daily horoscope

सोमवार 29 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

ोमवार 29  मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 29  मार्च आज चंद्ररास कन्या 25:42  पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 15:02  पर्यंत व नंतर चित्रा.

काल झालेल्या  हुताशनी  पौर्णिमेचा आज करिदिन आहे व धुलिवंदन आहे. आजचा संपूर्ण दिवस शुभ असल्याने महत्वाची कामे करण्यास हरकत नाही.

वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–लहान मुलांच्या पचनसंस्थेच्या तक्रारी निर्माण होतील. महिलांना  अचानक पोटदुखीचा त्रास जाणवेल. गर्भवती स्त्रीयांनी आज कोणत्याही प्रकारची धावपळ करू नये व प्रकृतीला अपायकारक पदार्थ खाऊ नयेत. धर्माच्या नावावर चर्चा करणार्यांना त्यांच्या दांभिकपणाबद्धल  शाब्दिक चपराक माराल.

 

वृषभ :–धुलिवंदन साजरी करण्याच्या नावाखाली खाण्यापिण्याचा अतिरेक कराल. पतीपत्नीच्या विचारात एकवाक्यतेने मोठ्या कामाची आखणी होईल. क्रिडा क्षेत्रातील मुलांमुलींना नवीन  क्षेत्रातील संधी उपलब्ध होतील. पोलीस ट्रेनिंगच्या विद्यार्थ्यांना आपले अवघट टार्गेट्स पूर्ण करण्याकरीता मेहनत वाढवावी लागेल.

 

मिथुन:–महिलांना सासरेबुवांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून  स्वत:हून काळजी घ्यावी. पूर्वीच्या गुंतवणूक च्या अनुभवावर भाळून आज नव्याने गुंतवणूक करू नका. नोकरीतील वाद विकोपाला जाऊन  नोकरी सोडावी असे वाटेल कींवा काढून टाकण्याची धोका आहे.

 

कर्क :– आज महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यामुळे  एक काम हातावेगळे कराल. घरामध्ये नव्याने आणलेल्या वस्तूमधे बिघाड सापडेल . लहान मुलांना कान दुखीचा  त्रास जाणवेल. तुंम्हाला अपेक्षित असलेली वस्तू अचानक वडीलांकडून भेट म्हणून मिळेल.

 

सिंह :–आज तुम्हाला अचानक गरम चहा काँफीमुळे जीभेला चटका बसणार आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी पायर्‍या  उतरताना काळजी घ्यावी. तुमच्या बोलण्याच्या धाटणीमुळे आज वातावरण गरम होणार आहे तरी बोलण्यात मार्दवता ठेवा.

 

कन्या :–आज हौसेमौजेसाठी स्वत:चा वेळ द्याल. गायक व वादकांना इतरांचे मनोरंजन करण्याची संधी मिळणार आहे. लेखकांना सामाजिक विषयावर चर्चा करताना विचारात पारदर्शकता ठेवावी लागेल. कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील.

 

तूळ :–आज मानसिक त्रास होणार्‍या घटना घडतील. खर्चाची कामे अचानक निघाल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडेल. व्यवसायातील  आर्थिक बाजू मात्र उंचावल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना त्यावरील  माहिती वाचल्याशिवाय करू नका.

 

वृश्र्चिक :–विवाहेच्छूंनी वैवाहिक जाडीदार निवडताना आपल्या जाचक अटी काढल्यास अपेक्षित जोडीदार निवडणे सोपे जाईल. उत्पादन क्षेत्रात  काम करणार्‍यांनी  अंदाजाने आपल्या कामाची आखणी करू नये. सख्या नात्यातील वाद संपवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून होईल.

 

धनु :–सत्कर्मावरील विश्र्वास दृढ करणार्‍या घटना आजूबाजूला घडतील. संत सज्जनांची भेट होईल. समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल.व्यवसायाबाबतच्या नव्या वाटांचा चहुबाजूनी प्रथम अभ्यास करा व नंतरच विचार करा.

 

मकर :–वडिलांच्या सल्ल्याने रेंगाळलेल्या कामावर योग्य  मार्ग सापडेल. मित्रासाठी पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रसंग येईल. शासकीय कामातील गुंता वाढतच जाईल. तुमच्या मनातील योजना साकार करताना अनेक अडचणींवर मात करून यशस्वी कराल.

 

कुंभ :– गावाकडील वाईट बातमीने कुटुंबातील लोक दु:खी होती. प्रसंगी गावीही  जावे लागेल. मनातील अनुत्तरीत विचारांना चालना देण्याचा प्रयत्न करा. वयस्कर मंडळीनी तरूणां बरोबर सकारात्मक विचाराने चर्चा केल्यास तरूणांच्या विचारांना योग्य दिशा मिळेल.

 

मीन :–व्यवसायातील भाग भांडवलाची माहिती नीटपणे समजून घ्या. काचेच्या वस्तूंच्या व्यवसायातील होत असलेला तोटा भरून काढण्याचे मार्ग सापडतील. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटेल असे वागणे ठेवाल तरच  विश्र्वास वाढेल.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “सोमवार 29 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *