Read in
शनिवार 20 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 20 मार्च चंद्ररास वृषभ 30:08 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 16 :44 पर्यंत व नंतर मृगशीर्ष.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्यांनी आपला अभ्यास अतिशय शांतपणे सुरू ठेवावा. नोकरदार वर्गाने आपले काम भले याच विचाराने इतरांच्या कामात नाक खुपसू नये. नसते लचांड मागे लागेल.
वृषभ :–पतीपत्नीमधील नात्याच्या भ्रामक कल्पनाना तडा जाईल. तुम्हाला तुमच्या भावनाना आवर घालण्याची गरज भासेल. इतरांच्या वागण्याच्या त्रासाने आजारपण ओढवून घ्याल. मनातील दु:खाला वाट करू द्या.
मिथुन :–सामाजिक स्तरावर तुमच्या बारीक निरिक्षण कौशल्याचे कौतुक होईल. कोर्टकचेरीच्या महत्वाच्या कामात कोणाचीही मदत घेऊ नका. स्वत: जातीने हजर राहून परिस्थितीची माहिती करून घ्या.
कर्क :–तुमच्या मनाला त्रासदायक ठरलेल्या घटनांच्या बाबतीत जागरूक राहून त्याविषयी जबाबदार व्यक्तीबरोबर चर्चा करा. संततीकडून प्रतिष्ठा वाढवणार्या गोष्टी कानावर येतील पण पडताळून पहा.
सिंह :–पूर्वी ठरलेल्या जागेचा व्यवहार फिसकटेल व त्यात नुकसान होईल तरी तोच व्यवहार करण्याची जिद्द बाळगू नका. आई वडीलांच्या विचारांना व सल्ल्याला मान द्यावा लागेल. लहानसहान गोष्टीवरून भावंडामधे मतभेद निर्माण होतील.
कन्या :–कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक समजण्याची चूक करू नका. राजकीय मंडळीनी तर अतिशय डोळसपणे वागावे. मित्रावर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी लागेल. आर्थिक गरजही भागवावी लागेल.
तूळ :–जवळच्या व्यक्तीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अटोकाट प्रयत्न करावे लागतील. वडीलांकडील नात्यातील मंडळींच्या भेटीतून नवीन उर्जा मिळेल व नातेसंबंध घट्ट होण्यास मदत होईल.
वृश्र्चिक :– डोळसपणे केलेले व्यवहारात कधीच फसगत होत नाही हे लक्षांत घ्या. महिलांनी अतीविश्र्वासाने केलेली मदत वाया जाणार आहे तरी मदत करण्यासही घाई करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
धनु :–नोकरीतील अडचणींवर मात करण्यासाठी वरीष्ठांचा सल्ला घ्या. मनाने एकांगी विचाराने निर्णय घेऊ नका. भूतकाळातील घटनांवर सध्याचा प्रसंग पडताळू नका. स्वत:वर आलेली जबाबदारी निष्ठेने फार पाडा.
मकर :–कुटुंबातील प्रत्येकाला तुमचा निर्णय मान्य असणार नाही तरी तुमचा त्रागाही व्यर्थ होईल. आई वडीलांना न जुमानता केलेल्या गोष्टी मुलांच्या अंगाशी येणार आहेत तरी जागरूक रहावे लागेल. आईवडीलांसमोर कोणतीही लपवाछपवी करू नका.
कुंभ :–खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्र्वास ठेवू नका.. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांच्या आठवणीने वर्तमानकाळ बिघडून घेऊ नका. जवळच्या नात्यात झालेले गैरसमज विचाराने सौम्यपणाने दूर करा.
मीन :–समोर आलेला मार्ग प्रगतीचा आहे हे ओळखून त्याचा स्विकार करा. जमवलेल्या धनाची योग्य प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. मनोरंजनाच्या आहारी जाऊ नका. विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व ओळखून वागावे.
| शुभं-भवतु ||