांना नवीन काम शिकण्यास चांगला वाव मिळणार आहे.
कन्या :–बर्याच दिवसानंतर जूने मित्रमंडळींबरोबर भेट झाल्याने मन उचंबळून येईल व मनाला हलके वाटेल. व्यवसायासाठी आँन लाईन चा नवीन आँप्शनवर विचार करून निर्णयाप्रत याल. महिलांच्या मनामधील उत्साह व आनंद त्याना लपवता येणार नाही.
तूळ :–तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी पुन्हा एकदा चर्चा करा. विद्यार्थ्यांना आपण निच्छित केलेले ध्येय गाठता येणार आहे याची खात्री पटेल. आज तुम्हाला जास्तीत जास्त सहनशील बनावे लागेल. कामाच्या घाई मध्ये दिलेला शब्द विसरून जाल.
वृश्र्चिक :–अपरिचीत कींवा अनोळखी व्यक्ती तुमच्याबरोबर जास्त जवळीक करण्याचा धोका आहे. गेल्या सप्ताहातील घडामोडींनी तुमच्या मनावर झालेला परिणाम तुम्हाला दूर करता येणार आहे. सकारात्मक विचारांची फार गरज निर्माण होईल. आवडत्या व्यक्तींबरोबर रहा.
धनु :–आपल्या स्वभावाचे परिक्षण आपणच चांगले करू शकतो हे लक्षात घ्या. व्यायामाचे महत्व समजूनही न केल्यामुळे पश्चात्ताप होईल. सरकारी कामाना अतिमहत्व दिल्याने निर्णयात दोलायमान व्हाल. औषध घेताना नीट नांव वाचून घ्या.
मकर :–पतीपत्नी दोघांनीही एकमेकांच्या मतांचा आदर केल्यास दोघांमधील वाद संपुष्टात येईल. आज व पुढील दोन दिवस कोणालाही जामिन राहू नका. उच्चपदावर असलेल्या मित्रांचा सहवास मिळेल व अनेक गोष्टींचा उलगडा होईल.
कुंभ :–मनावरील ताण कमी करण्यासाठी मेडीटेशनची, प्राणायामाची गरज आहे हे समझून घ्यावे लागेल. सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल व करणार्याला मदत केल्याबद्धल अडचणीत याल तरी सावध रहावे.
मीन :–राजकीय क्षेत्रातील विरोधकांवर मात करण्यात यशस्वी व्हाल. सरकारी मंजुरीच्या कामात अडकलेली कामे आज तुमच्या प्रत्यक्ष भेटीमुळे मार्गी लागतील. कोणालाही आज उधार उसनवार देऊ नका. आर्थिक गुंतवणूकही करू नका.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai