Read in
बुधवार 24 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 24 मार्च आज चंद्ररास कर्क दिवसरात्र असून चंद्रनक्षत्र पुष्य 23:11 पर्यंत आहे.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आईच्या महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी कामातील संथपणा मुळे कामाला उशीर झाल्याचे जाणवेल. पैसे मिळवणे या एकाच हेतूने सध्याच्या कामाची आखणी करू नका.
वृषभ :–तुम्ही नोकरी करत असलेल्या क्षेत्रातील नियमात कांही महत्वाचे बदल होणार आहेत अशी बातमी येईल. मनाला आनंद देणार्या गोष्टी कुटुंबातील व्यक्तीकडून घडतील. वयस्कर मंडळींच्या कान दुखण्याची व गळा, घसा दुखण्याची तक्रार निघेल.
मिथुन :–तरूणांच्या विवाहाच्या बाबतीतील हालचाली सकारात्मक राहतील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीने जागेचा व्यवहार पूर्ण कराल. कायदेशीर बाबी मनाने करू नका. महिलांना मैत्रिणींच्या मदतीने अवघड काम सोपे होईल.
कर्क :–लहान मुलांच्या प्रतिकार शक्ती विषयी अंदाज लावत बसू नका. योग्य वेळी पाउल उचला. हौशी तरूणांकडून त्यांच्या छंदाविषयी चा विशेष कार्यक्रम तयार होईल. सरकारी योजनांतून मिळणार्या कामावर अवलंबून राहू नका.
सिंह :–तरूण वर्गाकडून अचानक गुंतवणूक या विषयावर चर्चासत्रे सुरू होतील. दूरचे प्रवास, टूर्स या विषयावर महिलांचे डोके भंडावून जाईल. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे व व्यवहाराची चौकशी करा.
कन्या :–राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना वृद्धाश्रमाच्या मोठ्या मिशनमधे सामावून घेतले जाईल. आरोग्याच्या प्रोजेक्टवर पदाधिकार्यांची नियुक्ती होईल. सरकारी कामातून मिळणार्या संधीबाबतची माहिती घ्या.
तूळ :–सतत कर्माच्या चांगल्या वाईटाचा विचार करून कामे करू नका. जे काम समोर येईल ते कर्तव्य कर्म समजून काम करा. कर्मस्थानातील चंद्र मन दोलायमान करणार आहे तरी जिद्धीने काम करावे लागेल.
वृश्र्चिक :–वयस्कर मंडळींचा वेळ नातवंडांना धार्मिक गोष्टी सांगण्यात जाईल. तरूणांना आज वृद्धाश्रमातील जबाबदारी कडे लक्ष द्यावे लागेल. घरातील पुरूष मंडळीना घरच्या जबाबदार्या उचलाव्या लागतील.
धनु :–काल केलेल्या व अपूर्ण असलेल्या कामाला प्राधान्य द्या. नोकरीतील वरीष्ठ व तुम्ही यामधील नाते सकारात्मक होत असल्याचे अनुभवास येईल. आज कोणत्याही क्षेत्रात कसलीही गुंतवणूक करू नका.
मकर :–प्रौढ महिलांचा गर्भाशयाचा विकार पुन: सुरू होत असल्याची लक्षणे जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसशास्त्राच्या क्षेत्रातील मंडळीना गुंतागुंतीच्या केसचा अभ्यास करताना येणार्या अनेक अडचणीवर मात करता येणार आहे. त्यामुळे सगळीकडे कौतुक होईल.
कुंभ :–नोकरीत कामगार वर्गाच्या काँन्ट्रक्ट मधे वाढ होईल. आय. टी. क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळेल. शिक्षक, प्राध्यापक यांना लाँक डाऊनच्या कालावधीत केलेल्या आँन लाईन कामाचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग झाल्याचे जाणवेल.
मीन :–नाटक, सिनेमा व इतर कलाक्षेत्रातील कलाकारांना एक चांगली संधी चालून येईल. अती विचार करत बसलात तर संधी हातची निघून जाईल. गायक कलाकारांना आपला अल्बम रिलीज करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग सापडत असल्याचे संकेत मिळतील.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai