Read in
शुकवार 26 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 26 मार्च आज चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 21:39 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
आजचा दिवस अशुभ असल्याने आज कोणतीही महत्वाची कामे करू नयेत. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कोर्टाच्या कामासाठी जर कोणाला भेटण्याचे ठरले असेल तर जाऊ नका आज काम होणार नाही. नवीन कपडे खरेदीची ईच्छा अचानकपणे पूर्ण कराल. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून योजना आखाव्यात.
वृषभ :–मनामधील मोठमोठे विचार मनातच राहतील कृतीत आणणे अवघड जाईल. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणार्या घटना घडतील. व्यवसायात व घरगुती क्षेत्रात नोकरासंबंधीची चिंता दूर होईल.
मिथुन :–आईवडीलांच्या सहवासामुळे मन आनंदी होईल. कुटुंबात भावाबहिणीतील अचानक वाद निर्माण होण्याचे संकेत मिळतील. वयस्कर मंडळींना आवडत्या गोष्टी भेटीखातर मिळतील. लहानसहान गोष्टीत चिडचिड होईल.
कर्क :–स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचा जोर वाढवावा लागेल. तरूणांनी वाईट सवयींना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबात दाम्पत्य जीवनात आनंद व समाधान निर्माण होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
सिंह :–नोकरीतील तुमच्या अधिकारातील काम अतिशय चोखपणे बजावाल. न्यायालयातील कर्मचार्यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करावी. जनता संपर्क टाळावा अन्यथा अडचणी निर्माण होतील.
कन्या :–आज तुमच्या कामाच्या कार्यक्षेत्रातील इतरांच्या हस्तक्षेपामुळे तुम्हाला अडचणी निर्माण होतील. महिलांना सासरकडील ज्येष्ठ व्यक्तीकडून कौतुकाचे शब्द मिळतील. विचार न केल्यामुळे अनावश्यक खर्च करावा लागेल.
तूळ :–नोकरदारांना आज कामाची दगदग रोजच्यापेक्षा जास्त होणार आहे. व्यावहारिक पातळीवर बोलताना अविचाराने बोलू नका. नवीन घर घेण्याचा विचार पुन: पुन: नुसता चर्चेत राहील. निष्पन्न काहीच होणार नाही.
वृश्र्चिक :– इतरांच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबामधे आई व मुलग्यामधील मतभेद वाढतील. मोबाईल, इंटरनेटच्या अतीवापराने डोके व डोळे यांचे दुखणे सुरू होईल. अंगदुखणे व तापाचा ही त्रास संभवतो. तरी काळजी घ्यावी.
धनु :–जवळच्या नातेवाईकांचे तुमच्याकडे आगमन होईल. कुटुंबातील प्रौढ मुलीच्या विवाहाबाबतची बोलणी पुढे सरकतील. कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नये. अपरिचीत व्यक्तीवर तर अजिबात विश्र्वास ठेवू नका.
मकर :– मित्रांनी पूर्वी दिलेल्या आश्र्वासन नुसार मदत मिळेल व तुमची अडलेली कामे पुढे सरकतील. आईवडीलां बरोबरील दूरावलेले संबंध सुरळीत सुरू होतील. कुटुंबात एकत्र बसून सहविचाराने प्रश्र्न सोडवाल.
कुंभ :– व्यवसायाबाबत च्या मनातील कल्पनांना मूर्त विचारात आणू शकणार आहात. रोज रोज तीच चर्चा करून वेळ घालवू नका. तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल. नोकरीत तुमच्या वरील जबाबदारीत वाढ होईल.
मीन :–प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या बाबीला अती महत्व देऊ नका. तुमच्या सवयींना तुम्हाला कंट्रोल करावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात विनाकारण चिंता वाटणार्या गोष्टी घडतील. बँकेकडे मागितलेले कर्ज मंजूर झाल्याचे कळेल.
||शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai