Read in
गुरूवार 18 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 18 मार्च आज चंद्ररास मेष 17:20 पर्यंत नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 10:33 पर्यंत व नंतर कृतिका.
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज दुपारनंतर मानसिक चलबिचल च्या अवस्थेतून बाहेर पडाल. काल काय झाले याचा विचार न करता आता काय व कसे करायचे यावर भर द्या. तुमच्यापेक्षा मोठ्या व अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास विचारांना योग्य दिशा मिळेल.
वृषभ :–आज तुम्हाला समोरच्यावर मात कशी करावी याचे सूत्र सापडणार आहे. दुपारनंतर चा दिवस खास तुमच्या विजयासाठीच आहे याचा अनुभव येईल. सामाजिक कार्यातील तुचे अडथळे आपोआप दूर होऊ लागतील.
मिथुन :–दवाखान्यात अँडमिट असलेल्या मंडळीनी घरी सोडण्यासाठी घाई करू नये. पूर्ण बरे वाटेपर्यंत धीर धरावा. मैदानी खेळात प्राविण्य मिळवलेल्यांना नोकरीच्या निवडीत महत्व मिळेल. महिलांना पाठ व पाय दुखण्याचा त्रास होईल.
कर्क :– मनाला वाटणार्या व प्रत्यक्ष जाणवणार्या गोष्टीत तफावत आढळेल. पत्नीबरोबरील नात्यातील वादाचे विषय कमी करण्याचे प्रयत्न तुमच्याकडून होतील. राजकीय व्यक्तीनी आपल्या हातातील कामात हलगर्जीपणा करू नये.
सिंह :–घसा खवखवण्याचा त्रास जाणवेल. नोकरीतील वरीष्ठांकडून तुमच्या प्रोजेक्टमधील तुमच्या उत्तम कार्याबद्धल कौतुक होईल. लहान मुलांना व वयस्कर मंडळीना सर्दी खोकल्याचा आज चांगलाच त्रास जाणवेल.
कन्या :–बर्याच दिवसापासून न सापडणाऱ्या वस्तू अचानक सापडतील. एक दोन महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून पुढील मुलाखतीसाठी सिलेक्ट झाल्याचे कळेल. श्री दत्तगुरूंच्या उपासकांना अपेक्षित फळ मिळेल.
तूळ :–आज संध्याकाळनंतरचा कालावधी कांहीसा त्रासदायक जाईल. व्यावसायिकांनी नवीन गोष्टींना सुरूवात करू नये. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारांना कांही शैक्षणिक धोरणातील बदल करण्यासाठीच्या कमिटीमध्ये सामावून घेतले जाईल.
वृश्र्चिक :–आपल्याला बरे वाटत नाही ही भावना दुपारनंतर कमी होईल व फ्रेश वाटू लागेल. विवाहेच्छूंना अपेक्षित जोडीदाराची माहिती चालून येईल तरी विचार करा. भावनेच्या भरात स्वतःला जास्त महत्व देऊन विचार कराल.
धनु :–स्वत:च्या छंदासाठी वेळ द्यावासा वाटेल. व्यवसायातील गुंतागुंतीची माहिती इतरांसमोर उघड करू नका. कुटुंबातील महत्वाच्या प्रश्र्नाला वेळ द्यावा लागेल. महत्वाचे काम करताना घाई करू नका कामात आज चुका होण्याचा संभव आहे.
मकर :–मुलांच्या मित्रांना आज तुमच्याकडून बौद्धीक मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल तरी योग्य व्यक्तीकडून माहिती घ्यावी. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे जाणवेल.
कुंभ :–सामाजिक कार्यकर्त्यांना आज उत्तम मार्गदर्शनाचा लाभ होईल. तरूणांना आज वेगवेगळी क्षेत्रे खुणावत असल्याचे जाणवेल. तज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्या. तुमच्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींविषयी कोणासही शब्द देऊ नका.
मीन :–क्रिडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून सरावावर भर द्यावा. पोलीस खात्यातील कर्मचार्यांना अचानक मानसिक धक्का बसणार्या गोष्टी घडतील. आज आर्थिक गुंतवणूक करताना पुन: पुन: विचार करून करा.
| शुभं-भवतु ||
Thank you Tai