Read in
मंगळवार 30 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 30 मार्च चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 12:21 पर्यंत व नंतर स्वाती. आज संत तुकाराम बीज आहे.
वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– श्री गुरुकृपेने आज सर्वच कामे सुरळीत पार पडणार आहेत. कामात हल्ली ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणींचे आता निराकरण करता येणार आहे. घरातील कामात आज पुरूषांना हातभार लावावा लागेल. लहान मुलांच्या बाबतीत एकदम जागरूक रहा. उन्हाचा ताप येण्याची शक्यता आहे.
वृषभ :–नोकरीतील कामातील दिरंगाई बद्धल वरिष्ठांकडून विचारले जाणार आहे. वडील बहिणीच्या वैवाहिक जीवनातील अडचणींवर तुंम्हाला मार्ग काढावा लागेल. व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना व्यवसायाच्या नवीन दिशा सापडतील.
मिथुन :– वकिल मंडळींना आपल्या कामाबाबत ठाम विश्र्वास निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम निवडताना ज्येष्ठ तज्ञांची मदत घ्यावी. वडिलांच्या किडनीबाबतच्या प्रश्र्नावर तज्ञ डाँक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्या.
कर्क :–महिलांना आज घरातील कामाचे लोड जास्त होईल व दमून जातील. गाडीतून प्रवास करताना मोबाईल सांभाळावा लागेल पडण्या हरवण्याची भिती आहे. पौगंडावस्थेतील मुलांनी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी आई वडीलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सिंह :–हातातील कामावरून कामाच्या आवाक्याचा अंदाज येईल. भाऊबंदातील दूरच्या नात्यातील दु:खद घटनेने कुटुंबात अस्वास्थ्य राहील. आईवडीलांना मानसिक ताणतणाव वाढेल. शेतीच्या व घराच्या कामाबाबत प्रश्र्न चिन्ह उमटेल.?
कन्या :–घरातील वायरींग एकदा तपासून घ्यावे लागेल. वीजेवर चालणार्या उपकरणांपासून शाँक लागण्याची शक्यता आहे. लहान मुलांना सांभाळा. न्यायालयीन कामकाजाबाबत चा चालढकलपणा त्रासदायक ठरेल.
तूळ :–कोणत्याही घटनेची पूर्ण चौकशी केल्याशिवाय तुम्ही सहभाग घेऊ नका. विवाहेच्छू मुलींना आपल्या अपेक्षांना आवर घालावा लागेल. प्रेमसंबंधातील गैरसमजूती मुळे नात्यात बिघाड निर्माण होईल. तरी समंजसपणा दाखवावा लागेल.
वृश्र्चिक :–राजकीय मंडळीनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संधी मिळेल असे वागू नये. अन्यथा विरोधक तुमच्या नावाचा बोलबाला करतील. व्यसन व प्रलोभनापासून कसे दूर राहता येईल याकडे लक्ष द्या. अहंकारामुळे मित्र तुमच्यापासून दुर् जातील.
धनु :–मित्रावर आलेल्या संकटासाठी अचानक प्रवास करावा लागेल. वैवाहिक जीवनातील आलेल्या अडचणींवर मार्ग काढावा लागेल. व्यावसायिक क्षेत्रात विनाकारण चिंता वाटणार्या गोष्टी घडतील तरी वस्तुस्थितीचा आढावा घेऊन मगच निर्णय घ्या.
मकर :–कोणत्याही परिस्थितीत तुमचा रागावरील संयम सुटणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना जरी बरे वाटू लागले तरी अजूनही तितकीच गंभीर बाब आहे याची दखल घ्या. खुल्या मनाने इतरांची मदत घ्यावी लागेल.
कुंभ :–विद्यार्थी अभ्यासाच्या विषयांबरोबरच इतर विषयातील आवडही जोपासण्याचे ठरवतील. पालकांनी मुलांना मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य द्यावे. वयस्कर व तज्ञ मंडळीनी आपली मते सरळ व सोप्या शब्दात मांडावीत. लेखकांनी क्लीष्ट विषय सोपा करून सांगण्याकडे कल ठेवावा.
मीन :–एकत्र कुटुंबातील एकोपा संकटावर मात करून दाखवेल.गावी चाललेल्या शाळेच्या बांधकामाची जबाबदारी विश्र्वासाने दुसर्यांवर सोपवण्यास हरकत नाही. नोकरीतील तुमच्या जबाबदारीतील प्रोजेक्ट अतिशय प्रामाणिकपणे व वेळेवर पूर्ण केल्याचे अवार्ड मिळेल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai