daily horoscope

मंगळवार 23.मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 23.मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 23 मार्च आज चंद्ररास मिथुन 16:29 पर्यंत व वंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 22:44 पर्यंत व नंतर पुष्य.

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– कोणत्याही समस्येची काळजी करण्याऐवजी त्यावरील उपाय शोधण्याच्या तुमच्या सवयीचे महत्व आज
सर्वांना कळेल. आज तुम्हाला शेजार्यांना आर्थिक मदत करावी लागेल. मनाचा मोठेपणा दाखवाल.

वृषभ :– मुलीच्या सासरच्या मंडळींचे तुमच्याकडे येणे होईल व दिवस धामधुमीत जाईल. तरूणांना त्यांच्या
मनाविरुद्ध असलेले मत स्विकारावे लागेल. आज प्रवास करताना सामानाची काळजी घ्यावी लागणार आहे.

मिथुन :–कुटुंबातील ज्येष्ठांकडून तरूणांना मोलाचे मार्गदर्शन मिळेल. लहान मुलांच्या संस्कार वर्गातील
शिकवलेले संस्कार पाहून नातेवाईक आश्चर्यचकीत होतील. आज तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाचाही त्रास
वाटेल.

कर्क :–लहान मुलांच्या दाताच्या डाँक्टर्सना मुलांच्या दाताचे अवघड काम कौशल्याने करावे लागेल. कुटुंबात
जोडीदाराच्या हट्टी व चिडखोर वागण्याचा त्रास होईल. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे लक्षांत
येईल.

सिंह :–जून्या मित्रमैत्रिणींबरोबर नव्याने हितगूज होईल व मनातील अनेक गोष्टींना वाट मिळेल. विद्यार्थ्यांनी
अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास त्यांना मोठे घवघवीत यश मिळवता येणार आहे.

कन्या :–नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या मताला महत्व देण्याच्या सवयीमुळे तुम्ही तुमचे अस्तित्व गमावत
असल्याचे समजून येईल. प्रेमाच्या व्यवहारात बेफिकीर राहून चालढकल करू नका. नोकरीत कामाचे योग्य
नियोजन कराल.

तूळ ::–मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील नव्या वाटाही अगदी सराईतपणे वापराल.
कर्तव्याचे पालन करताना तुमचे नुकसान होत असल्याचीही जाणीव ठेवा. राजकीय व्यक्तींना आपल्या
अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्र्चिक :–प्रथम संपत्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी उन्हाचा त्रास होऊ नये
म्हणून काळजी घ्यावी. व्यवसायात भागिदाराच्या मताला महत्व दिल्यास व्यवसायात चांगली वृद्धी होणार
आहे.

धनु :–तुम्हाला सध्या भेडसावत असलेल्या समस्यांवर ज्येष्ठांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न कराल.
आज दुपारनंतर कोणतेही धाडस करू नका. नोकरदारानी तर आर्थिक रोख व्यवहार करू नयेत.

मकर :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना आपल्या विरोधकांना हरवण्यात यश मिळेल. मुलांकरिता आईवडीलांना
आज फारच मानसिक त्रास सोसावा लागेल. अधिकारी वर्गाने कोणालाही आज दुपारनंतर कडक बोलण्याचे
टाळावे.

कुभ :–नोकरीतील तुमच्यावर जबाबदारी असलेल्या प्रोजेक्टमधील अडचणी लक्षात येताच ताबडतोप
वरिष्ठांच्या कानावर घालणे हिताचे राहील. सहकारी वर्गाकडून प्रयत्न वाढवण्यासाठी युक्त्या कराव्या लागतील.

मीन :–आजारी असलेल्यांनी व नुकतेच आजारातून उठलेल्यानी आपल्या आहारावर चांगले नियंत्रण ठेवणे
आवश्यक आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करताना जाणून घेऊनच व पूर्ण विचार करूनच सही करा. आईच्या
सुखासाठी खरेदी कराल.

.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “मंगळवार 23.मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *