daily horoscope

बुधवार 17 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 17 मार्च 2021  चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 17 मार्च आज चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी  07:30  पर्यंत व नंतर भरणी. आज विनायक चतुर्थी आहे. रविचा उत्तराभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश वेळ 26:22  आहे.

वरील राशी व दोन्ही  नक्षत्रांचा विचार करून करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– इलेक्ट्रीकल इंजिनीअर्स, काम्पुटरचे हार्डवर्कींगचे अभ्यासक तसेच तज्ञ यांना हा सप्ताह अतिशय लाभदायक राहील. तुम्हाला ज्या गोष्टींची अपेक्षा आहे त्या गोष्टी कधी व कशा करायच्या याची पूर्ण माहिती घ्या व नियोजन करा.

 

वृषभ :–तुरूंगाशी संबंधित अधिकार्‍यांना अडचणीत येण्याची वेळ येईल. तसेच तुरूंगात किंवा पोलीस स्टेशनला बंद असलेल्यांची फसगत होईल. जमिनीखालील शास्त्राच्या अभ्यासकांना वेगवेगळ्या विद्युत लहरींचा अनुभव येईल.

 

मिथुन :–वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला समुपदेशनाची गरज लागेल. शिक्षणाच्या बाबतीतील असलेले यश तुम्हाला हुलकावणी देण्याचा धोका आहे  तरी याचा विचार करून मेहनतीत वाढ करावी.

 

कर्क :–आयुष्यातील जून्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जागरूक रहा. आज घडणार्‍या घटनांमधून पुढील घटनांचा अंदाज घ्या. आर्थिक व्यवहार करताना अचानक कांही गणिते बदलतील तरी आज व्यवहार करूच नका.

 

सिंह :–गेल्या दोन दिवसापासून असलेले प्रकृतीबाबतचे अंदाज खरे ठरतील. तुम्हाला वाटते म्हणून कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थिती तपासून पहा. तूमच्या पूर्वपुण्याईनेच कोणीतरी देवाच्या रूपाने मदत करेल.

 

कन्या :–तुम्ही थटवलेल्या बँकेच्या कर्जासाठी बँकेकडून मोठा तगादा लागेल. कुटुंबातील व्यक्तीकडून होणारी मदत तुटपुंजी असेल. घरातील स्टोअर रूम किंवा धान्याच्या गोदामाला शाँर्ट सर्कीटपासून धोका संभवतो.

 

तूळ :–नाटक सिनेमाची आवड असणार्‍यांना त्यावरील चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. संततीच्या प्रतिक्षेतील मंडळीना अजूनही कांही वेळ वाट पहावी लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपले अधिकार वापरताना दहा वेळा विचार रहावा.

 

वृश्र्चिक :–सध्या सुरू असलेल्या नोकरीतील तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदारी विषयी वरीष्ठांकडून शंका घेतली जाईल. कामात व वागण्यात अतिशय पारदर्शकता ठेवावी लागेल.  तुम्हाला तुमचे मत व्यक्त करताना दहा वेळा विचार करावा लागेल.

 

धनु :–औषधाच्या दुकानदारांनी जागरूकपणे काम करावे जरासाही हलगर्जीपणा महागात पडेल. वयस्कर मंडळीना पायांना सूज येऊन त्रास उद्भवेल. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी कोणत्याही आरोपाचे खंडन ताबडतोप करण्याच्या भानगडीत पडू नये.

 

मकर :–आज तुमच्या राशीतील सर्वानाच झोपेचा त्रास संभवतो. चिडचिड वाढेल व ब्लडप्रेशरचा ही त्रास जाणवेल. रजेवर असलेल्यांना वरीष्ठांकडून एखाद्या कामाबाबत स्पष्टीकरण मागवले जाईल. कामातील दिरंगाई मनस्ताप देईल.

 

कुंभ :–न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला आज कोर्टात जावे लागणार आहे. महिलां उद्धोजकांनी आपल्या कायदेसल्लागारांना विचारल्याशिवाय कोणतीही माहिती ओपन करू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घ्यावा.

 

मीन :–मुलांच्या सुटीत ठरवलेल्या गावी जाण्याच्या विचारात बदल कराल. लहान मुलांच्या अंगाला अचानक पित्ताच्या गांधी उठतील. मुलांना उन्हाळ्याच्या उष्णतेपासून जपावे लागेल. व्यावसायिकांनी कायद्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये.

| शुभं-भवतु ||

 

One thought on “बुधवार 17 मार्च 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *