daily horoscope

गुरूवार 01 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार  01  एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 31.मार्च आज चंद्ररास.  तूळ  25:55  पर्यंत व नंतर वृश्चिक.

गुरूवार 01 एप्रिल चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र विशाखा  07:21 पर्यंत व नंतर अनुराधा. वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–पुरूषाना सासुरवाडीकडील मंडळींच्या प्रकृतीची विचारपूस करावी लागेल. तसेच तुमच्या मदतीची ही गरज निर्माण होईल. पोलीसांना लाचलुचपतच्या केसमधील मोठी जबाबदारी  दिली जाणार आहे. खाजगी क्षेत्रातील हिशोबनीसांना आर्थिक घोटाळ्याचा अंदाज येईल.

 

वृषभ :–डाँक्टर्स व सर्जन मंडळीना फार मोठ्या दिव्यातून जावे लागेल. तरूणांना प्रत्यक्ष घटनेपेक्षा मनातील  भिती जास्त घाबरवून सोडेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास मनस्ताप होणार नाही. राजकीय व्यक्तीनी गुप्त कारवाया विषयी जागरूक रहावे लागेल.

 

मिथुन :–कर्ज वसूली विभागाला  कामाचा  मोठा  बोजा  वाढेल. उत्पादन क्षेत्रातील कामावर अचानक  जाचक नियम व अटींचा त्रास होईल. पाळीव प्राण्यांना उन्हाचा त्रास झाल्याने दवाखान्यात न्यावे लागेल. वयस्कर मंडळीना घरी बसूनही डोकेदुखीचा त्रास होईल.

 

कर्क :–रात्री पडत असलेल्या स्वप्नांचा अर्थ लावत बसू नका. त्यातील कांही सूचकतेचा फक्त विचार करा किंवा तज्ञांकडून समजून घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जाईल व त्यातील जबाबदारी तुमच्यावर असेल.

 

सिंह :–शिक्षकांनी सध्यातरी नवीन नोकरीचा विचार करू नये. अपेक्षित बाबींची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला आँफीस च्या वतीने कोर्टात जावे लागेल. तरूणांना प्रत्यक्ष चर्चेतील सहभागावर त्यांचे व्यक्तिगत  रेटींग कळेल. आजी आजोबा यांच्याकडून मोलाचा सल्ला मिळेल.

 

कन्या :–हस्ताक्षर तंत्र व कँलिग्रँफीच्या तज्ञांना  मार्गदर्शनाकरीता मोठी मागणी येईल. तसेच कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन आवडते विषय शिकण्यासाठी नाव नोंदणी करता येईल.  लहान भावंडाच्या शिक्षणाचा श्रीगणेशा कराल.

 

तूळ :–कुटुंबात ठरलेल्या विवाहाबाबत कांही तक्रारी निर्माण होऊन मानसिक त्रास होईल. ऐकलेल्या घटनेवर कोणीही निर्णयापर्यंत येऊ नका. वयस्करांना बँकेच्या कामात मुलांची मदत घ्यावी लागेल. व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीबाबत फेरविचार करावा.

 

वृश्र्चिक :–आजचा दिवस पूर्णपणे तुम्ही तुमच्या आवडीना प्राधान्य देऊन आनंदात घालवाल. नियोजित कार्यक्रमाची जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे फार पाडाल. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून सावध राहून आज सर्वांबरोबर गोड बोलण्याचा मंत्र करावा.

 

धनु :–आर्थिक हानी झालेल्या क्षेत्रात नव्याने पदार्पण करण्याचे नियोजन उपयोगी पडेल. तरूणांनी केलेली मेहनत कामी आल्याचे जाणवेल. नोकरीत कामाचा तुमचा उरका पाहून वरीष्ठ खूष होतील व  सहकारी पण तुमचे कौतुक करतील.

 

मकर :–नामांकित  लेखकांच्या पुस्तकाच्या प्रकाशाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. लेखक व कवी यांना उस्फूर्त दाद मिळेल. घरगुती उद्योग व महिलांचे कला उद्योग यातून चांगली आर्थिक प्राप्ती होणार असल्याचे संकेत मिळतील.

 

कुंभ :–नव्याने सुरू केलेल्या उद्योगात नवीन गुंतवणूक करण्यास अजिबात हरकत नाही. तुम्ही दाखवत असलेले धाडस अतुलनीय व कौतुकास्पद राहील. राजकीयदृष्टय़ा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी मात्र कोणतेही धाडस करू नका.

 

मीन :– गर्भवती महिलांनी ओव्हरकाँन्फीडन्समधे कांहीही करू नये. कुटुंबात सर्वानीच सहविचाराने घेतलेल्या निर्णयाचा पुन: विचार करा.  वारसा हक्काच्या जमिनीबाबत व शेताबाबतची चर्चा सध्या फलद्रूप होणार नाही. कोणतेही खरेदी विक्रीचे विचार आज करू नका.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “गुरूवार 01 एप्रिल 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *