Read in
गुरूवार 25 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 25.मार्च आज चंद्ररास कर्क 22:48 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 22:48 पर्यंत व नंतर मघा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आईचे म्हणणे तरूण मुलांना पटणार नाही व ते पटवूनही घेणार नाहीत तरी आईने फार तरूण मुलांच्या नादी लागू नये. उच्चशिक्षणाविषयी किंवा स्पेशलायझेशनच्या कोर्सविषयी कांही महत्वाची चर्चा करावयाची असल्यास आज अजिबात करू नये. कांहीही निष्पन्न होणार नाही.
वृषभ :–जागेबाबत चे नवीन करार मदार आज करू नयेत. परदेशी जाण्यासाठी नवीन विसा पासपोर्टची कामे आज अजिबात करू नका. आरोग्याबाबत च्या, लाँकडाऊन बाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नका. फसगत होईल.
मिथुन :– नोकरीच्या ज्या अपेक्षित पत्राची, मेलची वाट पहात आहात ते आज येणार नाही. कोणीतरी शब्द दिला आहे म्हणून हुरळून जाऊन चालू नोकरीबाबतची अनास्था वाटू देऊ नका. कोणत्याही क्षेत्रात आज गुंतवणूक करू नका.
कर्क :–आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आज गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्कचा वापर करा. नाजूक प्रकृतीच्या मंडळीनी विशेष काळजी घ्यावी. स्वभावातील अहंपणा मुळे आज सहकार्याबरोबर मतभेद होतील.
सिंह :–ज्यांची घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे त्यांच्या विचारात आज बदल होतील. घरगुती भांडणांवर, वादावर पडदा पडेल. बर्याच दिवसापासून ट्रेस लागत नसलेल्या व्यक्तींची माहिती कळेल.
कन्या :–वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे रुसून रागवून गेलेल्या पत्नीचे मन वळवण्यात यश येत असल्याचे जाणवेल. मध्यस्थी घेऊ नका. निवडणूकीच्या कोणत्याही विषयाच्या चर्चेत आज सहभाग घेऊ नका.
तूळ :–वडीलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रथम संततीच्या आजाराचे प्रमाण कमी कमी होत असल्याचे जाणवेल. दत्तक पुत्रांकडून अभिमान वाटावा अशी घटना घडेल. नोकरीत तुमच्या बदलीची चर्चा असल्यास ही अफवा आहे हे लक्षात घ्या.
वृश्र्चिक :–वृद्धाश्रमासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणार्यांना मानसिक त्रास होईल. अध्यात्मिक गुरू, धर्मगुरू यांच्याकडून तुमच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी फार मोठी मदत मिळेल. तरूण स्त्रीयांनी आज स्वत:ची विशेष काळजी घ्यावी.
धनु :–पूर्वी डाँक्टरांनी जे आँपरेशन करायला सांगितले होते ते दुखणे दुरूस्त होउ लागल्याचे डाँक्टरांकडून कळेल. सामाजिक क्षेत्रातील कींवा नोकरीतील कोणत्याही गुप्त कारवायात भाग घेऊ नका व त्याचा भागही होऊ नका.
मकर :–द्वितीय संततीबाबतचा विचार करत असाल तर तूर्तास थांबा. डाँक्टरांचा सल्ला आवश्यक राहील. शासकीय स्वच्छता अभियानात तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल. तरूणांनी कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नये.
कुंभ :–सहजगत्या केलेले कोणतेही धाडस संकटरूपाने समोर उभे राहील. नोकरीतील प्रमोशनच्या. मागे लागून काहीही घाई करू नका. आज पाळीव प्राण्यांपासून दूर रहा. त्याच्यापासून दुखापत होण्याची जास्त शक्यता आहे.
मीन :–अध्यात्मिक उपासना करणार्यांना योग्य मार्ग सांगणार्या गुरूंचे मार्गदर्शन मिळेल. संततीबरोबर मतभेदाच्या विचारावर वाद घालू नका. व्यसनाधीन असलेल्यांना आजचा दिवस धोक्याचा आहे. आईकडील नात्यातील मंडळींचे घरी येणे होईल.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai