Read in
शनिवार 27 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 27 मार्च आज चंद्ररास सिंह 25:19 पर्यंत व नंतर कन्या.
चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 19:51 व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरीलप्रमाणे राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कँटरींगचे शिक्षण घेतलेल्यांनी स्वत:चे उद्धोग सुरू करायला हरकत नाही. घरगुती ुद्धोग करणार्यांनी आपल्या संवत:च्या एखाद्या पदार्थाला विशिष्ट ओळख द्यावी. लहान लहान आँर्डर्स घ्याव्यात.
वृषभ :–आजच्या आजारपणाविषयी नुसती काळजी करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. तपासण्या करून आणा. वाहन खरेदी करणार्यांनी पूर्ण माहिती न घेता उगीच इतरांच्या सांगण्यावरून घाई करू नये.
मिथुन :–नोकरीच्या निमित्ताने लहानशा प्रवास करावा लागेल. आई व मावशीसाठी दवाखान्यात जावे लागेल. कोविड बाबतची विशेष काळजी घ्यावी लागेल. कफप्रवृत्तीत वाढ होईल तरी दुर्लक्ष करू नये.
कर्क :–कुटुंबातील वाद विकोपाला जाण्याची दाठ शक्यता आहे तरी तुम्ही स्वत: पुढाकार घेउन मतभेद मिटविण्याचे प्रयत्न करा. वयस्कर मंडळींनी फ्रिजमधील गार पदार्थ खाऊ नयेत सर्दी खोकल्याची संभवना आहे.
सिंह :–स्वभावातील उग्रपणा, रागिटपणा उफाळून येईल. वरच्या हुद्द्यावर असलेल्यांनी अधिकाराचा वापर करताना विचार करावा. बाजू तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
कन्या :–घरापासून रागवून गेलेल्यांना घरी परत येण्याची इच्छा निर्माण होईल. राजकीय क्षेत्रातील फ्रंट लाईनवर काम करणार्यांनी अंदाजाने आपल्या कामाची आखणी करू नये. कुटुंबात सर्वानीच सहविचाराने निर्णय घ्यावा.
तूळ :–पतीपत्नीमधील नात्यातील दुरावा दूर करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरेल. राजकीय चर्चेत सहभागी होऊ नका. मामाकडील नात्याची काळजी वाढवणार्या घटना घडतील. स्वतः वाहन चालवून प्रवास करू नये.
वृश्र्चिक :–दत्तक पुत्राच्या कर्तृत्वाने खूष व्हाल. आई व मुलग्यामधील प्रेमाला भरते येईल. महिलां सासुसासर्यांबरोबर प्रवासाचे बेत आखणार आहेत. वडीलांची काळजी सतावणार आहे.
धनु :–सेवाभावी वृत्तीने वागणाऱ्या क्षेत्रातील कर्मचार्यांचे समाजाकडून कौतुक होईल. तरूणांकडून अवघड कामास प्राधान्य दिले जाईल. पोलीस खात्यातील वरीष्ठांनी अँक्शन रिअँक्शन करू नये.
मकर :–लाचलुचपत, व भ्रष्टाचार विरोधी खात्यातील कर्मचार्यांना, अधिकारी वर्गाला मोठ्या मिशनमधे सहभागी व्हावे लागेल. डाँक्टर व इंजिनीअर्स मंडळीना आँपरेशन सिस्टीम सांभाळावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.
कुंभ :–प्रेमाच्या व्यवहारात जोडीदाराच्या स्वभावाचे उगाच भांडवल करू नका. जुळवून घेण्याचे विचार ठेवल्यास संघर्ष कमी होईल. महिलांना आवडत्या वस्तूसाठी मोठी कींमत मोजावी लागेल. लहान मुलांना उन्हाळ्याचा त्रास होईल.
मीन :–गुरांचे गोठ्यांची योग्य स्वच्छता न केल्याने जनावरांना अनारोग्याचा त्रास होईल. विद्यार्थ्यांना आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे लागेल. गावी राहणार्या, तुमच्यापासून लांब राहणार्या आईवडीलांसाठी अचानक प्रकृतीसाठी धावपळ करावी लागेल.
| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai