Read in
बुधवार 31 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 31.मार्च आज चंद्ररास. तूळ 25:55 पर्यंत व नंतर वृश्चिक.
चंद्र नक्षत्र स्वाती 09:45 पर्यंत व नंतर विशाखा. आज संकष्ट चतुर्थी आहे. मुंबई चंद्रोदय 21:41. वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– प्रकृतीबाबतचा वरवर न दिसणारा कांही त्रास जाणवू लागेल. लायसन्स बाबतचे जे काम अडले होते त्या कामातील अडचण दूर होईल तरी आता त्याच्या मागे लागायला हरकत नाही. घरगुती वस्तूंच्या व्यवसायातील महिलांना ओळखीने नवीन क्लायंटस् मिळतील.
वृषभ :–महिलानी वेळ काढून घरातील साठवणीच्या धान्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. किराणा दुकानदारांनी लक्ष न दिल्यास नुकसान सोसावे लागेल. कारखान्यातील मशीनवर काम करणार्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा बद्धल विशेष बक्षिस मिळेल.
मिथुन :–ज्योतिषशास्त्राच्या, मंत्रविद्येच्या अभ्यासकांना नवीन जागृत अनुभव येईल. विद्यार्थी, मैदानावरील खेळाडू यांना स्पर्धेमधे जिंकण्याचे क्षण अनुभवता येथील व आनंदाने हुरळून जातील. नोकरीतील कायदेशीर बाबींवर आज तुम्हाला वरीष्ठांबरोबर चर्चा करावी लागणार आहे तरी आधीच त्यात लक्ष घालून माहिती घेऊन ठेवा.
कर्क :–समोरच्याच्या मनात काय चालले आहे याचा जबरदस्त अंदाज तुम्हाला आल्याने व्यवहार सोपा जाईल. नाटक, टी. वी. सिरीयल्समधे काम करणार्यांना अचानक मोठे काम मिळणार असल्याची कुणकुण लागेल.
सिंह :–ज्यांची न्यायालयात नोकरी आहे त्यांनी आज आपल्या कामात अतिशय पारदर्शकता ठेवावी. नवीन घराबाबतचे कोणतेही व्यवहार कँशच्या रूपात करू नका. भाड्याने घर घेण्याच्या विचारात असाल तर ओळखीतून मनासारख्या ठिकाणी घर मिळेल.
कन्या :–दूरगावी, परदेशी असलेल्या आईवडीलांची काळजी वाटणार्या घटना घडतील. अपत्यप्राप्तीच्या ईच्छूकांनी या सप्ताहात डाँक्टरांची अपाँईंटमेंट फिक्स करावी. वयस्कर मंडळीना झोप न लागल्याने पित्ताचा व ब्लडप्रेशरचा त्रास होईल.
तूळ :– फार्मासिटीकल क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल.ईलेक्ट्रीकल इंजिनीअर्सना आपल्या सध्याच्या नोकरीपेक्षा चांगल्या नोकरीची माहिती मिळेल तरी प्रयत्न करायला हरकत नाही. घरगुती पदार्थांच्या उद्योगात चांगले सहकार्य करणारे क्लायंटस् मिळतील.
वृश्र्चिक :– ज्यांच्या व्यवसायात मंदीचा काळ आहे त्यांनी घाईघाईने इतरांच्या सांगण्यावरून व्यवसाय बदलण्याचा विचार करू नये. आहे त्याच उद्योगातून नवीन वाटा शोधाव्या. प्रौढ उद्योजकांनी हाताशी आलेल्या मुलांची मदत घेण्यास हरकत नाही.
धनु :– आज सकाळपासूनच तुम्हाला मदत करणार्या मित्रमैत्रिणींचे, नोकरीतील सहकार्याचे फोन येथील. मुलांकडून हरवलेल्या वस्तू बाबत त्यांच्याकडे बारकाईने चौकशी करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका.
मकर :– डोळ्याच्या त्रासासाठी आता फार वेळ न काढता डाँक्टरांना दाखवून घ्या. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे जाणवेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपण नक्की कोणत्या क्षेत्रात नोकरी करू शकतो याचा आढावा घ्यावा.
कुंभ:– शाळकरी मुलामुलींना आपले छंद जोपासण्याची व वाढवण्याची संधी मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना शाळेकडून विशेष बक्षिस मिळेल कौतुकही होईल. सरकारी कामातून मिळणार्या संधीबाबतची माहिती घ्या इतरांना देण्याने त्यांची पण सोय होईल.
मीन :– कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा व अपेक्षांना प्राधान्यक्रमाने महत्व द्यावे लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपले अधिकार वापरताना दहा वेळा विचार करावा लागेल. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञांच्या सल्ल्याने करा.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai