Read in
रविवार 28 मार्च ते शनिवार 03 एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
28 मार्च रविवार चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 17:35 पर्यंत व नंतर हस्त. 29 मार्च सोमवार चंद्ररास कन्या 25:42 पर्यंत नंतर तूळ.
चंद्रनक्षत्र हस्त 15:02 पर्यंत व नंतर चित्रा. 30 मार्च मंगळवार चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 12:21 पर्यंत.व नंतर स्वाती. 31 मार्च बुधवारचंद्ररास तूळ 25:55 पर्यंत व नंतर वृश्र्चिक . चंद्रनक्षत्र 09:45 पर्यंत व नंतर विशाखा. 01 एप्रिल गुरूवार चंद्रनक्षत्र वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र विशाखा 07:21 पर्यंत व नंतर अनुराधा. 02 एप्रिल शुक्रवार चंद्ररास वृश्र्चिक 27:43 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 27:43 पर्यंत व नंतर मूळ. 03 एप्रिल शनिवार चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 26:38 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
28 मार्च होळी पौर्णिमा . दुपारी 01:55 नंतर शुभ दिवस.
29 मार्च धूलीवंदन व होळीपौर्णिमेचा करिदीन.
30 मार्च तुकाराम बीज.
31 मार्च संकष्ट चतुर्थी. मुंबई चंद्रोदय 21:48.
02 एप्रिल रंगपंचमी, एकनाथ षष्ठी, गुड फ्रायडे.
वरील प्रमाणे प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–हा सप्ताह तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देणारा ठरेल. व्यवसायातील पूर्वीपासूनच्या प्रतिस्पर्ध्यांना आता मनस्ताप होणार आहे. तुम्ही आता तुमचे कामाचे स्पीड फक्त मेन्टेन करायचे आहे. यश तुमच्याच बाजुने आहे. तुम्हाला आता माघे वळून पहावे लागणार नाही आहे. न्यायालयातील कामाकडे मात्र या सप्ताहात अजिबात लक्ष देऊ नका. कामाची घाई पण करू नका. व्यवसायातील कर्ज तसेच घरासाठी काढलेल्या कर्जातून मान कशी काढायची याचे नियोजन करा उत्तम मार्ग सापडेल. नोकरीच्या प्रयत्नात असलेल्यांना नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. आपल्या क्षमता नाँलेज व प्राविण्य ओळखून जाँबची निवड करावी.
वृषभ :–ज्येतिष विद्या, मंत्रविद्या शिकणार्यानी वागण्यातील पवित्रपणा जपण्याचा प्रयत्न करावा. नियमावर काटेकोरपणे पाळणे महत्वाचे आहे याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा विचार करावा. इतरांच्या नादी लागू नये. सिनेमा नाटक यामधील कलाकारांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. आईच्या माहेरकडील वारसा हक्का बाबतची चर्चा सुरू होईल पण तुम्ही त्यामधे भाग घेऊ नका. विवाहेच्छू मुलांना त्यांच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलींची स्थळे येथील. आपण कशाला जास्त प्राधान्य द्यायचे याचा सारासार विचार करा. कर्ज फेडण्यासाठी स्त्रीधनाचा वापर करू नका.
मिथुन :–व्यवसायातील अडचणीत टाकणारा प्रश्र्न भागिदारांबरोबर योग्य दिशेने चर्चा केल्यास सोडवता येईल याचा विचार करा. नवीन शैक्षणिक वर्षातील नव्या प्रवेशाबाबत घाईघाईने निर्णयाला येऊ नका. कोरोनाच्या नाजूक कालावधीत वयस्कर मंडळीना जपावे लागेल. तरी त्याच्या लहान सहान तक्रारींकडे लक्ष द्या. प्रेमाच्या व्यवहारातील अती पझेसिवनेसमुळे नाते बिघडण्याचा संभव आहे.कोणतीही गोष्ट अती ताणली तर तुटते हे लक्षात ठेवूनच नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. मामाकडील बँकेच्या जमिनीच्या व्यवहारात लक्ष घालून मामाला मदत करावी लागेल.
कर्क :– पोस्ट व टेलिफोन खात्यात काम करणार्यांना आपल्या सहकार्यांकडून मोलाची मदत मिळेल. पोस्टाच्या स्कीममधे गुंतवलेले पैसे फायदेशीर ठरल्याने पुन गुंतवण्याचा इच्छा होईल. महिलांना आपल्या आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुलगा नसलेल्या मातापित्यांची सेवा मुलींना प्राधान्याने करावी लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी आजारी असलेल्यांचे टेबल सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल तरी ती हसतमुखाने स्विकारा. पौगंडावस्थेतील मुलामुलींना योग्य वळण लागण्यासाठी बारीक लक्ष घालावे लागेल. महिलांना अचानक घराची सजावट करण्याची इच्छा निर्माण होईल.
सिंह :–ज्यांचे घरगुती उद्योग आहेत त्यांनी आपल्या उद्याोग करण्याच्या पद्धतीतील त्रुटींवर विचार करावा. व आवश्यक ती दुरूस्ती करावी. शिक्षक, प्राध्यापक, शिकवणी वर्गातील शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला चांगले फळ मिळाल्याचे जाणवेल. दुकानदारांना बँकेतील कर्जाबाबत मोठा तगादा सुरू होईल. बँकेमधे प्रत्यक्ष जाऊन बोलणे केल्यास तुम्हाला अपेक्षित सवलत मिळेल. सरकारी योजनांतून सुरू असलेल्या योजनांतून किती प्रमाणात लाभ होत आहे याचा आढावा घ्यावा. डाँक्टर मंडळीना पेशंटसाठी समुपदेशनाचे कामही करावे लागेल असे जाणवेल.
कन्या :–आळशी स्वभावाच्या मुलामुलींना आलेल्या अडचणी त्यांच्या स्वभावामुळेच आल्या आहेत हे आोळखता येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर असलेल्या जबाबदार्या वेळेत पार पाडायचा आटोकाट प्रयत्न केल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन कामाच्या आँर्डर्स विषयी कोणाला अधिकार देण्याबाबत वाद निर्माण होईल पण तुम्ही तुमचे घोडे पुढे दामटवु नका. कोणत्याही ठिकाणी आपले मत व्यक्त करताना दहा वेळा विचार करा व मगच व्यक्त व्हा. आईवडीलांच्या इच्छेखातर अपत्य प्राप्तीच्या विषयात दत्तक पुत्राचा विचार कराल.
तूळ :– सौंदर्यप्रसाधनाच्या व्यवसायात या सप्ताहात तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. कोणताही माल घेताना माल ओरिजनल असल्याची खात्री करून घ्या. महिलांना स्कीन अँलर्जीचा त्रास संभवतो तरी चेहर्यावर कोणताही प्रयोग करू नका. कर्जासाठी बँकेकडे अर्ज केला असल्यास तुम्हाला सहजपणे कर्ज मंजूर होण्याचे संकेत मिळतील. स्टेशनरी दुकानदारांनी अती लोभापायी माल भरू नये. वयस्कर मंडळीना हातापायाला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढेल. लहान मुलांच्या डाँक्टर्सना मुलांच्या क्रिटीक कंडीशनला हाताळावे लागेल. बिल्डरने नवीन दस्तऐवज करणे अडचणीचे ठरणार आहे.
वृश्र्चिक :–कुटुंबातून वेगळे होण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना फार मोठी कींमत चुकवावी लागेल. वयस्कर मंडळीनी स्वप्नावर विश्र्वास ठेवून कोणतेच व्यवहार करू नयेत. ज्येष्ठांनी तरूणांवर आपले मत लादण्याचा प्रयत्न करू नये. आई वडीलांनी ही वस्तुस्थितीतील धोक्यांची कल्पना द्यावी पण विरोध करू नये.घरगुती खानावळ कींवा म़ेस चालवणार्यांनी आपल्या ठिकाणच्या , स्वयंपाकघराच्या स्वच्छतेचा महत्व द्यावे. लहान मुलांना उलट्या जुलाबांचा त्रास संभवतो. तसेच फुड पाँयझन चाही धोका आहे.
धनु :–ज्याचा उद्योग दिवाळखोरीच्या दिशेने चालला आहे त्यांनी तज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच जागे व्हावे. अचानक व्यवसायात बदल करण्याचा विचार करू नका. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हे लक्षात ठेवून कामावर प्रेम करा व कामाला योग्य न्याय द्या. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने न्यायालयातील खटल्याबाबतचा निर्णय घ्या. प्रसंगी लागला तर कमीपणा स्विकारण्याची तयारी ठेवा. राजकीय मंडळीना परिस्थितीवर मात करताना स्वत:ची पात्रता टिकवता येणार नाही. मान हलवताना चक्कर आल्यासारखे वाटणार्यानी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
मकर :–कामातील क्लिष्टता कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. त्यामुळे काम रिजेक्ट होणार नाही. या सप्ताहात कोणतेही आँपरेशन किंवा दात काढण्याचे काम ठरवू नका. घरातील वयस्कर मंडळींच्या बरोबर बँकेत जावे लागेल. महिलांनी आपल्या मनातील गोष्टी अती विश्वासाने कोणालाही सांगू नयेत. ज्येष्ठांनी तरूणांवर आपले मत लादण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांच्या पुण्याईने परिक्षेत चांगले यश मिळेल व उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा मार्ग सोपा होईल.
कुंभ :–तरूणांना सासुरवाडीकडून व्यवसायासाठी मोठया रक्कमेची सोय होईल. व्यावसायिकांनी स्त्रीधनाचा वापर भांडवलासाठी करू नये. सरकारी खात्यातील नोकरदारांना तसेच अधिकार्यांना अचानक मानहानीला सामोरे जावे लागेल. महिलांना गर्भाशयाच्या विकाराचा त्रास होईल दुर्लक्ष करू नये. अध्यात्मिक प्रगतीच्या प्रयत्नात असलेल्याना त्यांच्या पूर्वपुण्याईनेच गुरूतुल्य व्यक्तीची भेट होईल व त्यांच्या विचाराने भारावून जाल. वडीलांच्या बाबतीत तुमच्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण कराल.
मीन :- द्वितीय संततीच्या प्रतिक्षेतील महिलांना आपली इच्छा पूर्ण होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी व तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी परगावी जावे लागेल. व्यवसायातील त्रुटीवर मार्ग सापडणार आहे. मुलामुलींच्या शाळेतील प्रवेशाबाबत पूर्ण विचाराने निर्णय घ्यावा लागेल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नये. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीने जागेचा व्यवहार पूर्ण होईल.
||शुभं-भवतु ||