weekly-horoscope-2020

रविवार 21 मार्च ते शनिवार 27 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्य

Read in

रविवार 21 मार्च ते शनिवार 27 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्य

21 रविवार चंद्ररास मिथुन व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 19:23 पर्यंत व नंतर आर्द्रा.

weekly-horoscope-2020

22 सोमवार चंद्ररास मिथुन
दिवसरात्र व चंद्र नक्षत्र आर्द्रा 21:26 पर्यंत व नंतर पुनर्वसु. 23 मंगळवार चंद्ररास मिथुन 16:29 पर्यंत व नंतर
कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु22:44 पर्यंत व नंतर पुष्य. 24 बुधवार चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 23:11
पर्यंत व नंतर आश्लेषा. 25 गुरूवार चंद्ररास कर्क 22:48 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 22:48 पर्यंत व
नंतर मघा. 26 शुक्रवार चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघ 21:39 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. 27 शनिवार
चंद्ररास सिंह 25:19 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वाफाल्गुनी 19:51 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी.
वरील प्रमाणे प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  मेष :–फार दिवसापासून घरातील इंटिरीयरचे काम करण्याचे विचार आता पुन: नव्याने चर्चेला येतील. पोस्टाच्या
स्कीममधे गुंतवलेले पैसे फायदेशीर ठरल्याने पुन: गुंतवणूक करायचे ठरवाल. सार्वजनीक बांधकाम क्षेत्रात काम
करणार्‍यांना आपली कामे वेळेत पूर्ण न केल्याने दंड भरावा लागणार आहे. पाण्याच्या ठिकाणच्या जागा,
पाण्याच्या टाक्या, गावाकडील पाणवठ्याच्या ठिकाणी लहान मुले जाणार नाहीत याची दक्षता घ्या. .
सप्ताहाच्या या शेवटच्या दोन दिवसात पुरूष मंडळीना स्वयंपाकघरात काम करावे लागेल.

 

वृषभ :– अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना आता आपली इच्छा पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळतील.
महिला घाईघाईत काम करताना कामातील मुख्य मुद्धा विसरतील. कुटुंबातील जबाबदारी सांभाळतांना
महिलांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तान्ह्या बाळांच्या मातांना आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष
द्यावे लागेल. . कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी
कुटुंबात चढाओढ लागेल. तरूण वर्गाचे ज्येष्ठांकडून कौतुक होईल. नोकरीतील कामात वरीष्ठांचा मन जिंकला.

 

मिथुन :–वर्तमानपत्राच्या क्षेत्रात काम करणार्‍यांना अचानक वेगळ्याच जबाबदार्‍या स्विकाराव्या लागतील.
पत्रकार, लेखक, समिक्षक यांना अतिशय डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. बर्‍याच दिवसापासून
नोकरीतील बदलाची अपेक्षा करणार्‍यांना नवीन संधीचा सुगावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्राबाहेरील जबाबदारी
स्विकारण्यातील धोका समजून घ्या व मगच होय म्हणा. नवीन नोकरीच्या पगाराला भुलून जाऊ नका. त्वचेचा
विकार, सोरँसिसचा त्रास असलेल्यांनी दुखणे कां वाढले आहे याचा विचार करावा. लहान मुलांना घसा दुखीचा
त्रास जाणवेल.

 

कर्क :–बर्‍याच दिवसापासून रेंगाळलेला घराच्या विक्रीचा व्यवहार या सप्ताहात पूर्ण होईल. व्यवसायातील
कर्जबाकी फेडण्याचे निर्णय होतील. गेल्या सप्ताहातील नोकरीतील कामाबरोबर केलेली तडजोड या सप्ताहात
करून चालणार नाही. व्यवसायातील आर्थिक बाजूचा अभ्यास मनाला समाधानकारक राहील. नव्याने कामावर
घेतलेल्या कामगार वर्गास प्रशिक्षण द्यावे लागेल. झोपेची तक्रार असलेल्यानी झोपेसाठी स्वत: मनाने उपाय
करू नयेत. डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. तरूणांनी कामाच्या मागे लागून ध्यास व महत्त्वाकांक्षेचा अतिरेक करू नये.
विद्यार्थ्यांनी अभ्यासातील अडचणींवर मार्गदर्शन घ्यावे.

सिंह :–शैक्षणिक क्षेत्रा व्यतिरिक्त असलेल्या छंदाविषयी नमांकीत गुरूवर्यांचा लाभ होईल. महिलांनी व तरूण
मुलींनी आपल्या छंद आवडीला महत्व देऊन त्याविषयी विचार करावा संधी घालवू नये. पतीपत्नीमधे झालेल्या
वादांवर महिलांच्या सासरकडील नात्याच्या मध्यास्थिने वादावर पडदा पडेल. सर्व काही सुरळीत होणार
असल्याचे संकेत मिळतील. वयस्कर मंडळीना शेजारच्यांकडून आनंद देणार्‍या घटना घडतील. कुटुंबात
ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा केला जाईल. मैदानी खेळात प्राविण्य मिळवलेल्यांना नवीन नोकरीची संधी मिळेल.

कन्या :–राजकीय क्षेत्रातील मंडळीनी जून्या गोष्टी उगाळत बसू नये. नवीन कामात केलेल्या प्रगतीचा आढावा
घ्यावा. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. तरूणांना नवीन वाहन घेण्याची अती तीव्र
इच्छा निर्माण होईल. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात कोणताही बदल करण्याचे ठरवू नये. आईकडील
नात्यातील आवडत्या भावंडांबरोबर भेट होईल व त्यातून खूप मोठे समाधान मिळेल. तरूण आपल्या कामासाठी
ज्येष्ठांचे मन वळवू शकणार आहेत विवाहाच्या बाबतीत मात्र ही मात्रा लागू पडणार नाही.

तूळ :–या सप्ताहात तुमच्या विचारातील सकारात्मकतेत चांगलीच वाढ होणार आहे. व्यवसायात तुम्ही करत
असलेली गुंतवणूक कांही वेळा आवश्यक नसल्याचे लक्षात येईल. मानसिक ताण तणाव यावर प्राणायाम हा
एकमेव उपाय असल्याचे पटेल व ते इतरानाही सांगाल. गाडी चालवण्याच्या बाबतीतील तुमचा कंटाळा तुम्हाला
मोठ्या खर्चात टाकेल. विद्यार्थी वर्गाला परिक्षेची भिती कमी होऊन मनाची अस्वस्थता पण कमी होईल.
संध्याकाळच्या वेळी बाहेर जाण्याचा अत्यावश्यक प्रसंग नसल्यास जाऊ नका.

वृश्र्चिक :–आजपर्यंत तुमच्या नोकरीच्या ठिकाणचे कामातील यश हे फक्त तुमच्यावरच अवलंबून होते पण या
सप्ताहापासून तुमच्या कामात मदत करणारे सहकारी तुमच्याबरोबर असणार आहेत. खाजगी क्षेत्रातील
कर्मचार्‍यांवर पडणारा कामाचा ताण कमी होईल. व्यावसायिकांनी भागिदारांबरोबर सखोल चर्चा केल्यास
येणार्‍या कालावधीवर मात करता येणार आहे. परगावी, परदेशी शिकायला असणार्‍यांना मनावरील ताण कमी
झाल्याचे जाणवेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी सध्या हा विचार बाजूला ठेवावा.

धनु :–नोकरीतील थटून राहिलेल्या कामात वरिष्ठांच्या मदतीने कामाला गती मिळेल. व्यवसायातील
अडकलेल्या कामांना शासकीय मंजुरी मिळण्याचे संकेत मिळतील. कोणतीही ओळख लावण्याचा प्रयत्न करू
नका. न्यायालयातील कामातही अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. राजकीय
मंडळीनी सोशल मिडीयाचा वापर केल्यास त्यांच्या कामाला मार्गी लागणे सोपे होईल. कुटुंबात संघर्ष होणार
नाही याची दखल घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आवाका व त्यांच्या क्षमताांचा अंदाज घेऊन अभ्यासाचे
नियोजन करावे.

मकर :– मामाच्या आजाराचे नक्की स्वरूप न कळल्याने काळजी निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
विचाराने वारसा हक्काच्या निर्णयात महत्वाचा बदल करावा लागेल. आईचे बर्‍याच दिवसापासून रेंगाळलेले
दाताचे काम आता अर्जंटली करावे लागणार आहे. या सप्ताहात तुमच्या खिशाला फार मोठी कात्री लागणार आहे.
लहान बहिणीसाठी विवाहाबाबतची चर्चा आता सिरीयसली करावी लागेल. शेजारच्या वयस्कर काकूंना बँकेत
नेऊन परत आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.

कुंभ :–शिक्षक आणि प्राध्यापक यांना त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील योगदानाबद्दल सन्मान होणार आहे.
आई वडीलांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या संकटाची चाहुल लागेल. ज्योतिषशास्त्र व अंक
शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन मिळेल. फार्मासिटीकल क्षेत्रात काम करणार्‍यांना
वास व अँलर्जीचा त्रास होईल तरी आवश्यक ती काळजी घ्यावी. वयस्कर मंडळीना किडनीचा त्रास असलेल्यांनी
विशेष काळजी घ्यावी.

मीन :–बर्‍याच दिवसापासून आईसाठी करावयाची असलेली खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक
वृद्धी होणारे प्रसंग व त्याचबरोबर कुटुंबात अतिशय आनंदाचे प्रसंग येथील. मुलांकडून हरवलेल्या वस्तू बाबत
त्याच्याकडे खुलासा मागा दुर्लक्ष करू नका. नोकरीतील प्रमोशनच्या चर्चामधे भाग घेऊ नका. राजकीय मंडळीना
स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी करावा लागणारा त्याग हा संघर्षापेक्षा मोठा राहील. व त्यांचे सर्वत्र कौतुक होईल.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “रविवार 21 मार्च ते शनिवार 27 मार्च 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *