Read in
सोमवार 22 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 22 मार्च चंद्ररास मिथुन. दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 21:26 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–ज्याची आतुरतेनवाट पहात आहात ते तुमचे महत्वाचे कुरीयर आज येईल. जाहिरातीच्या क्षेत्रातील
माँडेल्सना नवीन काँन्ट्रक्टस् करण्याविषयी विचारले जाईल. सुंदर लेखनासाठी चा असलेला पुरस्काराचे
मानकरी ठराल.
वृषभ :–सोन्याचे दर कितीही खाली येवोत वर जावोत सोने खरेदी करणारे तुम्ही आज आवडता दागिना
बनवण्याचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होत असल्याचे जाणवेल व पैसे
बाजूला पडतील.
मिथुन :–कायमच मौनात राहिलात तर तुमच्याविषयीची प्रतिमा मलिन होऊ लागेल. नोकरदार मंडळीनी
स्वत:चे विचार व्यक्त करून आपले अस्तित्व टिकवून ठेवावे. तुम्ही गप्प बसलात तर तुमच्या बाजूने कोणीही
बोलणार नाही.
कर्क :–मानसशास्त्राचा अभ्यास करणार्यांनी संवत:ला त्यात पाहू नये. कलाकार, लेखक मंडळीना समाजाला
अपेक्षित असलेल्या विषयाकरील कलाकृती करता येणार येणार आहेत. जूना भाडेकरू सोडून गेलेल्या जागेला
नवीन भाडेकरू या सप्ताहात मिळणार आहे.
सिंह :–गेल्या कांही महिन्यापासून उपचार सुरू असलेल्या व संततीच्या प्रतिक्षेतील दांपत्याच्या आशा पल्लवीत
होतील. वैयक्तिक शब्दाला महत्व येऊन फार मोठा प्रश्र्न सुटेल. घरात सर्वात ज्येष्ठ व्यक्तीकडून नाराजीचे सुर
निघतील.
कन्या :– रस्त्यावरील फेरीवाल्यांना आज मोठा भुर्दंड भरावा लागेल. विरोध केलात जर वस्तु जप्त होतील. या
कामासाठी तुमच्या प्रभागातील नेत्याची चांगली मदत मिळेल. समाजाकडून ही मदत मिळेल.
तूळ :–प्रसंगी तुमच्या स्वभावातील नम्रता व लवचिकपणामुळे आज तुमची मानसिक ताकद वाढणार आहे.
जागेच्या व्यवहारात वाद निर्माण होणार नाही याची दखल घ्या. जोडीदाराच्या प्रेमाखातर मोठी खरेदी कराल.
वृश्र्चिक :–जोडीदाराच्या प्रेमाखातर आईवडीलांचे मन दुखवाल तरी पत्नीची बाजू मांडताना सारासार विचार
करा. कोणत्याही व्यक्तीस क्षुल्लक समजू नका. आज मनावर संयम ठेवून सकारात्मक विचार करा.
धनु :–कोणत्याही गोष्टीतील एकदा गेलेली संधी परत मिळत नाही हे लक्षात असू द्या. अहंकार आणि
मोठेपणामुळे जवळचे मित्र दुखावले जातील. ताणतणाव दूर करण्यासाठी आवडत्या छंदाकडे लक्ष द्या.
मकर :–घाईघाईने घेतलेला निर्णय पुन: एकदा तपासून घ्या. तज्ञांच्या मताचा सन्मान करा. कौटुंबिक स्वास्थ्य
बिघडवणार्या घटनांपासून दूर रहा. तुमच्या मुलांकडून आज खर्चाचा विचार न करता मोठी मनात येईल तशी
खरेदी केली जाईल.
कुंभ :–मुलांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिल्यास त्यांच्यात खूपच फरक पडेल. विवाहेच्छूं विवाहाबाबतच्या
कांही वेगळ्याच कल्पना व्यक्त करतील. व्यवसायात आता नवीन प्रयोग करत बतयसू नका.
मीन :– तुमच्या तर्कशुद्ध विचारांना बळकटी येण्यासाठी विषयाचा योग्य प्रकारे विचार करा. कोणालाही
भावनेच्या भरात मनाला लागेल असे शब्द वापरू नका. कुटुंबातील गैरसमजाचे वातावरण व्यवस्थित करण्यात
यशस्वी व्हाल.
.
| शुभं-भवतु ||