Read in
शुक्रवार 19 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 19 मार्च आच चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 13:43 पर्यंत व नंतर रोहिणी. आजचा दिवस दुपारी 01:43 पर्यंत अशुभ असल्याने कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करावे.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नोकरीतील वादग्रस्त विषयांवरील तुमच्या मताला महत्व मिळेल व तुमचा सल्ला मोलाचा ठरेल. कोर्टामधील केसेसच्या बाबतीत तुम्ही मांडत असलेले मुद्धे महत्वाचे ठरतील. वकील मंडळीना आजचा दिवस एकदम चांगला जाईल.
वृषभ :–कर सल्लागार, आँडीटर, व फौजदारी वकीलांना आजचा दिवस महत्वाचा राहील. वयस्कर मंडळींना मानसिक आनंद देणार्या घटना घडतील. तरूणांच्या डोक्यातील प्रतिस्पर्ध्याची भावना फारच उचंबळून येणार आहे.
मिथुन :–दवाखान्यात अँडमिट असलेल्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्धांच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. फुडपाँयझन, किंवा एखादा विषारी किडा चावल्याच्या निमित्ताने त्रास होईल.
कर्क :–मित्रमैत्रिणींच्या मदतीमुळे आज तुम्हाला बारा हत्तीचे बळ येईल पण उगाच फुशारकी मारू नका. एखादी निवडणूक लढवत असाल तर उमेदवारांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. पोलीस स्टेशन किंवा तुरूंगातून आज ठरली असली तरी सुटका होणार नाही.
सिंह :–आज तुमच्याकडून कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तरूणांच्या वादावादीचे रूपांतर भयानक रूप घेईल तरी मुळात वादावादी टाळा. कामाचा ताणही इतका वाढेल की तुम्हाला कांहीही सुचणार नाही.
कन्या :–या सप्ताहात तुमच्या ज्या पूर्वजांच्या तिथी आहेत त्यांच्या बाबतीतील कर्तव्यकर्मे करण्याचे निच्छित करा. भावनेच्या भरात कोणाच्याही अती प्रेमात जाऊ नका व अती रागही करू का. आजच्या दिवशी वडिलांची काळजी घ्या.
तूळ :–आजचा दिवस अतिशय सांभाळून वागण्याचा आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आवश्यक राहील कोणताही नियमभंग होऊ देऊ नका. सरकारी तसेच खाजगी नोकरदारानी, अधिकार्यांनी कोणतेही आर्थिक व्यवहार कँशने करू नका.
वृश्र्चिक :–वैवाहिक जीवनातील चर्चा, वाद, मतभेद यांना आज अजिबात थारा देऊ नका. व्यवसायातही एखाद्या सरकारी नोटीशीला उत्तर द्यावे लागेल. डाँक्टर मंडळीना आज प्राणीदंश, विषारी किड्यांचा दंश, फुड पाँयझन यासारख्या पेशंट्सवर उपाय करावा लागेल.
धनु :–नोकरीत आजपर्यंत च्या चुका किंवा ढिलाई चालत होती ती आज चालणार नाही. एखादा मेमो, कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता आहे. आज जागरूक रहावे. पचनसंस्थेवर ताण येऊन आजारपण येईल. उलट्या, जुलाबांचा त्रास होईल.
मकर :–ज्यांना कोणतेही वाईट व्यसन आहे त्याना आज खूपच काळजी घ्यावी लागेल. लहान रांगणारी, नुकतीच चालु लागलेली मुले तोंडात काय घालत आहेत याकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. श्री खंडोबा, श्री शिवशंकर ज्यांचे कुलदैवत आहे त्यांनी महादेवाची उपासना करावी.
कुंभ :–विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आज आळस येईल पण त्यामुळे तुम्ही दहा पाऊले मागे जाल तरी आळस झटकून कामाला लागा. शेतामधे, बागेमधे वावरताना किडा मुंगीचे , नाग सापाचे भय राहील. राजकीयदृष्टय़ा विरोधक तुमच्या विरोधात उभे राहतील.
मीन :–पासपोर्ट व्हिसा, पँनकार्ड यासारखे महत्वाचे पेपर्स गहाळ होण्याचा धोका जास्त आहे. अचानक नोकरीतून बडतर्फ करणार्या घटनांचा धोका आहे. स्कीनची अँलर्जी, स्कीनचे पांढरेडाग, लेप्रसी इ. चा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai